ADVERTISEMENT
home / मनोरंजन
कार्तिक फेम मोहसिन खानने सोडली ‘ये रिश्ता क्या कहलाता है मालिका’

कार्तिक फेम मोहसिन खानने सोडली ‘ये रिश्ता क्या कहलाता है मालिका’

टेलीव्हिजन मालिका हा प्रेक्षकांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. एखादी मालिका लोकांना आवडली तर ती वर्षानूवर्षे टीव्हीवर सुरूच राहते. ये रिश्ता क्या कहलाता है ही मालिकाही अशी गेली अनेक वर्षे प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. अक्षरा आणि नैतिकनंतर त्यांची मुलगी नायरा आणि कार्तिकवरही प्रेक्षकांनी मनापासून प्रेम केलं. मात्र आता हा प्रवास इथेच थांबवावा लागणार आहे. कारण आता कार्तिकची भूमिका करणारा मोहसिन खानने मालिका सोडली आहे. मोहसिन खानने नुकतीच एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे त्याचे चाहते देखील उदास झाले आहेत.

“अंतिम” च्या प्रदर्शन तारखेमुळे होणार मराठी चित्रपटाची गळचेपी

कार्तिकने का सोडली मालिका

कार्तिकची भूमिका साकारणारा मोहसिन खान याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये काही नवे जुने फोटो आहेत. त्याने तीन फोटो शेअर केले आहेत ज्याला त्याने भावूक करणारी कॅप्शन दिली आहे. फोटोमध्ये त्याच्यासोबत मालिकेचे दिग्दर्शक आणि सहकलाकार शिवांगी जोशीदेखील आहे.त्याने या पोस्टमधून त्याच्या सर्व सहकलाकारांचे आभार मानले आहेत. या मालिकेतील पहिला आणि शेवटचा सीन त्याने चाहत्यांसोबत शेअर केला आहे. फोटोसोबत त्याने शेअर केलं आहे की, “साडे पाच वर्ष बापरे! कार्तिकच्या भूमिकेतील माझा पहिला आणि शेवटचा सीन. मी या मालिकेतील प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ आहे. ” यासोबतच त्याने मालिकेसाठी मेहनत घेणाऱ्या पूर्ण टीमचे आभार मानले आहेत. या फोटोजमध्ये मोहसिन खान आणि मालिकेतील इतर कलाकार आणि टीम भावूक झालेली दिसत आहे. 

इम्ररान हाश्मी आणि निकिता दत्ताचा डीबक : दी कर्स इज रिअलचं टीझर प्रदर्शित

ADVERTISEMENT

मालिकेचा सुरू होणार पुढचा टप्पा 

ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत आता पुढचा काळ दाखवला जाणार आहे. म्हणजेच मालिकेत आता कार्तिक आणि नायराच्या मुलांची कहाणी दाखवली जाणार आहे. यापूर्वी नायराची आई अक्षरा आणि नैतिकची कहाणी दाखवण्यात आली होती. थोडक्यात आता तिसऱ्या पिढीची कथा सुरू होणार आहे. कदाचित त्यामुळे मोहसिन खानने या मालिकेतून एक्झिट घेतली असावी. गेली साडेपाच वर्ष कार्तिक आणि नायराची लव्हस्टोरी प्रेक्षकांना खूप भावली होती. आता पुढच्या नव्या जोडीसह मालिका पुढे दाखवली जाणार आहे. मात्र त्यामुळे मोहसिन खान आणि शिवांगी जोशीच्या चाहते नक्कीच उदास झाले आहेत. चाहत्यांना या जोडीला पुढे पाहण्याची इच्छा होती. मात्र कार्तिकनायराच्या जोडीचा प्रवास कदाचित इतकाच असावा. 

Bigg Boss Marathi:घरात सुरु झालेत गैरसमज, टीम Aमध्ये पडेल का फूट?

20 Oct 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT