लग्न म्हणजे खरं तर आपण नेहमी एक प्रकारचा जुगारच म्हणतो. लव्ह मॅरेज असो वा अरेंज मॅरेज खरे रंग कळतात ते लग्नानंतरच. लग्न करताना खूप स्वप्नं पाहिलेली असतात. लग्न हा आयुष्याचा अत्यंत महत्वाचा टप्पा असतो. त्यामुळे निर्णय घेताना अत्यंत विचारपूर्वक घ्यावा लागतो आणि अरेंज मॅरेज असेल तर तुम्हाला खूपच विचार करावा लागतो. जोडीदाराची योग्य निवड करताना केवळ एक दोन भेटीमध्ये माणूस कळत नाही. त्यामुळे जोपर्यंत तुम्हाला मुलाकडून काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत तोपर्यंत तुम्ही लग्नाला होकार कळवू नका. अरेंज मॅरेज करताना आपण जेव्हा समोरच्या व्यक्तीला भेटतो तेव्हा आपण पूर्णतः त्या व्यक्तीला एकाच भेटीमध्ये जाणून घेऊ शकत नाही. काही वेळेला कुटुंबाकडून अधिक वेळ दिला जातो. तर काही वेळा अगदी घाईत लग्नाचे निर्णय घेण्यात येतात. पण पहिल्या भेटीत नक्की काय प्रश्न विचारायचे हादेखील मनात गोंधळ असतो. केवळ अरेंज मॅरेजच नाही तर लव्ह मॅरेज करतानाही हे प्रश्न नक्की विचारायला हवेत. जाणून घेऊया कोणते आहेत हे प्रश्न.
लग्नासाठी कोणताही दबाव नाही ना?
बऱ्याचदा हल्ली दबावाखाली लग्न केले असं आपल्याला ऐकायला येत असतं. केवळ मुलींच्या बाबतीतच नाही तर मुलांवरही कुटुंबाकडून लग्नाचा दबाव टाकला जातो. पण असं असेल तर लग्न जास्त काळ टिकू शकत नाही. त्यामुळे मुलावर लग्नाचा दबाव तर नाही ना हे सर्वप्रथम स्पष्ट करून घ्यायला हवे. मनमोकळेपणाने मुलाला विश्वासात घ्या आणि त्याला याबद्दल माहिती विचारा. कारण अशा प्रकारे दडपणाखाली लग्न केल्यास, ते लग्न यशस्वी होत नाही. त्यापेक्षा मुलाला अधिक जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम त्याच्या मनावरील आणि अगदी आपल्या मनावरीलही दडपण कमी करणे गरजेचे आहे.
लग्नासाठी बनारसी साडी खरेदी करताना लक्षात ठेवा या गोष्टी
मुलाप्रमाणेच मुलीचे कुटुंबही महत्वाचे आहे
बऱ्याचदा अरेंज मॅरेजमध्ये मुलामुलीची पसंती आली की लगेच लग्नाची तारीख ठरवली जाते. त्यांना भेटायला जास्त वेळ दिला जात नाही. तर घाईघाईत आपण मुलाला बऱ्यापैकी जाणून घेतो पण त्याच्या कुटुंबाचे विचार कसे आहेत ते कळत नाही. मुली आपलं घर सोडून मुलाच्या घरात जाणार असतात. त्यामुळे कुटुंबाबद्दल आपल्या जोडीदाराचे विचार जाणून घेणंही गरजेचे आहे. केवळ आपल्या कुटुंबाला प्राधान्य न देणारा आणि दोन्ही कुटुंबाना समान जपणारा मुलगा असायला हवा. मुलीच्या बाबतीतही हेच आहे. माहेर आणि सासर दोन्हीकडे समान वागणूक मुलगी देऊ शकेल की नाही हे मुलाने पाहायला हवे. याची माहिती करून घेतली तर निर्णय घेणे अधिक सोपे होते. सर्वात जास्त भांडण हे याच गोष्टीवरून होत असल्याने तुम्ही याकडे अधिक लक्ष केंद्रीत करावे. तसंच घरातील व्यक्तींचा स्वभाव कसा आहे हे जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारावेत.
लग्नासाठी वेडिंग थीमचा विचार करताय, तर नक्की पाहा या थीम्स
लग्नानंतरही मित्रमैत्रिणींसह संबंध तोडणार नाही
हादेखील सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. लग्नाच्या आधी असणारे मित्रमैत्रिणी हे नवरा अथवा बायकोला नकोसे होतात. पण त्याआधीच दोन्हीकडून हा मुद्दा समजून घेणे गरजेचे आहे. मित्रमैत्रिणींना लग्नानंतर किती महत्व द्यायचे हे नक्कीच प्रत्येकाला माहीत असते. पण लग्न झाले म्हणून मित्राशी अथवा मैत्रिणीशी बोलणं सोडून दे अथवा संबंध तोडून टाक हा मुद्दा कधीही नात्यामध्ये येऊ नये. त्यामुळे लग्नाआधीच हा मुद्दा स्पष्ट करावा. याविषयी सर्व प्रश्न विचारून घ्यावे. जेणेकरून लग्नानंतर तुमच्यामध्ये या गोष्टींवरून भांडणे होणार नाहीत. कारण जसे नवऱ्याचे मित्र महत्वाचे असतात. तसंच कामामध्ये वेळ काढून मुलीने आपल्या मित्रमैत्रिणींना भेटणेही गरजेचे असते.
लग्नासाठी योग्य वय नेमके कोणते, तुमचं काय बरं म्हणणं आहे…
करिअरबद्दल भविष्यात काय विचार केला आहे
Shutterstock
लग्न म्हणजे एकमेकांवर जबाबदारीदेखील येते याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे लग्न करताना मुलाच्या भविष्याविषयी काय योजना आहेत हे विचारणे गरजेचे आहे. त्यामुळे सध्या करिअरच्या कोणत्या टप्प्यात समोरची व्यक्ती आहे आणि पुढे कर्ज वगैरे काही काढण्याच्या विचारात आहे की व्यवस्थित सेटल आहे या सगळ्याचा अंदाज घेता येतो. करिअरशिवाय त्याचे सध्याचे उत्पन्न किती आहे हेदेखील जाणून घेणे गरजेचे आहे. अव्वाच्या सव्वा अपेक्षा करू नका. तुम्ही किती कमावता यानुसार समोरच्या व्यक्तीचे उत्पन्न किती आहे हे जाणून घेणे हे आवश्यक आहे. कारण तुम्हाला त्या व्यक्तीबरोबर संसार करायचा असल्यामुळे ही माहितीदेखील महत्वाची आहे.
नोकरीबद्दल काहीही आक्षेप नाही ना
लग्न करताना खूप शिकलेले आणि चांगल्या हुद्यावर असणारी बायको प्रत्येकाला हवी असते. पण नंतर कुटुंबासाठी वेळच काढत नाही असं टुमणंही तिच्या मागे लागलेले पाहायला मिळते. त्यामुळे नोकरी आणि घर दोन्ही सांभाळणारी बायको हवी असली तरीही तिची कामातील जबाबदारी समजून घेऊन तिच्या नोकरीबद्दल आक्षेप तर नाही ना हे नक्की विचारून घ्या. कारण लग्नानंतर या मुद्द्यावर अधिक कुरबुरी सुरू होताना दिसतात. करिअर आणि कामामुळे लग्नात समस्या उद्भवणे हे आजकाल खूप पाहायला मिळते. त्यामुळे या गोष्टींची सविस्तर चर्चा लग्नाआधी होणे आणि लग्नानंतर त्यावर ठाम राहणे हे दोन्ही गरजेचे आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक