सगळीकडे मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. पावसाच्या धारा बरसू लागल्या की मनात प्रेमभावना फुलू लागतात. अशा वातावरणात जर जोडीला पावसावर आधारित प्रेमगाणी असतील तर मग क्या बात है…. मराठी चित्रपटात पावसावर आधारित अशी अनेक रोमॅंटिक गाणी आहेत. जी तुमचा मूड पटकन चांगला करू शकतात. एखाद्या रोमॅंटिक संध्याकाळी अशी गाणी ऐकत त्याच्यासोबत क्वॉलिटी टाईम स्पेंड करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या म्युजिक लिस्टमध्ये आताच अॅड करा ही अजरामर मराठी गाणी.
चिंब पावसाने झालं रान आबादानी
पावसाच्या धारा बरसू लागल्या की प्रत्येकाच्या मनात हे गाणं आपोआप ऐकू येऊ लागतं. सर्जा राजा या चित्रपटात अजिंक्य देव आणि पूजा पवार यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलेलं आहे. हे मराठी चित्रपटातील एक लोकप्रिय युगुलगीत असल्यामुळे रोमॅंटिक प्रसंग निर्माण करण्यासाठी अनेक कार्यक्रमात ते रिक्रिएट केलं जातं. या गाण्याचे शब्दही रोमांचक करणारे आहेत.
- चित्रपट – सर्जा
- गायक आणि गायिका – लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर
- गीतकार – ना. धों. महानोर
- संगीतकार – पंडीत ह्रदयनाथ मंगेशकर
भिजून गेला वारा
पावसाळ्यात रोमॅंटिक वातावरण निर्माण करण्यासाठी तुम्ही हे प्रेमगीत नक्कीच ऐकू शकता. इरादा पक्का या चित्रपटातील हे गीत असून ते सिद्धार्थ जाधव आणि सोनाली कुलकर्णी यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं आहे. या गाण्यातील बोल आणि चित्रित करण्यात आलेले प्रसंग मनात प्रेमाचे स्फुरण निर्माण करू शकतात.
- चित्रपट – इरादा पक्का
- गायक आणि गायिका – क्षितिज तारे आणि निहिरा जोशी
- संगीतकार – निलेश मोहरिर
- गीतकार – अश्विनी शेंडे
अधीर मन झाले
मनाला पावसात एखादं वारंवार ऐकावसं वाटत असेल तर ते म्हणजे अधीर मन झाले. पावसाळी वातावरणात मनात निर्माण होणाऱ्या प्रेमभावना यात अतिशय सुंदर पद्धतीने मांडलेल्या आहत. जरी तुम्ही मराठी नसाल तरी या गाण्याचे संगीत तुम्हाला ते वारंवार ऐकण्यासाठी भाग पाडेल. शिवाय हे गाणं पूजा सावंत आणि ओमकार गोवर्धन यांच्यावर इतक्या रोमॅंटिक पद्धतीने चित्रित करण्यात आलं आहे की त्या गाण्यासह तुमचे मनही पावसात भिजून चिंब होईल.
- चित्रपट – निळकंठ मास्तर
- गीतकार – गजेंद्र आहिर
- गायिका – श्रेया घोषाल
- संगीतकार – अजय अतुल
नभ उतरू आलं
जैत रे जैत या चित्रपटातील नभ उतरू आलं हे गाणं नाही ऐकलं तर तुमचा पावसाळा आनंद साजरा न करताच असाच वाया गेला असं म्हणावं लागेल. मराठी चित्रपटसृष्टीतील जैत रे जैत हा एक अजरामर चित्रपट आहे. त्यातील दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील आणि मोहन आगाशे यांच्यावर चित्रित हे गाणं तुमच्या मनात प्रेमभावनांचे अकुंर नक्कीच फुलवेल.
चित्रपट – जैत रे जैत
गीतकार – ना. धों. महानोर
संगीतकार – पंडीत ह्रदयनाथ मंगेशकर
गायक आणि गायिका – आशा भोसले, रविंद्र साठे आणि चंद्रकांत काळे
गारवा अल्बम
मराठीत रोमॅंटिक गाण्यांसाठी लोकप्रिय अल्बम म्हणजे गारवा… नव्वदीच्या दशकामध्ये तरूण मनाने या अल्बममधील गाणी ऐकली नसतील असं मुळीच होणार नाही. त्यामुळे आजही बाहेर पावसाचं वातावरण झालं की मनात गारवाची गाणी वाजू लागतात. मिलिंद इंगळे यांनी संगीतबद्ध केलेली आणि सौमित्र यांनी सादर केलेली गारवाची गाणी आणि कविता मनाला पावसाळ्यात अधिकच रोमॅंटिक करतात.
- अल्बम – गारवा
- संगीकार – मिलिंद इंगळे
- सादरीकरण – सौमित्र
येरे घना येरे घना
काही गाणी अशी असतात जी कितीही वर्षे झाली तरी मनात नेहमीच गुणगुणत राहत. गायिका आशाबाईंचे ये रे घना हे गाणं त्यापैकीच एक गाणं. पावसाला सुरुवात होताच तुमच्या मनात हे गाणं सुरू नाही झालं तरच नवल. या गाण्याचे शब्द आणि आशा भोसलेंचा स्वर असा सुंदर मिलाप तुमच्या मनाला नक्कीच प्रसन्न करू शकतो.
- अल्बम – ऋतू बरवा
- गायिका – आशा भोसले
- गीतकार – आरती प्रभू
- संगीतकार – ह्रदयनाथ मंगेशकर
कधी तू रिमझिम झरणारी बरसात
मुंबई-पुणे- मुंबई चित्रपटाचे तीन भाग प्रदर्शित झाले असले. तरी प्रेक्षकांचे मन मात्र या चित्रपटाच्या पहिल्या भागावरच रूंजी झालत राहते. या चित्रपटात स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वैवर चित्रित करण्यात आलेलं हे गाणं मराठीतील एक सुंदर प्रेमगीत आहे. या गाण्यात पाऊस नसला तरी याची सुरूवात पावसाच्या सरींनी झालेली आहे.
- चित्रपट – मुंबई – पुणे – मुंबई
- गीतकार – सतीश राजवाडे, श्रीरंग गोडबोले
- गायक – ह्रिषिकेष रानडे
- संगीतकार – अविनाश विश्वजित
सौजन्य – युट्यूब
अधिक वाचा –
(Marathi Wedding Songs) लग्नसराईमध्ये या 15 मराठी लग्नाची गाणी वाजवा
लता मंगेशकर यांची मराठी भावगीत (Lata Mangeshkar Marathi Songs)
मराठीतील ही नवीन गाणी तुम्ही ऐकलीत का? नाही.. मग आताच ऐका (Latest Marathi Songs)