ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
natural-homemade-skin-toner-for-dry-skin-in-marathi

नैसर्गिक टोनर वापरून करा चेहऱ्याचा कोरडेपणा दूर

आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी महिला नेहमीच तत्पर असतात. कारण बरेचदा उन्हाळ्यात जास्त काळ बाहेर राहिल्याने त्वचा अधिक कोरडी आणि निस्तेज दिसू लागते. वास्तविक या समस्येपासून वाचण्यासाठी अनेकदा महिला उन्हाळ्यात नैसर्गिक सनस्क्रिनचा वापर करतात अथवा अन्य उत्पादनांचाही वापर करतात. पण सतत असे केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर चेहऱ्यावर केल्याने त्वचा अधिक निस्तेज होते आणि त्वचेवरील नैसर्गिक तेलही संपून जाते. त्यामुळे चेहरा अधिक खराब दिसू लागतो. त्यामुळे अधिकांश महिला बाहेरच्या उत्पादनांपेक्षा नैसर्गिक घटकांचा वापर करणे अधिक योग्य समजतात. तुम्हालाही तुमच्या चेहऱ्याची काळजी नैसर्गिक टोनर वापरून घेता येईल. चेहऱ्याचा कोरडेपणा तुम्हाला दूर करण्यासाठी घरच्या घरी टोनर बनवता येईल. हा टोनर चेहऱ्याची अत्यंत चांगली स्वच्छता ठेवतो आणि पोर्सचीही स्वच्छता करण्यास मदत करतो. याशिवाय या टोनरच्या वापरामुळे तुम्हाला कोणत्याही केमिकल्सचा त्रासही होत नाही. 

साहित्य आणि बनविण्याची पद्धत (How To Make Natural Toner At Home)

साहित्य 

  • 1 कप कोरफड जेल
  • अर्धा कप गुलाबाच्या पाकळ्या 
  • 1 चमचा नारळाचे तेल 
  • अर्धा कप पाणी 

बनविण्याची पद्धत 

  • घरीच टोनर बनविण्यासाठी  तुम्ही सर्वात पहिले एक बाऊल घ्या. त्यामुळे कोरफड जेल घाला आणि त्यात गुलाबाच्या पाकळ्या घाला
  • हे मिश्रण तुम्ही मिक्सरमधून वाटून त्याची पेस्ट करून घ्या
  • त्यानंतर यात पाणी घालून थोडे पातळ करून घ्या 
  • तुमचे टोनर तयार आहे. याचा वापर तुम्ही बाटलीत भरून ठेऊन स्प्रे मारून करून घेऊ शकता

टोनर कसे वापरावे (Toner Use For Oily Skin)

  • या टोनरचा वापर करण्यासाठी सर्वात पहिले तुम्ही तुमचा चेहरा स्वच्छ करून घ्या 
  • त्यानंतर एका कापसावर थोडेसे टोनर घ्या आणि हलक्या हाताने आपल्या चेहऱ्यावर लावा 
  • त्यानंतर तुम्ही टोनर सुकू द्या आणि साधारण 15 मिनिट्स तसंच चेहऱ्यावर ठेवा
  • नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा 

या टोनरचा वापर करण्याचे फायदे (Toner Benefits For Dry Skin)

  • कोरफड त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. कारण यामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात. हे अँटिऑक्सिडंट्स आपल्या चेहऱ्यावरील कोरडेपणा दूर करण्यासाठी मदत करतात आणि चेहऱ्याला मऊपणा देतात 
  • तुम्ही रोज बाहेर जात असाल तर तुम्ही या टोनरचा नियमित वापर करायला हवा. कारण हा टोनर तुमच्या त्वचेचे सनटॅनपासूनही संरक्षण करतो 
  • तसंच या टोनरमुळे तुमच्या त्वचेचे इन्फेक्शनपासून संरक्षण होते. तुमच्या चेहऱ्याला अधिक चमक मिळण्यास याची मदत होते 
  • यामध्ये वापरण्यात आलेल्या तेलामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहण्यास मदत मिळते. तसंच तुमच्या चेहऱ्याची पीएच लेव्हल व्यवस्थित राहाते. तुमची त्वचा मॉईस्चराईज होऊन मऊ होते आणि अधिक चांगली दिसते

टोनरमुळे चेहरा अधिक चांगला राहण्यास आणि चेहऱ्याचा कोरडेपणा दूर होण्यासाठी मदत मिळते. बाजारातील टोनर वापरण्यापेक्षा घरच्या घरी तयार केलेला हा टोनर तुम्हाला चेहऱ्यासाठी अधिक फायदा मिळवून देतो. तसंच तुम्ही घरी बनविल्यामुळे यामध्ये त्वचेला हानी न पोहचवणारे घटक आहेत. त्यामुळे त्वचा अधिक ताजीतवानी आणि चमकदार राहण्यास मदत मिळते.

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

04 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT