ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
कोणत्याही ट्रेडिशनल ड्रेसवर उठून दिसतात मोजडी, तुम्ही ट्राय केलीत का?

कोणत्याही ट्रेडिशनल ड्रेसवर उठून दिसतात मोजडी, तुम्ही ट्राय केलीत का?

ट्रेडिशनल ड्रेस घातल्यानंतर तुमची तारीफ होणार नाही असे शक्य नाही. कारण ट्रेडिशनल वेअर असतातच तुमचा लुक खुलवण्यासाठी. आता ड्रेस म्हटला की, त्यावर ओढणी, दागिने आलेच. पण त्यासोबत तुम्हाला त्या ड्रेसमध्ये ग्रेसफुल दाखवण्याचे काम करते ते फुटवेअर… आता तुम्ही ट्रेडिशनलवेअरवर काही हटके घालण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे तो म्हणजे मोजडीचा. जर तुम्ही मोजडी वापरत असाल तर फारच छान. पण तुम्ही या आधीही या मोजडी ट्राय केल्या नसतील तर तुम्ही अगदी आवर्जून ही फॅशन करायला हवी.

अशी करा Palazzo सोबत हटके स्टाईल How To Style Palazzo In Marathi

मोजडी किंवा जुती

ट्रेडिशनलवेअर वापरा मोजडी

Instagram

ADVERTISEMENT

आता मोजडी म्हटल्यावर तुम्हाला टीपिकल चामड्याचे किंवा वेलवेटचे असे शूज नक्कीच आठवले असेल. आता हा बुटांचा प्रकार गुजरात, राजस्थान आणि पंजाब या ठिकाणी सर्वात जास्त घातला जाणारा हा प्रकार. आता प्रातांप्रमाणे त्याला नावसुद्धा आहेत. पंजाबमध्ये याला ‘जुती’ म्हटलं जात. गुजरात आणि राजस्थान या भागांकडे त्याला ‘मोजडी’  असं म्हटलं जातं. या शिवाय त्याला ‘खुसा’ किंवा ‘सलीम शाही’ या नावाने ओळखले जाते.

आता मोजडीबद्दल सांगायचे तर याचा शोध मुघलांना लावला. मुघलांच्या काळात चामड्यापासून बनवले जाणारे हे बूट फारच फॅन्सी असायचे कारण यावर रत्न किंवा भरपूर कलाकुसर केली जायची. आजही अनेक ठिकाणी त्यांच्या मोजडी जतन करुन ठेवण्यात आल्या आहेत. मुघलांचा राजा सलीम शाहा यांच्या कालखंडात या बूटांचा अधिक वापर केला गेला. म्हणूनच त्याला सलीम शाही म्हटले जाता. आता हा प्रकार पुरुष आणि महिला दोघांनाही घालता येईल असा आहे. इतर कोणत्याही चपलांप्रमाणे याला डावी-उजवी अशी घालता येते.  हा प्रकार सर्वसाधारणपणे सलवार कमीझवर त्या काळी घातला जायचा. महत्वाचे सांगायचे तर या मोजडी हाताने शिवलेल्या असतात.

Bralette म्हणजे काय माहीत आहे का? जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत

अशी करा फॅशन

डिझायनर मोजडी

ADVERTISEMENT

Instagram

आपल्याकडे प्रत्येक वस्तू मागे काही तरी स्टोरी दडलेली आहे. आता मोजडीचा इतिहास वाचल्यानंतर जर तुम्ही अजूनही मोजडी ट्राय केली नसेल तर अशापद्धतीने करा स्टायलिंग 

  • जर तुम्ही चुडीदार किंवा साध्या पायजम्यावर मोजडी घालण्याचा विचार करत असाल तर तुम्ही मोजडीमधील हाफ ( मागून उघड्या असलेल्या) मोजडी घालायला सोप्या आणि छान दिसतात. 
  • जर तुम्ही गरारा किंवा पलाझो पँटस घालणार असाल तर तुम्हाला राजस्थानी मोजडी घालायला काहीच हरकत नाही. 
  • आता मोजडीमध्ये तुम्हाला व्हरायटी अशी मिळते की, मुघल काळातील मोजडी या पुढून गोल असायच्या या मोजडी चुडीदार किंवा तुमच्या लांब स्कर्टवर चांगल्या दिसतात. 
  • पुढे टोकदार असलेल्या असा राजस्थानी मोजडी या तुम्हाला अनारकली,पलाझो, स्कर्टसवर चांगल्या दिसतात. 
  • हल्ली  मोजडी वेगवेगळ्या मटेरिअलमध्ये मिळतात म्हणजे लेदर, वेलवेट, कापड असे अनेक प्रकार मिळतात. शिवाय तुम्हाला रोज नाही पण काही खास कार्यक्रमांसाठी मोजडी हवी असेल तर तशी कलाकुसरही केलेली मिळते. तुमचा ड्रेस अगदी साधा असेल आणि तुम्हाला त्याला एक वेगळा लुक द्यायचा असेल तर तुम्ही या मोजडींचा उपयोग करु शकता. 

आत तुम्ही नक्की करा मोजडीची ही फॅशन कधीही आणि कुठेही…

राजस्था नी मोजडी

ADVERTISEMENT

Instagram

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा  POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. या लिंकवर क्लिक करा https://www.popxo.com/shop/zodiac-collection/

02 Feb 2020
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT