प्रेम सगळ्यांनाच मिळतं असं नाही. काहींना काहीही न करता प्रेम करण्याची संधी एकदा नाही तर अनेकदा मिळते.तर काहींना कितीही प्रयत्न केला तरी त्यांना मनाप्रमाणे प्रेमात यश मिळत नाही. कधीकधी नाते अगदी जुळायला आलेले असते. पण प्रेमाची कबुली देण्याची वेळ ज्यावेळी येते. त्यावेळीच नेमके असे काहीतरी बिनसते की आता कुठे रिलेशनशीप स्टेटस बदलेल अशी अपेक्षा असतानाच रेशीमगाठी जुळण्याचे राहून जाते. प्रियाच्या बाबतीत असेच झाले. आयुष्यात प्रेम करण्याची संधी मिळाली. त्याच्यावर प्रेमही झाले पण आयत्यावेळी असे काही झाले की, प्रियाचा प्रेमावरचा विश्वास काही काळासाठी उडून गेला.
My Story …आणि ती रात्र आमच्यासाठी खास ठरली
वयाची तिशी आली आता तरी लग्न करं असा घरातल्यांचा तगादा सुरु झाल्यावर प्रियाने आपले नाव विवाहमंडळात नोंदवले. नाव नोंदवल्यानंतर मुलांकडून तिला लग्नासाठी मागणी घालणारे मेसेजही आले. पण लगेचच एखादा मुलगा निवडून दुसऱ्या दिवशीच त्याच्याशी लग्न करण्याचा प्रियाचा मनसुबा नव्हता. तिला जोडीदार निवडण्यासाठी थोडा वेळ घ्यायचा होता. ज्याच्या प्रेमात पडायचे आहे त्याला थोडे जाणून घेण्यासाठी तिला त्याच्याशी बोलणे आणि भेटणे असे करायचे होते. आलेल्या स्थळांपैकी काही निवडक स्थळ निवडल्यानंतर तिच्या आयुष्यात आशिष आला. तिला हवा तसा आशिष असल्यामुळे तिने घरात हा मुलगा आवडल्याचे सांगितले. फक्त लगेच भेटण्याआधी त्याचा स्वभाव प्रियाला जाणून घ्यायचा होता. त्यामुळे घरातल्यांच्या परवानगीने तिने आशिषशी बोलायला घेतले. आशिष दिसायलाच नाही तर सगळ्याच बाबतीत फार चांगला होता. त्यामुळेच पहिल्यांदाच प्रिया त्याच्या प्रेमात पडली होती.
दिवसांमागून दिवस जात होते. प्रियामध्ये बराच फरक पडला होता. प्रिया आणि आशिषचे बोलणे रोजच सुरु होते. एकमेकांची चौकशी करणे, एकमेंकाबद्दल जाणून घेणे अशा बराच गोष्टी सुरु होत्या. प्रेमात पडलेल्या प्रियाचे कामाकडे मुळीच लक्ष नव्हते.तिच्यासाठी आशिष हे काही काळासाठी सर्वस्व झाले होते. त्यामुळे आशिषच्या भोवतीच तिचे विश्व फिरत होते. घरातल्यानांही आनंद झाला होता. कारण कधी नव्हे ते प्रियाने कोणाला तरी जोडीदार म्हणून निवडले होते. प्रिया आता या मुलाशीच लग्न करेल असे ठाम झाले होते. आता त्यांचे एकमेकांशी भेटणे तेवढे बाकी होते. आता तोही दिवस दूर नव्हता. प्रिया- आशिष यांनी भेटण्याची जागा आणि वेळ निश्चित केली. एकमेकांना पहिल्यांदाच ते समोरासमोर पाहणार होते. भेटण्यासाठी त्यांनी कॉफी शॉप निवडलं. प्रिया आधीच फारच उत्सुक असल्यामुळे कधी नव्हे ती वेळेच्या आधी हजर राहिली. या दिवसाची ती खूप आतुरतेने वाट पाहात होती. तिने यासाठी खास यारी केली होती. नेहमी पेक्षा अधिक सुंदर ती आज दिसत होती.
शेवटी तो क्षण आला. आशिष समोर आला. आशिषला समोर पाहून ती लाजून चूर झाली. कॉफी पित पित आणि गप्पा मारत त्यांचा हा रोमँटीक वेळ जात होता. प्रियाने मनापासून याच्याशीच लग्न करायचे ठरवले. त्याच गुलाबी विचारात ती घरी आली. तिने घरी सगळे काही सांगितले. आशिषने देखील तिला भेटून खूप आनंदी असल्याचे सांगितले. तो दिवस प्रिया- आशिषसाठी फारच खास होता. त्यानंतर काही दिवस त्यांचे रोजच बोलणे सुरु होते. पण त्यानंतर एक दिवस असा आला की, आशिषने प्रियाशी बोलणे कमी केले. कामात व्यग्र असल्यामुळे मेसेज करता येत नाही बोलता येत नाही हे कारण प्रियाला सुरुवातीला पटले. पण हळुहळू हे बोलणे कमी होऊ लागले. आता प्रियालाही आशिषचे बोलणे कळत नव्हते.
My Story: या लॉकडाऊनमुळे मिटला आमच्यातील दुरावा
आणि एक सकाळ प्रियाचा प्रेमावरचा विश्वास कायमचा उडून गेला. कारण आशिषच्या सोशल मीडियावर तिने अशी पोस्ट पाहिली ज्यामुळे ती सुन्न झाली. आशिषने जितके दिवस प्रियाशी बोलणे टाळले होते. त्या काळात दुसऱ्या मुलीशी लग्न करुन त्याने आपला संसार सुरु केला होता. रडतच का असेना अभिनंदनाचा मेसेज पाठवायला तिने व्हॉटसअॅप सुरु केला तर आशिषने तिला ब्लाॅक करुन टाकले. सगळं काही जुळूनही प्रियाच्या रेशीमगाठी आणि लग्नगाठी जुळू शकल्या नाहीत. याचे तिला कायमच दु:ख मनात राहिले.
तुम्हालाही आला असेल असा अनुभव तर ही स्टोरी नक्की शेअर करा आणि प्रेमात कधीही हार मानू नका.