ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
‘या’ सोप्या टिप्स वापरून करा बचत आणि व्हा श्रीमंत

‘या’ सोप्या टिप्स वापरून करा बचत आणि व्हा श्रीमंत

जीवनात प्रत्येकालाच यशस्वी आणि श्रीमंत व्हायचं असतं. मात्र प्रत्येकजण एका रात्रीत श्रीमंत होऊ शकत नाही. भविष्यात श्रीमंत होण्यासाठी आर्थिक व्यवहार शहाणपणाने आणि नियोजनबद्ध करावे लागतात. तुम्ही किती पैसे कमवता यासोबतच तुम्ही कमवलेले पैसे कसे खर्च करता आणि किती बचत करता यावर तुम्ही भविष्यात श्रीमंत होणार का नाही ते ठरत असतं. पैशांची गुंतवणूक करणं हे एक कौशल्य आहे. पैसे कमवता कमवता योग्य पद्धतीने आणि दीर्घ कालावधीसाठी पैसे बचत करणे हा लवकर श्रीमंत होण्याचा एक चांगला मार्ग आहे. अनेकांना पैसे सहज कमवता येतात मात्र फक्त ते योग्य पद्धतीने बचत न करता आल्यामुळे ते त्यांच्याकडून पैसे मोठ्या प्रमाणावर खर्च होतात. यासाठीच या काही टिप्स फॉलो करा ज्यामुळे तुम्हाला बचत करून श्रीमंत होता येईल.

जाणून घ्या श्रीमंत होण्याचा सोपा मार्ग –

तुम्ही मिळवलेले पेैसे जसे गुंतवाल त्या पद्धतीने तुम्हाला त्याचा फायदा मिळतो. जर भविष्यात श्रीमंत व्हायचं  असेल तर योग्य मार्गाने पैसे कमवा आणि पैशांची योग्य बचत करा. 

तुमच्या मिळकतीच्या कमीतकमी वीस टक्के रक्कम बचत करा –

दरमहिन्याला तुमचा पगार अथवा मिळकतीच्या वीस ते पंचवीस टक्के रक्कम बचत करा. यासाठी तुमच्या इन्कमचे चार भाग करा. त्यातील एक भाग घरखर्च, एकभाग स्वतःचे खर्च एक भाग सामाजिक कार्य आणि एक भागातील रक्कम बचत करण्याचा प्रयत्न  करा. बचत करण्यासाठी स्वतःच्या इतर वायफळ खर्चांवर नियंत्रण ठेवा. ठरवलेल्या रक्कमेपेक्षा जास्त खर्च होणार नाही याची काळजी घ्या. ज्यामुळे तुम्ही ठराविक रक्कम महिन्याला बचत करू शकाल.

घरातील मुलांना लहानपणापासून पैसे बचत करण्याची सवय लावा –

तुमच्या घरातील लहानमुलांना पैशांचे महत्त्व पटवून द्या. त्यांना मिळालेले खाऊचे पैसे, पॉकेटमनी यातून काही रक्कम बचत करण्याची सवय त्यांना लावा. कारण ही सवयच त्यांना मोठेपणी पैसे गुंतवण्यास प्रवृत्त ठरेल. 

ADVERTISEMENT

Shutterstock

खरेदीला जाताना नीट प्लॅन करा –

बऱ्याचदा आपण शॉपिंग सेंटर, मॉलमध्ये खरेदीला जातो. तिथे गेल्यावर निरनिराळी दुकाने आणि सेल तुम्हाला आकर्षित करतात. ज्यामुळे तुम्ही कधीच न वापरल्या जाणाऱ्या, बिनकामाच्या अनेक गोष्टी खरेदी करता. यासाठी शॉपिंगला जाण्याआधी नीट प्लॅन करा आणि त्यानुसार खरेदी करा. ज्यामुळे तुमचे पैसे नक्कीच नको त्या ठिकाणी खर्च होणार नाहीत.

गुंतवणूक सल्लागाराची मदत घेण्याचा संकोच करू नका –

पैसे बचत करण्यासाठी आपण अनेक ठिकाणी पैसे गुंतवत असतो. मात्र तुम्ही ज्या ठिकाणी पैसे गुंतवले आहेत त्या ठिकाणी तुम्हाला काही वर्षानी नक्की चांगला मोबदला मिळेल का हे पाहणंही तितकंच गरजेचं  आहे. तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट, म्युच्युअल फंड, जीवन बिमा, शेअर मार्केट, गोल्ड इन्वेस्टमेंट अशा अनेक ठिकाणी तुमचे पैसे गुंतवू शकता. मात्र गुंतवणूक करण्यापूर्वी सावधपणे या गुंतवणूकीचे सर्व नियम आणि कागदपत्रांचा अभ्यास करा. यासाठी एखाद्या चांगल्या गुंतवणूक सल्लागाराची मदत घ्या. कारण हे गुंतवणूक सल्लागार शेअर बाजाराच्या स्थितीचा अभ्यास करून तुम्हाला योग्य सल्ला देत असतात.

ADVERTISEMENT

पैसे उधार देताना सावध राहा –

अनेकांना एकमेकांना पैसे उधार देण्याची सवय असते. ज्यामुळे तुम्ही सतत तुमच्या जवळच्या लोकांसोबत पैशांच्या उधारीचे व्यवहार करता. मात्र कोणालाही पैसे उधार देताना सावध राहा. दिलेले पैसे तुम्हाला परत मिळतीलच अशी अपेक्षा ठेवू नका. जर तुम्हाला ते पैसे परत नाही मिळाले तरी चालणार असेल तरंच पैसे उधार दया. कारण जर ते पैसे परत मिळाले नाही तर तुमच्या बजेटवर त्याचा परिणाम होऊ शकतो. शिवाय इतरांना तुमच्याकडून सतत असे पैसे उधार घेण्याची सवय लागू शकते. एखाद्याला गरजेच्यावेळी मदत करणं नक्कीच चांगलं मात्र त्यामुळे तुमचे नुकसान होणार नाही याची वेळीच काळजी घ्या. 

Shutterstock

लॉंग टर्मसाठी गुंतवणूक करा –

काही लोकांना पैशांची बचत करताना ती दर महिन्याला चेक करण्याची सवय असते. दररोज त्या पैशांमध्ये किती वाढ होत आहे हे पाहणं चुकीचं नसलं तरी फायद्याचं नक्कीच नाही. यासाठी तुमच्याजवळील पैसे  एखाद्या मोठ्या कालावधीसाठी गुंतवा. ज्यामुळे तुम्हाला त्याचा जास्त फायदा मिळू शकतो. प्रॉपर्टी, म्युच्युअल फंड अशा माध्यमात जास्त कालावधीसाठी पैसे गुंतवल्यास काही वर्षांनी तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो.

ADVERTISEMENT

तुमचं भविष्यातील गुंतवणूक ध्येय ठरवा –

पैसे गुंतवणूक करण्यामागे तुमचा काय हेतू आहे हे आधीच ठरवा. तुमचं घर, मुलांचं शिक्षण, मुलांचे लग्न, निवृत्तीनंतरचे जीवन अशा तुमच्या आयुष्यातील विविध टप्प्यांसाठी निरनिराळी गुंतवणूक करा. ज्यामुळे तुमची बचत करण्याची प्रवृत्ती अधिक वाढेल. शिवाय योग्य वेळी या बचतीचा तुम्हाला फायदा होईल. 

पैशांना कधीच कमी लेखू नका –

काही लोकांना सतत पैसे वाईट असतात, पैशांमुळे माणसे दूर होतात असं बोलण्याची सवय असते. निसर्गनियमानुसार ज्या गोष्टीचा तुम्ही द्वेष करता ती गोष्ट तुमच्यापासून दूर जाते. जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर या पैशांचा आदर राखा. चांगल्या मार्गाने पैसे कमवा आणि ते योग्य प्रकारे बचत करा. 

सामाजिक कार्यासाठी देणगी द्या –

जेव्हा तुम्ही तुमच्या मिळकतीचा काही भाग समाजासाठी अथवा सामाजिक कार्यासाठी दान करता तेव्हा तुम्हाला मानसिक आनंद मिळतो. आपण जे पैसे कमवतो त्यासाठी समाजातील अनेकांचे हातभार लागत असतात. म्हणूनच सामाजिक कार्यासाठी दान करून आपण या समाजाचे ऋण फेडत असतो. ज्याचा परिणामामुळे भविष्यात तुम्हाला समाजाकडून, निसर्गाकडून चांगले सहकार्य मिळते आणि तुमची मिळकत अधिक वाढू लागते. ज्याच्या कडे असतं तोच इतरांना देऊ शकतो. जेव्हा तुम्ही दान देता तेव्हा ही देण्याची भावना तुम्हाला अधिक समृद्ध करते. मात्र दान करताना तुमची भावना गर्वाची असू नये समाजाला देणे हे तुमचे हे कर्तव्य आहे या  हेतूने दान करा. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT

हे ही वाचा –

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा-

श्रीमंत व्हायचं असेल तर टाळा ‘या’ 5 चुका, करा बचत

ADVERTISEMENT

ट्रॅव्हलिंगमध्ये कसे वाचवावेत पैसे, पर्याय आणि टीप्स

शॉपिंगवर खूप खर्च करत असाल तर या पद्धतीने वाचवा पैसे

 

24 Jan 2020
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT