ADVERTISEMENT
home / Budget Trips
Monteria Village a unique experiential Theme destination in Marathi

‘मॉंटेरिया व्हिलेज’ मुंबई-पुण्याच्या पर्यटकांना खुणावतंय नवं पर्यटन स्थळ

मुंबईत राहणाऱ्या लोकांचं जीवन नेहमीच धावपळीचं आणि धकाधकीचं असतं. दैनंदिन कामे, ऑफिसमधील कामाचा ताण, कौटुंबिक जबाबदाऱ्या, कुटुंबाचे आरोग्य, मुलांचे संगोपन, नातेवाईकांचा पाहुणचार, सर्वांशी असलेले नातेसंबध असं सारं काही जपत प्रत्येकाला जीवनाचा गाडा पुढे ढकलावा लागतो. अशा वेळी मानसिक स्वास्थ, आनंद आणि विरंगुळा मिळावा यासाठी वर्षांतून एकदा अथवा दोनदा कुठेतरी बाहेर फिरायला जावं असं प्रत्येकाला वाटत असतं. वेकेशनसाठी फार सुट्टी मिळणार नसेल तर कमीत कमी एक दिवस तरी कुठेतरी आऊटिंग करावं असं वाटणं स्वाभाविक आहे. शिवाय मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे फॅमिली पिकनिकचं प्रमाण नाही म्हटलं तरी जरा कमीच झालं आहेत. त्यामुळे आता सर्व काही सुरळीत होताना तुम्हाला कुटुंब अथवा मित्रमंडळींसोबत बाहेर फिरायला जायचं असेल तर वन डे पिकनिकसाठी एक मस्त पर्याय तुमच्यासाठी खुला झाला आहे. रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे सुमारे 35 एकर विस्तारलेल्या जागेत, मुंबई आणि पुण्यापासून अगदी जवळ मॉंटेरिया व्हिलेज  नावाचं नवं डे आऊटिंग डेस्टिनेशन तुम्हाला नक्कीच भुरळ घालू शकतं. इथे गेल्यावर तुमच्या पिकनिकच्या फोटोसोबत 100+ Trekking Quotes In Marathi | Travel Quotes In Marathi नक्की शेअर करा.

काय आहे हे थीम डेस्टिनेशेन

गावसंस्कतीशी असलेली नाळ जपणं शहरी जीवनात कठीण होऊन बसलं आहे. कामात व्यस्त असल्यामुळे आपल्या गावाची कितीही ओढ वाटली तरी कोकणात अथवा इतर जिल्हात एक दिवसात गावी जाऊन परत येणं शक्य नसतं. मात्र या नव्या थीम डेस्टिनेशनमध्ये तुम्हाला एका दिवसात गावात येणारे सगळेच अनुभव घेता येतात. कारण इथे आहे पाण्यात डुंबण्याकरिता तलाव, डोळे मिटून शांत पडून राहण्यासाठी टांगण्यात आलेला झुला, लोकसंगीताचे सादरीकरण, आरोग्यदायी असा देशी आहार, बांबू आणि खाट विणकाम कलांची अनुभूती, बालपणात नेणारा लगोरीचा खेळ… आणि असं बरंच काही. या ठिकाणी तुमचं मन अगदी बालपणात स्वतःच्या गावी गेल्याप्रमाणे रमू शकतं. शिवाय हे ठिकाण मुंबई-पुण्याहून अगदी जवळ असल्यामुळे तुमचा विकेंड तुम्ही इथे नक्कीच घालवू शकता. आठवड्याच्या धकाधकीतून आराम करण्यासाठी हा चांगला पर्याय आहे. यासोबतच पाहा पुण्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळं (Places To Visit In Pune In Marathi)

मॉंटरिया रिसॉर्टमध्ये काय अनुभवाल  

मॉंटेरिया रिसॉर्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या व्यवस्थापक संचालिका राही वाघाणी यांच्या मते, “मॉंटेरिया व्हिलेजमध्ये प्रवेश करताच पाहुणे गावच्या आठवणीत रममाण होतात. दिवसभर शेतकऱ्याचे जीवन जगण्याची संधी त्यांना मिळते, शिवाय घरगुती जेवणाची लज्जत चाखता येते. लगोरीचा डाव, झुल्यावर झोके घेण्याचा आनंद, तलावात पोहणे आणि तणावमुक्त जीवन निसर्गाच्या सानिध्यात जगता येणार आहे. त्यातच कौशल्यपूर्ण कारागीर आणि कामगारांच्या हाताखाली सर्जनशीलता जपण्याचा अनुभवही घेता येईल. शहराच्या वेगातून ‘फुरसत’ मिळवून दोन क्षणाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी, आपल्या जीवलगांसोबत एकत्र क्वालिटी टाईम व्यतित करण्यासाठी हा उत्तम पर्याय ठरतो.”  शिवाय याठिकाणी शेतकरी, सुतार, फर्निचर घडवणारे, शिंपी, कुंभार, धातू तसेच दगडी काम करणारे कारागिर, बांबू आणि खाट विणकाम करणारे, लोहार, कातडी कमावणारे आणि सोनारांसोबत त्यांच्या कामाचा अनुभव तुम्हाला घेता येईल. केसांचा छानसा हेअर कट करता येईल, चंपी, मसाज करून घेता येईल. याठिकाणी महिला गृहउद्योगाद्वारे विक्रेत्यांनी तयार केलेल्या चविष्ट आणि लज्जतदार पापड, लोणची तसेच श्रीखंडाचा आनंद घेता येईल. सेंद्रिय शेतीचा अनुभव घेता येईल. सर्वसमावेशक पद्धतीच्या धन्वंतरी गार्डनसारख्या शेतीविषयक अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल किंवा शेतातील ताज्या उत्पादनाचा गंध अनुभवण्यासाठी फेरफटका मारता येईल.  याठिकाणी नक्षत्र बाग देखील तयार करण्यात आली आहे. ग्रीन ट्रेन, स्विंग सर्कल आणि जायंट हारनेस,बुलेट चकडो, गुंफेतून भटकंती, बांबूच्या मचाण,लक्ष्मण झुल्याची प्रतिकृती तुमचं लक्ष वेधून घेईल. सध्याचा महासाथीचा काळ लक्षात घेता, याठिकाणी स्वच्छता विषयक सर्व खबरदारी घेण्यात आलेली असून पाहुण्यांच्या सुरक्षेची योग्य काळजी घेतली जाते. यासोबतच महाराष्ट्रातील प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळे (Historical Tourist Places In Maharashtra In Marathi) जरूर पाहा.

जेवण आणि राहण्याची उत्तम व्यवस्था 

इथल्या मोकळ्या हवेत भटकंती करताना भूक लागल्यावर पर्यटक स्थानिक ठेल्यांवर चवदार पाणी पुरी, तोंडाला पाणी आणणारे चपटे चणे आणि चटकदार चाटप्रकार चाखू शकतात. बर्फाचा गोळा आणि मडक्यातील दही त्यांना थंडगार करते. तहान भागवण्यासाठी नारळपाणी, बडीशोप पाणी, कोकम सरबत, गोटी/मार्बल सोडा, ताक किंवा कटींग चहा,कॉफीचा पर्यायही इथे मिळू शकतो.  रेस्टॉरंट साबराजमध्ये घरगुती चवीचे शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची मेजवानी मिळू शकते. स्वयंपाकासाठी शेतात पिकवलेल्या भाज्या वापरल्या जातात, त्यामुळे तुम्ही इथे गहू-बाजरी-ज्वारी आणि तांदळाच्या पोळ्या-भाकऱ्या, डाळ-भात, कढी-भात व पारंपरिक गोड पदार्थ चाखू शकता.

ADVERTISEMENT

तेव्हा एखाद्या विकेंडला कुटुंब आणि मित्रमंडळींसोबत या ठिकाणी तुम्ही वन डे आऊटिंगचा प्लॅन नक्की आखू शकता. आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा. शिवाय आमचे ब्युटी, फॅशन, लाईफस्टाईल, प्रवास, लग्नसोहळा याविषयावरील इतर लेखही अवश्य वाचा.

मच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

11 Feb 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT