ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya): घर खरेदी आणि गृहप्रवेशासाठी शुभ काळ

अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya): घर खरेदी आणि गृहप्रवेशासाठी शुभ काळ

हिंदू कालदर्शिकेनुसार वर्षभरात साडे तीन मुहूर्त असतात जे कोणत्याही कामासाठी शुभ मानले जातात. या साडे तीन मुहूर्तामध्ये शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्त अथवा शुभ काळ पाहण्याची गरज नसते. हिंदू कॅलेंडरनुसार दसरा, गुढीपाडवा आणि ‘अक्षय्य तृतीया’ ते तीन शुभ दिवस असून दिवाळी पाडवा अर्धा शुभ मुहूर्त समजला जातो.  यासाठीच अक्षय्य तृतीयेला घर खरेदी अथवा गृहप्रवेश करण्याची पद्धत भारतात आहे. ‘अक्षय्य’ म्हणजे कधीच क्षय न होणारे म्हणजेच याचा अर्थ अनंत काळ टिकणारे असा आहे. जाणून घ्या अक्षय्य तृतीयेची माहिती आणि महत्त्व (Akshaya Tritiya Information In Marathi) अक्षय्य तृतीयेला  घर खरेदीचे टोकन देणे, गृहप्रवेश करणे अथवा नवीन घरी शिफ्ट होणे शुभ मानले जाते. अशा या शुभदिवसाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी द्या सर्वांना अक्षय तृतीया शुभेच्छा संदेश (Akshaya Tritiya Wishes In Marathi)

का करावे अक्षय्य तृतीयेला घरखरेदी

लोकांच्या मनात घर खरेदी आणि गृहप्रवेशाबाबत असलेल्या या पवित्र भावना जाणून घेत मोठ-मोठ्या गृहप्रकल्पांमध्ये अक्षय्य तृतीयेला खास ऑफर्स ठेवल्या जातात. अक्षय्य तृतीया हा घर खरेदी ग्राहक आणि विक्रेते दोघांसाठीही शुभ काळ असतो. या दिवशी घर खरेदी केल्यामुळे अथवा गृह प्रवेश केल्यामुळे घरात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी नांदते. घरात राहण्याऱ्या लोकांसाठी हा दिवस गुडलक घेऊन येतो. अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करणेही शुभ मानले जाते. अक्षय्य तृतीया कुटुंबात राहणाऱ्या सर्वांसाठी जल्लोष आणि आनंदाची असते. शिवाय आपण विकत घेतलेलं घर आपल्याला लाभदायक असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. शिवाय घर खरेदी करणं अथवा नवीन घरात राहायला जाणं हा प्रत्येकासाठी एक सुखद अनुभव असतो. घर घेणं ही आयुष्यातील एक महत्त्वाची आणि शुभ घटना असते. अनेकांचं स्वप्न असतं त्यांचे स्वतःचे घर असावे. जेव्हा हे स्वप्न पूर्ण होतं तेव्हा ते एखाद्या शुभ मुहूर्तावर व्हावं अशी प्रत्येकाच्या मनात भावना असते. यासाठीच अक्षय्य तृतीयेचा काळ घर खरेदी साठी शुभ समजला जातो. कारण या दिवशी घर खरेदी केलं अथवा स्वतःच्या घरात प्रवेश केला तर घरात सुख आणि समृद्धी येते अशी मान्यता आहे. 

instagram

ADVERTISEMENT

कसा करावा नवीन घरात गृहप्रवेश

अक्षय्य तृतीयेला घर खरेदी करताना अथवा गृहप्रवेश करताना काही विधी केले जातात. गृहप्रवेश अथवा नवीन घरात जाताना ‘कलश स्थापना’ हा मुख्य विधी केला जातो. या दिवशी घरात होमहवन, वास्तू पूजन, गणेश पूजन करतात मात्र यंदा कोरोनामुळे जरी तुम्हाला मोठया स्वरूपात धार्मिक विधी करता नाही आले तरी तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत गृहप्रवेश नक्कीच करू शकता. अक्षय्य तृतीयेला मोठी पूजा अथवा वास्तूशांत करता नाही आली तरी ‘कलश पूजा’ करणं गरजेचं आहे. या विधीसाठी घर स्वच्छ करून मुख्य दरवाजा फुलं आणि तोरणाने सजवा. घराच्या उंबरठ्यावर रांगोळीने लक्ष्मीची पावले काढा चांदीचा अथवा सोन्याचा कलश धान्य, पाणी, आणि नाण्यांनी भरून कलशावर शुभसंकेत देणारे स्वस्तिक काढा. कलशाला हळदीकुंकू लावा. कलशामध्ये आंब्याची पाने खोवून त्यावर श्रीफळ म्हणजेच नारळ ठेवा. अशा प्रकारे सजवलेला कलश डोक्यावर घेऊन गृहलक्ष्मीसह घरात प्रवेश करावा. गृहप्रवेश केल्यावर चौरंगाभोवती रांगोळी रेखाटून चौरंगावर लाल रंगाचे कापड घालावे आणि त्यावर कलशाची स्थापना करावी. कलशासमोर तूपाचा दिवा लावावा आणि धूपदीप नैवेद्य दाखवावा. कलशाशेजारी विडा आणि सुपारीच्या स्वरूपात गणपती बाप्पाची स्थापना करावी. श्रीगणेशाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. सर्व घरातील मंडळी देवाजवळ सर्वाच्या आरोग्य आणि समृद्धीचा प्रार्थना करावी. यासाठीच जाणून घ्या अक्षय्य तृतीयेचा पूजाविधी आणि पौराणिक कथा

instagram

अक्षय्य तृतीयेला गृहप्रवेश करताना या गोष्टी अवश्य लक्षात ठेवा

अक्षय्य तृतीयेला गृहप्रवेश करण्याचा विचार करत असाल तर या गोष्टी तुम्हाला माहीत असायला हव्या. 

ADVERTISEMENT
  • नवीन घरात प्रवेश करताना प्रवेश द्वाराजवळ नारळ वाढवावा. ज्यामुळे गृहप्रवेशातील सर्व अडथळे दूर होतात.
  • अक्षय्य तृतीयेला गृहप्रवेश करण्यापूर्वी घरातील जाळी जळमटं काढून घर स्वच्छ करावे. घरात दिवा लावावा. कापूर जाळावे आणि चंदन अथवा सुंगधित धूप – उदबत्ती लावावी. ज्यामुळे घरात पवित्र वातावरण निर्मिती होते.
  • गृहप्रवेश करताना कुटुंबातील लोकांनी एकमेकांसोबत कधीच भांडू नये अथवा वाद घालू नये.
  • गृहप्रवेश करताना नेहमी घरातील थोरामोठ्यांचे आर्शीवाद घ्यावे. शक्य असल्यास जवळच्या मित्र मैत्रिणी, नातेवाईकांना भोजनासाठी बोलवावे.
  • घराबाहेर तुमच्या नावाची छान नेमप्लेट लावावी. नेमप्लेट खाली कुंकुवाच्या पाण्यात हात बूडवून गृहलक्ष्मीच्या हाताचे ठसे लावावे आणि शेजारी स्वस्तिक काढावे.
  • अक्षय्य तृतीयेला गृहप्रवेश केल्यावर घरात मंत्र, श्लोकाचा जप करून आरती करावी. आरती करताना घंटानाद करावा ज्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते.

 

You Might Also Like

Akshaya Tritiya Greetings in English

फोटोसौजन्य –

ADVERTISEMENT
11 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT