ADVERTISEMENT
home / Love
लॉकडाऊनमधील ‘मदर्स डे’ सेलिब्रेशन

लॉकडाऊनमधील ‘मदर्स डे’ सेलिब्रेशन

तुमच्या शाळेच्या पहिल्या दिवशीचं रडणं पाहून भावूक होणारी ते अगदी पहिल्या नोकरीचा पहिल्या दिवशी डोळ्यात पाणी येणारी आई सतत तुमच्या सोबत असते. तिच्या जागी आपण कोणाचाही विचार करूच शकत नाही. मे महिन्याचा दुसरा रविवार हा आईच्या प्रेमाला समर्पित आहे. संपूर्ण जगभरात हा दिवस मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. 

यंदा 9 मे ला मदर्स डे आहे. लॉकडाऊन आणि कोरोनामुळे यंदा तुम्हाला आईला कुठेही बाहेर नेता येणार नाही. फक्त घरच्याघरी मदर्स डे च्या शुभेच्छा देता येतील. पण एवढ्यावरच थांबून कसं चालेल ना. म्हणूनच अनेक घरातील बच्चेमंडळीनी लॉकडाऊनमध्ये खास मदर्स डे सेलिब्रेट करण्यासाठी प्लॅनिंगला सुरूवात केली आहे. लॉकडाऊनमुळे मुलं आपल्या आईवडिलांसोबत जास्तीतजास्त वेळ घालवत आहेत. ज्यामुळे आता त्यांनाही आपल्या आईची आवडनिवड सगळं जाणून घेता आलं आहे. कोरोनामुळे मुलं भलेही घरात कैद झाली, पण त्यांना एक गोष्ट कळून चुकली आहे. ती म्हणजे आपली आई आपली जास्तीतजास्त काळजी या काळात घेत आहे. ज्यामुळे कोरोना संसर्गापासून त्यांचा बचाव होईल. त्यामुळे आईला स्पेशल फील देण्यासाठी मुलांनी यंदा मदर्स डे खासमखास करायचं ठरवलं तर नवल नाही. बाजार बंद आहेत आणि कोणालाच माहीत नाही की, लॉकडाऊन केव्हापर्यंत सुरू राहणार त्यामुळे मुलं आपल्या आईसाठी यंदा घरच्याघरीच खास गिफ्ट्स तयार करतील. जर तुम्ही आपल्या आईला मदर्स डे निमित्त कसं सरप्राईज द्यायचं किंवा हा दिवस कसा सेलिब्रेट करायचा हे ठरवलं नसेल तर आम्ही तुमच्यासाठी काही आयडियाज या लेखात शेअर करत आहोत. 

आईसाठी खास नाश्ता

Canva

आईसाठी खास नाश्ता

ADVERTISEMENT

आपल्या आईकडून आपण नेहमी तक्रार ऐकतच असतो की, कधीतरी किचनमध्ये वळत जा. काहीतरी बनवायला शिका. पुढे जाऊन तुमचं कसं होणार, अशी आईची सततची तक्रार असते. मग ती मुलीबाबत असो वा मुलाबाबत. मग या मदर्स डे ला आईला मस्तपैकी नाश्ता बनवून आश्चर्यचकित करा. कारण बिचारी सकाळी उठल्यापासून आधी किचन आणि मग ऑफिस किंवा बाकीच्या कामात व्यस्त असते. आजच्या दिवशीला अगदी चहापासून ते नाश्त्यापर्यंत सगळं हातात द्या. मग ती नाश्त्याची डिश ऑम्लेट किंवा मॅगी का असेना. आपल्या लेकराने बनवली आहे म्हटल्यावर ती नक्कीच खुष होणार. मग होऊ दे नाश्त्यापासून मदर्स डे ची धमाकेदार सुरूवात.

आईसोबत ब्रंच डेट

जर तुम्हाला अगदीच नाश्त्याचं नाही जमलं किंवा घरी काही बनवायचं नसल्यास तिच्या आवडीचा मेन्यू बाहेरून ऑर्डर करा. छान डायनिंग टेबल सजवा. घरच्याघरी हॉटेलसारखा माहौल निर्माण करा. तुमचा एखादा भाऊबहीण लॉकडाऊनमुळे लांब असेल तर त्यांना झूम कॉल करून एकत्र आणा. तुमची आवडती मावशी किंवा आईची आवडती मैत्रीण यांना तुम्ही व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून मदर्स डे ब्रंचसाठी एकत्र आणू शकता. त्यांना बरेच दिवसानंतर बघितल्यावर आईला नक्कीच आनंद होईल आणि ब्रंचचे चार घास जास्तच जातील.

आईसाठी क्युट नोट्स

Canva

क्युट नोट्स मदर्स डे साठी

ADVERTISEMENT

आई आपल्यावरील प्रेम सतत जाहीर करत असते. पण आपण दरवेळी तसं करतोच असं नाही. त्यामुळे मदर्स डे ही उत्तम संधी आहे. आई उठण्याआधी घरात प्रत्येक ठिकाणी क्युट नोट्स किंवा स्टीकि नोट्स लावून ठेवा. अगदी वॉश बेसिन, किचनचा ओटा ते तिच्या कपाटामध्ये असं सगळीकडे छोट्या छोट्या क्युट नोट्स लिहून चिकटवा. आईसाठी कविता किंवा आईसाठी शायरी केलीत तर तीही यावर तुम्ही लिहू शकता. अशा छोट्या आणि क्युट नोट्स वाचून तिच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल.

प्रेमाच्या पत्त्यांचा डाव

आता जर तुम्हाला वरील प्रकार अति वाटत असेल किंवा आईवरील प्रेमाचा जास्त गाजावाजा करणं आवडत नसेल तर तुम्ही सिक्रेट पद्धतीने करा. तुमच्या आईला पत्ते खेळायला आवडत असतील तर तिला यावर्षी युनिक पत्त्यांचा सेट गिफ्ट द्या. ज्या पत्त्यांवर तुम्ही आईवर प्रेम का करता हे लिहीलं असेल. अर्थातच 52 पत्त्यांवर लिहीणं शक्य नसेल तर फक्त राणीच्या पत्त्यावर लिहा. पत्त्याचा डाव रंगण्याआधीच आईला छान गिफ्ट मिळेल. नाही का?

गच्चीतली पिकनिक

लॉकडाऊनमुळे बाहेर जाणं शक्य नसलं म्हणून काय झालं. बिल्डींगच्या किंवा घरच्या गच्चीवर तर जाऊच शकतो. मग मस्तपैकी संध्याकाळी छोटीशी सरप्राईज गच्चीवरची पिकनिक प्लॅन करा. आईसाठी तिच्या आवडीप्रमाणे सरबत किंवा चहा/कॉफी थर्मासमध्ये भरून घ्या. त्यासोबतच थोडा सुका खाऊ घ्या. तोही तिचा आवडता असला पाहिजे. आता तिला सांगा की, तुम्ही तिला पिकनिकला घेऊन जात आहात. तिला न्यायच्या आधी गच्चीवर छान सगळं मांडून ठेवा आणि तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधून तिला न्या. तुमच्या घरातच जर बाल्कनी टेरेस असेल तर तिची दुपारची झोप पूर्ण होण्याआधी तुम्हाला हे सगळं करावं लागेल. गच्चीत पोचल्यावर मस्तपैकी मोकळ्या आकाशाखाली चहा आणि सुका खाऊची मेजवानी एन्जॉय करा. कोरोनाच्या काळात अशा मोकळ्या वातावरणात थोडा वेळ मिळणंही आता लक्जरी झाली आहे. छानपैकी आईसोबत सनसेट पहा. संध्याकाळच्या वेळी आकाशात पक्ष्यांचे थवे दिसतात. त्याचा आनंद घ्या. आई सोबत तुमचीही संध्याकाळ नक्कीच अविस्मरणीय होईल.

आईसाठी होम स्पा

Canva

ADVERTISEMENT

आईसाठी खास होम स्पा

लॉकडाऊन आणि कोरोनाच्या तणावामुळे तसंच घरातल्या सगळ्यांचं करत ऑफिसच्या जवाबदाऱ्या सांभाळणारी आजची आई खरंच थकली असेल. मग तिला रिलॅक्स करण्यासाठी स्पा फीलला घरी आणा. छानपैकी फेसमास्क किंवा शीटमास्क एका ट्रेमध्ये ठेवा. ते नसतील तर घरगुती पदार्थांचा वापर करून फेसमास्क तयार करा. इसेंशियल ऑईल असतील तर तेही एकत्र ठेवा. घरातलं लायटींग सेट करा. छान रिलॅक्स म्युझिक लावा आणि आईला एन्जॉय करून द्या. तिच्यासोबत तुम्हीही रिलॅक्स व्हा.

आईसोबत मूव्ही नाईट

वर सांगितलेलं तुम्हाला काहीच जमणार नसेल तर सर्वात सोपा मार्ग म्हणजे मूव्ही नाईट. मस्तपैकी घरातच थिएटरचं फील निर्माण करा आणि आपल्या आईसोबत तिचा किंवा तुम्हा दोघांचा आवडता मूव्ही बघा. तुमच्याकडे जर प्रोजेक्टर असेल तर बेस्टच होईल. अगदी झटपट होतील असे पॉपकॉर्न तयार करा आणि आईसोबत मूव्ही एन्जॉय करा. 

जर तुमची आई आणि तुम्ही जवळ नसाल तर नो प्रोब्लेम. तुम्ही एकाच झूम व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून चित्रपट एकत्र पाहू शकता. आईचे आवडते डायलॉग्स आले की, टाळ्या वाजवा, कमेंट्स करा आणि जुन्या आठवणींना उजाळा द्या. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही मूव्ही मॅरेथॉनही करू शकता.

ADVERTISEMENT

लॉकडाऊन नंतरची ट्रिप

लॉकडाऊनमुळे घरी राहून सगळेच कंटाळले आहेत आणि आई तर सर्वात जास्त कंटाळली असेल नाही का? सगळ्यांनाच कधी एकदा बाहेर फिरायला पडू असं झालं असेल. अशावेळी फक्त त्याबद्दल वाईट वाटून घेण्यापेक्षा आईसोबत एखादी ट्रीप प्लॅन करा. जिकडे आईची बरेच दिवसापासून जायची इच्छा असेल. तिथे डेस्टीनेशन शोधा आणि करा रिसर्च. 

06 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT