चेहऱ्याची निगा राखण्यासाठी डेली स्किन केअर रूटिनसोबत गरजेचं आहे महिन्यातून एकदा फेशिअल करणं. कारण फेशिअल केल्यामुळे चेहऱ्याची त्वचा स्वच्छ तर होतेच शिवाय त्वचेखालील रक्ताभिसरणही सुधारतं. त्वचेला पुरेसा ऑक्सिजन मिळाल्यामुळे त्वचा टवटवीत होते. ताणतणाव कमी करण्यासाठी, चेहऱ्यावरील डाग, व्रण, टॅनिंग आणि एजिंगच्या खुणा कमी करण्यासाठी फेशिअलचा चांगला फायदा होतो. वीस ते तीस वयाच्या मुलींनी क्लिन अप आणि तिशीनंतर फेशिअल यासाठीच करणं गरजेचं आहे. मात्र फेशिअलनंतर त्वचेची निगा न राखल्यास त्याचा दुष्परिणाम चेहऱ्यावर दिसून येतो. यासाठीच जाणून घ्या फेशिअलनंतर कोणत्या चुका करू नये.
फेशिअलनंतरही येत नसेल चेहऱ्यावर ग्लो, तर त्वचेच्या या प्रकारानुसार घ्या स्टीम
फेशिअलनंतर करू नका या चुका
फेशिअलमध्ये चेहऱ्यावर ब्लिंचिंग, क्लिंझिंग, मसाज, स्क्रबिंग, स्टीम आणि टोनिंग, फेसमास्क अशा विविध प्रक्रिया केल्या जातात. यासाठीच फेशिअलनंतर काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.
- फेशिअल केल्यानंतर दिवसभर चेहऱ्यावर साबण, फेसवॉश, क्लिंझर्स, फेसक्रिमचा वापर करू नये.
- फेशिअल केल्यानंतर एक आठवडा कोणतीही ब्युटी ट्रिटमेंट चेहऱ्यावर करू नये.
- फेशिअलनंतर चेहऱ्यावर कोणताही घरगुती फेसपॅक लावू नये.
- फेशिअलनंतर लगेच उन्हात बाहेर पडू नये. कारण यामुळे तुमची त्वचा टॅन होतेच शिवाय त्वचा संवेदनशील झालेली असल्यामुळे त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. पहिल्यांदाच फेशिअल करणाऱ्यांसाठी खास टिप्स
- फेशिअल केल्यावर चेहरा शक्य असल्यास धुळीपासून सुरक्षित ठेवावा.
- फेशिअल केल्यावर एक आठवडाभर चेहऱ्यावर स्कबिंग करू नये.
- फेशिअलनंतर चेहरा धुतल्यावर तो टॉवेलने रगडून पुसू नये.
- फेशिअलनंतर लगेच हेअर ऑईल, हेअर वॉश अथवा हेअर ट्रिटमेंट करू नये.
- फेशिअलनंतर आयब्रोज, थ्रेडिंग, वॅक्सिंग करणे टाळावे.
- फेशिअल केल्यावर लगेच काही दिवस कोणतेही नवीन ब्युटी प्रॉडक्ट चेहऱ्यावर ट्राय करू नये. कोरड्या त्वचेसाठी बेस्ट फेशिअल किट (Best Facial Kits For Dry Skin In Marathi)
- फेशिअल केल्यावर काही दिवस कोणताही स्कीन पील मास्क चेहऱ्यावर लावू नये.
- फेशिअल केल्यावर लगेच चेहऱ्यावर हेव्ही मेकअप करू नये. एक ते दोन दिवसानंतर मेकअप करणार असाल तर त्याआधी चेहऱ्यावर प्रायमर अवश्य वापरावे.
जर तुम्ही पहिल्यांदाच फेशिअल करणार असाल तर या टिप्स तुम्हाला माहीत असायलाच हव्या. कारण फेशिअलनंतर तुम्ही त्वचेची योग्य काळजी घेतली तरच फेशिअलमुळे तुमच्या त्वचेवर हवा तसा ग्लोदेखील येईल.