कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे अनेकांची लग्ने मागील दोन वर्षांपासून रखडली आहेत. आता सर्व काही पूर्ववत होत असल्यामुळे लग्नकार्य लवकरlत लवकर उरकून घेतली जात आहेत. मात्र सध्या लग्नाचा सीझन तर नाहीच शिवाय पावसाळाही जोरदार आहे. पावसाळा रोमॅंटिक आणि उत्साहवर्धक ऋतू असला तरी या काळात लग्नकार्य करताना थोडी पंचाईत होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे लग्नापूर्वीची तयारी लग्नविधी, लग्नस्थळ निवडणे, जेवणाची व्यवस्था, मंडप डेकोरेशन, वाजंत्री, आमंत्रण देणे, लग्नानंतरचे विधी अशा सर्व गोष्टींसाठी इतर सीझनपेक्षा जास्त काळजी आणि सावधगिरीची गरज असते. आता या सर्व गोष्टी जुळून आल्या तरी लग्नात सर्वात महत्त्वाचा असतो नववधूचा लुक… या काळात लग्न करणाऱ्या नवरीने मेकअप करताना देखील थोडी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. वास्तविक लग्नात तुमचा लुक सर्वात बेस्ट असावं असं तुम्हाला वाटत असतं. पण या एखादा खास लुक करण्याचा प्रयत्न या सीझनमध्ये यशस्वी होईलच असं नाही. यासाठी पावसाळ्यात लग्न असेल तर नवरीने मेकअपबाबत या काही खास टिप्स अवश्य फॉलो कराव्या.
पावसाळ्यात लग्न असणाऱ्या नवरीसाठी मेकअप टिप्स
पावसाळ्यातील लग्न सोहळ्यात परफेक्ट दिसायचं असेल तर नववधूने या मेकअप टिप्स फॉलो करायला हव्या.
- मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्यावर बर्फ लावा कारण या काळात नेहमीपेक्षा जास्त घाम येण्याची शक्यता असते.
- या काळात लग्न असणाऱ्या नववधूने स्वतःला नेहमीपेक्षा जास्त हायड्रेट ठेवण्याची गरज आहे. यासाठी लग्नापूर्वी काही दिवस सतत पाणी पिण्याची, ज्युस पिण्याची सवय स्वतःला लावा. ज्यामुळे लग्नात तुमच्या चेहरा टवटवीत दिसेल.
- लग्नासाठी मेकअप साहित्य वॉटर प्रूफ निवडा. ज्यामुळे तुमचा मेकअप पसरणार नाही. कारण जर तुम्हाला पावसात जावे लागले तरी मेकअप खराब होणार नाही.
- चेहरा जास्त तेलकट दिसू नये यासाठी मॅट फिनिश लुकचा मेकअप करा.
- जर तुमची त्वचा तेलकट असेल तर फाऊंडेशन आणि मेकअप बेस मॅट फिनिश देणारे निवडा
- पावसाळ्यात वातावरण दमट असल्यामुळे मेकअप सतत टचअप करू नका. शक्य असल्यास नैसर्गिक लुक देणारा मेकअप करा.
- डोळ्यांचा मेकअप करताना आयशॅडो आधी प्रायमर लावा. या काळात क्रिम बेस अथवा ग्लीटर लुकचा आय मेकअप करणे टाळा.
- जेल लायनरचा वापर डोळ्यांवर केल्यास घाम आल्यावर ते पसरण्याची शक्यता कमी असते. कोणत्याही ऋतूमध्ये नवरीने वॉटरप्रूफ मस्कारा आणि आय मेकअप करावा. कारण पाठवणीला रडल्यास मेकअप खराब होत नाही.
- पावसाळी वातावरणात क्रीम ब्लश कधीच वापरू नका. त्याऐवजी पावडर ब्लश उत्तम पर्याय ठरेल.
- पावसाळ्यात गरम झाल्यास तुम्ही सतत पाणी अथवा ज्युस पिणार यासाठी मेकअप करताना लिपस्टिक लावण्यापूर्वी कन्सिलर अवश्य लावा.
पावसाळ्यासाठी निवडा या खास शेडच्या लिपस्टिक दिसा खास
चेहऱ्यावर कसे लावायचे हायलायटर, सोपी पद्धत
या सोप्या स्टेप्स वापरत तुम्हीदेखील करू शकता नाकावर ब्लश
मराठी उखाणे विविध प्रकारचे