ADVERTISEMENT
home / Festival
Akshay Tritiya - अक्षय तृतीयेच्या दिवशी करू नका ‘ही’ कामं, होते अधोगती

Akshay Tritiya – अक्षय तृतीयेच्या दिवशी करू नका ‘ही’ कामं, होते अधोगती

आपल्याकडे अक्षय तृतीया (Akshay Tritiya) हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक उत्तम मुहूर्त मानला जातो. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्ष तृतियेला अक्षय तृतिया साजरी करण्यात येते. कोणतेही मंगल कार्य करण्यासाठी हा उत्तम दिवस समजला जातो. या दिवशी वेगळा मुहूर्त बघण्याची गरजही अजिबात भासत नाही. ही अशी तिथी आहे ज्या दिवशी एखादे मंगलकार्य केले तर त्याचा परिणाम अधिक चांगला होतो असे समजण्यात येते. पण तुम्हाला माहीत आहे का? या मंगल दिवशी अशी काही कामे आहेत जी अजिबात करता कामा नये. ही कामे केल्यास, अधोगती होते असा समज आहे. अगदी पूर्वपरंपरागत अशा कामांना नकार देण्यात येतो. ही कामं केल्यास, आपल्यावर लक्ष्मी माता प्रसन्न होत नाही असा समज आहे. पण अशी नक्की कोणती कामं आहेत जी अक्षय तृतियेच्या दिवशी करणं योग्य नाही हे आपण या लेखातून जाणून घेऊया. 

रिकाम्या हाती घरी जाऊ नये

रिकाम्या हाती घरी जाऊ नये

Freepik

अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे अत्यंत शुभे मानले जाते. या दिवशी तुम्हाला सोने खरेदी करणं जमणार नसेल तर किमान आपल्या ऐपतीनुसार एखाद्या दुसऱ्या धातूची वस्तू खरेदी करून घरी घेऊन जावे. रिकाम्या हाताने घरी जाणे या दिवशी अशुभ मानण्यात येते. त्यामुळे किमान या दिवशी कोणत्या तरी धातूची खरेदी करून घरी जावे. रिकाम्या हाताने अजिबात जाऊ नये अन्यथा घरात लक्ष्मीचा सहवास लाभत नाही असं म्हटले जाते. 

ADVERTISEMENT

जाणून घ्या अक्षय्य तृतीयेला का करतात सोन्याची खरेदी

जानवं घालू नये

या दिवशी जे ब्राह्मण जानवं घालतात. त्यांना ते बदलण्याची अथवा नवे जानवे घालण्यासाठी मनाई करण्यात येते. काही स्थानांवर या दिवशी प्रवास करू नये असंही सांगण्यात येते. महत्वाचे म्हणजे जानवे घालू नये असा समज आहे. (याचे काही विशिष्ट कारण आतापर्यंत स्पष्ट झालेले नाही. मात्र अंधश्रद्धेला आम्ही कोणतीही पुष्टी देत नाही. हा समज आहे आणि केवळ त्याबद्दल आम्ही  सांगितले आहे.)

राग येऊ देऊ नका

अक्षय तृतियेच्या दिवशी आपल्या मनात कोणत्याही व्यक्तीविषयी वाईट भावना अथवा राग ठेऊ नका. आपलं मन स्वच्छ ठेवा. कोणावरही राग करण्याआधी 10 वेळा विचार करा. कोणत्याही व्यक्तीविषयी कोणतीही वाईट भावना मनात आली तर ती भावना मनात ठेऊ नका अन्यथा घरात लक्ष्मीचा वसा राहात नाही असं समजण्यात येते. त्यामुळे ही एक गोष्ट शक्यतो टाळा असं सांगण्यात येतं. 

अक्षय तृतीया शुभेच्छा संदेश (Akshaya Tritiya Wishes In Marathi)

ADVERTISEMENT

घाणेरड्या आणि अस्वच्छ वातावरणात राहू नका

घाणेरड्या आणि अस्वच्छ वातावरणात राहू नका

Freepik

अक्षय तृतीया हा एक अत्यंत चांगला मुहूर्त आहे. या दिवशी स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी. घसाबरोबर पूजाघरही स्वच्छ करावे. जास्तीत जास्त चांगल्या वातावरणात राहण्याचा प्रयत्न करावा. देवघर आणि घरही स्वच्छ ठेवावे. जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी राहायला येते असं म्हटले जाते. त्यामुळे किमान अक्षय तृतियेच्या दिवशी तरी अस्वच्छ वातावरणात राहू नका. 

तुळशीचा वापर करताना अस्वच्छ कपडे घालू नका

या दिवशी भगवान विष्णूची पूजा करण्यात येते. तुळशीच्या पानांनी ही पूजा करावी आणि या गोष्टीची काळजी घ्यावी की, तुळशीची पाने वाहताना स्वच्छ कपडे घाला. अस्वच्छ कपडे घालून पूजा करू नये. कारण अस्वच्छ कपडे घातल्यास, अशुभ फळ मिळते असा समज आहे. 

ADVERTISEMENT

लक्ष्मी आणि विष्णूची वेगवेगळी पूजा करू नये

अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू आणि त्यांची पत्नी लक्ष्मी यांची वेगवेगळी पूजा करू नये. शक्यतो ही गोष्ट टाळावी. विष्णू आणि लक्ष्मीची जोडी म्हणजे लक्ष्मीनारायणाचा जोडा असे समजण्यात येते. त्यामुळे लग्न झालेल्या जोडप्यांची कायम साथ राहावी यासाठी असे करू नये. अशुभ मानण्यात येते. अक्षय तृतीयेच्या दिवशी एकत्र पूजा केल्याने समृद्धी आणि सौभाग्य लाभते असाही समज आहे. 

 

घराचे काम सुरू करू नये

या दिवशी घर खरेदी करणे हे अत्यंत शुभ मानले जाते. माजाणून घ्या अक्षय्य तृतीयेला का करतात सोन्याची खरेदीत्र या दिवशी घराच्या कामाला सुरूवात करणे चांगले समजण्यात येत नाही. त्यामुळे सहसा घराच्या कामाना या दिवशी सुरूवात करू नये. 

अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya): घर खरेदी आणि गृहप्रवेशासाठी शुभ काळ 
Akshaya Tritiya Greetings in English

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

12 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT