ADVERTISEMENT
home / Love
My Story …आणि ती रात्र आमच्यासाठी खास ठरली

My Story …आणि ती रात्र आमच्यासाठी खास ठरली

अरेंज मॅरेज हा प्रकार आता तसा दुर्मिळ होत चालला आहे. जोडीदाराला पारखून लग्न करण्याचा हा काळ आहे. पण तरीसुद्धा आजही काही ठिकाणी अगदी हमखास अरेंज मॅरेज करण्याचा हट्ट केला जातो. या लग्नांमध्ये जोडीदाराला समजून घेण्यासाठी थोडा वेळ लागतो. ईशा आणि मल्हारच्या बाबतीत असे काही झाले की त्यांना एकमेकांना समजून घेण्यासाठी थोडा वेळ लागला. पण त्यानंतर त्यांच्या आयुष्यात आलेल्या त्या खास रात्रीमुळे त्याचे आयुष्य पलटून गेले. त्यांच्या संसाराची गाडी सुरळीत सुरु झाली. जाणून घेऊया त्यांची ही My story

My Story : सगळ्यांमध्ये असूनही मला एकटं वाटतं कारण

ईशा आणि मल्हारचं लग्न

shutterstock

ADVERTISEMENT

आयटी प्रोफेशनमधील मल्हारला त्याच्यासाठी योग्य जोडीदार निवडण्याची जबाबदारी त्याच्या पालकांनी घेतली होती. मुलीकडून त्याच्या फार अपेक्षा नसल्यामुळे त्याने सुयोग्य जोडीदार मिळावा इतकीच अपेक्षा केली होती. कामाच्या ठिकाणी त्याला अनेकांनी लग्नासाठी विचारणा केली होती. पण त्याला त्यापैकी कधीच कोणी आवडलं नाही. घरी लव्ह मॅरेजला विरोध होता असे नाही. पण त्याने ती जबाबदारी पालकांवर ढकलून दिली. मल्हारच्या आईने त्याला शोभेल अशी मुलगी शोधली. अगदी कोणताही वेळ न घालवता ईशा नावाच्या मुलीशी त्याचा विवाह झाला. लग्नाच्या गडबडीत मल्हार आणि ईशाला फार बोलता आले नव्हते. ईशा नोकरी करते ती बँकीग क्षेत्रात काम करते. हे त्याला माहीत होते. पण जोडीदार होण्यासाठीच्या गोष्टी त्यांना माहीत नव्हत्या. एकमेकांचा स्वभाव जाणून घेण्याची वेळ आलीच नाही. 

 ईशाला मल्हारशी बोलावे असे वाटत होते. पण मल्हारच्या आजुबाजूला पाहुण्यांचा इतका गराडा होता की, त्यांना बोलता आलेच नाही. मल्हार समजूतदार आहे हे तिला त्याच्या वागण्यावरुन कळलेच होते. पण नवरा म्हणून त्याच्याशी बोलण्याचा योग कधी येईल याची वाट ईशा पाहात होती. लग्नानंतर पूजा, पाहुण्यांच्या भेटी या सगळ्यावेळी मल्हार तिच्या आजुबाजूला होता. पण तरीही त्यांना बोलता येत नव्हतं. मल्हारला ईशाचं मन कळत होतं. पण त्याचाही नाईलाज होता. डोळ्यांनीच त्यांचे एकमेकांना इशारे सुरु होते. शिकलेली असूनसुद्धा एक शिस्त म्हणूनन ईशा त्याच्याशी लगेचच जवळीक करायला जात नव्हती. 

पण अखेर तो क्षण आलाच. आता ईशा आणि मल्हारला एकत्र राहता येणार होते. मल्हार आणि ईशा दोघांच्याही मनात अनेक प्रश्न होते. पहिली सुरुवात कोणी करावी कळत नव्हते. त्यांचा काही वेळ असाच गेला. 

 पण शेवटी दोघांनी धीर एकवटून एकमेकांशी बोलायचे ठरवले. इतरांसाठी ती त्यांची पहिली खास रात्र असली तरी त्याच्यांसाठी ही एकमेकांना जाणून घेण्याची रात्र होती. त्यांनी कोणताही वेळ न घालवता एकमेकांसोबत बोलायचे ठरवले. मल्हारने अगदी पहिल्यांदा भेटतो तशी नावासकट स्वत:ची ओळख करुन दिली. ईशाला त्याचा तो अंदाज आवडला. मग काय त्यांची ती खास रात्र त्यांनी एकमेकांना समजून, जाणून आणि ओळखून घेण्यात घालवली. त्यांनी त्या 8 तासात इतक्या गप्पा मारल्या की, त्यानंतर त्यांना परफेक्ट जोडीदार मिळाल्याचे मनापासून पटले. 

ADVERTISEMENT

#MyStory: PG मध्ये राहून बॉयफ्रेंड असणं म्हणजे…

संवाद महत्वाचा

shutterstock

नाती जुळण्यासाठी शारीरिक संबंधच महत्वाचे असतात असे नाही तर तुम्हाला एकमेकांना जाणून घेणे फारच गरजेचे असते. ईशा आणि मल्हारमध्ये संवाद या एका गोष्टीने जादू केली आणि त्यांचे आयुष्य सुखकर झाले. 

ADVERTISEMENT

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

28 Feb 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT