ADVERTISEMENT
home / आरोग्य
औषधांसोबत कधीच खाऊ नका हे पदार्थ, होतील दुष्परिणाम

औषधांसोबत कधीच खाऊ नका हे पदार्थ, होतील दुष्परिणाम

आजारी पडल्यावर लवकर बरं होण्यासाठी डॉक्टर तुम्हाला औषधे देतात. काही औषधे घेताना पथ्य पाणी पाळावे लागते. म्हणजे या औषधांसोबत इतर काही पदार्थ टाळण्याचा सल्ला दिला जातो. कारण त्यामुळे औषधांचा परिणाम कमी होण्याची शक्यता असते. आजारपणातून बरे होण्यासाठी औषधपाण्यासोबत आहारातील पथ्ये खूप महत्त्वाची असतात. आयुर्वेदिक अथवा होमिओपॅथी औषधांसोबत डॉक्टर तुम्हाला काही पदार्थ टाळण्याचा सल्ला देतात. पण अॅलोपॅथी औषधे सुरू असताना काही पदार्थ आणि गोष्टी आवर्जून टाळायला हव्या. यासाठीच जाणून घ्या कोणते पदार्थ अथवा गोष्टी औषधोपचार सुरू असताना घेऊ नयेत. तसंच वाचा आरोग्यदायी टिप्स मराठी | Health Tips In Marathi, प्रतिकार शक्ती कमी आहे हे ओळखण्याची लक्षणे (Signs Of A Weak Immune System In Marathi) , आयुर्वेदिक काढा रेसिपी (Kadha Recipe In Marathi)

डेअरी प्रॉडक्ट्स

जर तुम्ही आजारपणासाठी अॅंटि बायोटिक्स घेत असाल तर यासोबत डेअरी प्रॉडक्टस घेऊ नये. कारण दुधातील कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि प्रोटीन्स यांचे औषधांसोबत मिश्रण झाल्यास औषधांचा परिणाम कमी होऊ शकतो. म्हणूनच अॅंटि बायोटिक्स घेत असाल तर त्यावेळी दुधाचे पदार्थ खाऊ नका.

पालेभाज्या 

पालेभाज्यांमध्ये जे घटक असतात त्यामुळे तुमच्या औषधांचा प्रभाव कमी होऊ शकतो. कारण पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन्स भरपूर असतात. जर तुमच्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन के असेल तर अशा भाज्यांसोबत वार्फारिनसारखी औषधे घेतल्यास उपचारांमध्ये बाधा येऊ शकते. हे औषध बऱ्याचदा ब्लीडिंग, रक्त गोठवणारे आजार यांसाठी दिले जाते. त्यामुळे हे औषष घेताना आहाराबाबत काळजी घ्या.

धुम्रपान- मद्यपान

औषधांसोबत मद्यपान अथवा धुम्रपान कधीच करू नये. कारण याचा दुष्परिणाम तुमच्या संपूर्ण आरोग्यावर होऊ शकतो. धुम्रपानामुळे फुफ्फुसे आणि मद्यपानामुळे यकृत खराब होण्याची शक्यता असते. औषधांसोबत व्यसने केल्यामुळे औषधांचा परिणाम तर कमी होतोच शिवाय तुमची रोग प्रतिकार शक्तीदेखील मंदावते. 

ADVERTISEMENT

एनर्जी ड्रिंक्स

अनेकांना दररोज एनर्जी ड्रिंक्स घेण्याची सवय असते. पण जर तुम्ही औषधे घेत असाल तर त्यासोबत एनर्जी ड्रिंक घेणे टाळा. याचं कारण त्यामुळे तुमची औषधे शरीरात शोषून घेण्याची क्षमता कमी होते. ज्याचा तुमच्या शरीरावर चुकीचा परिणाम होऊ शकतो. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm आले आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

05 Aug 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT