ADVERTISEMENT
home / xSEO
Health Tips In Marathi

आरोग्यदायी टिप्स मराठी | Health Tips In Marathi

जेव्हा माणूस शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या निरोगी असतो तेव्हा त्याचे आरोग्य उत्तम आहे असे म्हटले जाते. उत्तम व निरोगी आरोग्याची व्याख्या केवळ शारीरिक आरोग्याशी संबंधित नसून माणूस जेव्हा आंतर्बाह्य रोगमुक्त व समाधानी असतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने निरोगी समजला जातो. सुखी व समाधानी आयुष्यात उत्तम आरोग्याची भूमिका महत्त्वाची असते, कारण असे बरेच लोक आहेत ज्यांना आजार आहेत, परंतु त्यांचे आरोग्य त्यांना त्या रोगांशी लढण्यास सक्षम बनवत. त्यांचे बळकट शरीर त्यांना रोगांशी लढून शारीरिक तंदुरुस्ती प्राप्त करण्यात मदत करते. उत्तम आरोग्य राखलेली व्यक्ती जीवनाचा पुरेपूर आनंद उपभोगू शकतात. आपले शारीरिक आरोग्य म्हणजे आपल्या शरीराची कार्यात्मक आणि चयापचय कार्यक्षमता आणि शरीरात होणाऱ्या शारीरिक व मानसिक बदलांशी जुळवून घेण्याची क्षमता होय. ज्याची ही क्षमता उत्तम असते तो उत्तम आरोग्याचा धनी समजला जातो. हेल्दी आणि फिट राहण्यासाठी लाईफस्टाईलमध्ये थोडेसे बदल करा.

Health Tips In Marathi
Health Tips In Marathi

अधिक वाचा – कुटुंबाच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायला हवी – टीप्स

आरोग्य हे रोगाच्या विरुद्ध आहे, आणि याचा अर्थ शारीरिक, सामाजिक आणि मानसिक विकारांपासून शरीराची सुरक्षा करणे आहे. संतुलित आहार, ध्यानधारणा, प्राणायाम, नियमित व्यायाम आणि तणावाचे व्यवस्थापन अशा काही गोष्टी नियमितपणे पाळल्या तर आपले शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. जेव्हा आरोग्य आणि पोषण हा विषय येतो तेव्हा गोंधळात पडणे साहजिक आहे. कारण अनेकदा याबाबतीत तज्ज्ञांची विरोधाभासी मते वाचायला मिळतात. त्यामुळे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी खरोखर काय केले पाहिजे हे समजणे कठीण होऊ शकते. म्हणूनच या लेखात तज्ज्ञांनी सुचवलेल्या उत्तम आरोग्यासाठी काही टिप्स (Health Tips In Marathi) दिल्या आहेत ज्या तुम्हाला तुमच्या दैनंदिन आयुष्यात उत्तम आरोग्य राखण्यास मदत करतील. उत्तम आरोग्यासाठी या टिप्स (Health Tips Marathi) पाळण्यास सोप्या आहेत. तुम्ही तुमच्या रोजच्या सवयींमध्ये काही लहान मोठे बदल केलेत तर थोड्याच काळात तुम्हाला त्याचा चांगला परिणाम दिसून येईल. आपल्या दैनंदिन आयुष्यात कुठले लहान-सहान बदल करावेत हे तुम्हाला या आरोग्य टिप्स (Arogya Tips In Marathi) वाचून नक्कीच लक्षात येईल. 

निरोगी जीवनशैलीचे महत्त्व । Importance Of Healthy Lifestyle In Marathi

उत्तम आरोग्याशिवाय जीवनाला अर्थ नाही. आपले आयुष्य हे निश्चितच मौल्यवान आहे, परंतु आरोग्य (Health In Marathi) अमूल्य आहे. उत्तम आरोग्याची किंमत ही आजारी पडल्यावरच आपल्याला कळते. उत्तम आरोग्याशिवाय जीवन हे चव नसलेल्या अन्नासारखे आहे. आरोग्य आपल्याला आपले जीवन आनंदाने जगण्याची संधी देते आणि आपल्याला आपल्या इच्छेनुसार वाटेल ते करण्यास सक्षम बनवते. आपण जेव्हा निरोगी जीवनशैली जगतो तेव्हाच आपण शारीरिक व मानसिकदृष्ट्या निरोगी राहू शकतो. आपले शारीरिक आरोग्य चांगले असेल तर आपले मन देखील टवटवीत राहते व आपला आयुष्यातला उत्साह टिकून राहतो. निरोगी जीवनशैली आपल्याला अनेक गंभीर आजारांपासून दूर ठेवते आपण निरोगी आयुष्य जगू शकतो. 

ADVERTISEMENT

निरोगी जीवनशैली जगल्याने केवळ आपले आयुष्यच वाढत नाही तर आपले शरीर आणि मन देखील टवटवीत राहते. पूर्वी माणसांचे  संपूर्ण आयुष्य निसर्गाभोवतीच केंद्रित असल्याने ते निरोगी जीवनशैलीचे पालन करत असत. आता आपल्याला त्यांच्यासारखे जगायला तर जमणार नाही पण आपण स्वतःला काही चांगल्या सवयी निश्चितच लावून घेतो. या आरोग्यदायी सवय स्वतःला लावून घेणे व त्या शिस्तीत पाळणे खूप कठीण असले तरी त्यासाठी आपल्याला स्वतःशी पक्का निश्चय करावा लागतो. आणि आपल्या मानसिकतेत बदल करावा लागतो. दृढ इच्छाशक्ती आणि लक्ष्यावर केंद्रित ध्येय ठेवले तर आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात छोट्या छोट्या सवयी लावून घेऊन निरोगी जीवनशैली राखू शकतो. आपल्यापैकी बहुतेकांना अतिरिक्त वाढलेले वजन, कमी झालेला स्टॅमिना आणि निस्तेज दिसणे यासारख्या काही प्रकारच्या आरोग्य समस्या असतात. या समस्यांवर मात करण्यासाठी निरोगी जीवनशैली पाळणे अत्यंत आवश्यक आहे. आपण काही आरोग्यदायी टिप्सचे (Ayurvedic Health Tips In Marathi) पालन करून आपली जीवनशैली निरोगी बनवू शकतो. 

निरोगी जीवनासाठी आरोग्यदायी टिप्स मराठी । Health tips in Marathi 

उत्तम आरोग्य आणि निरोगी जीवनशैली आपल्या शरीरातील उर्जा वाढविण्यात आणि प्रत्येक क्रिया चांगली करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. निरोगी जीवनशैलीचा अवलंब केल्यास आपल्याला संतुलित आहार व पुरेशी झोप घेण्याची सवय लागते. यामुळे अनेक गंभीर रोग आपल्यापासून चार हात लांब राहतात. संतुलित व निरोगी आहार घेतल्याने शरीराला सर्व आवश्यक ती पोषक तत्त्वे मिळतात जी आपल्या शरीराची कार्ये अचूकपणे चालण्यासाठी आवश्यक असतात. तुम्ही या सोप्या आरोग्यदायी टिप्सचे (Health Tips In Marathi) पालन केले तर तुम्हाला निरोगी शरीर व शांत मन मिळणे अधिक सोपे होईल.  

तुम्ही संतुलित आहार घेत असालआणि दररोज पुरेसा व्यायाम करत असाल तर यामुळे तुम्हाला चांगली झोप मिळेल आणि तुम्ही दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही राहाल. जर आपण निरोगी जीवनशैलीचा अवलंबली तर त्याचा थेट परिणाम आपल्या दैनंदिन आयुष्यावर होतो. तुमचे शरीर अधिक तंदुरुस्त आणि निरोगी बनते. सर्व गोष्टींचा एकत्रितपणे परिणाम म्हणजे माणूस आनंदी व दीर्घायुषी होतो. या लेखात तुम्हाला निरोगी जीवनशैली कशी मिळवावी यासाठी सोप्या टिप्स (Health Care Tips In Marathi) दिलेल्या आहेत. 

निरोगी जीवनशैली पाळली तर आपली त्वचा निरोगी आणि अधिक काळ तरुण राहते. आपले केस चमकदार व दाट राहण्यास मदत होते आणि एकूणच शरीराचे आरोग्य (Health In Marathi) सुधारते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगली निरोगी जीवनशैली अनेक गंभीर आजार, अनेक धोकादायक विषाणू आणि जीवाणूंविरुद्ध प्रतिकारशक्ती प्रदान करते. परंतु तुमची जीवनशैली ही निष्क्रिय असेल तर तुम्हाला कर्करोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, हॉर्मोनल असंतुलन हे आणि इतर अनेक हानिकारक आजार होऊ शकतात.म्हणूनच

ADVERTISEMENT

पुढील काही सामान्य आरोग्यदायी टिप्स पाळा (Health Tips Marathi) आणि उत्तम आरोग्य मिळवा आणि सुदृढ शरीरप्रकृतीसाठी या सोप्या टीप्स फॉलो करा.

आरोग्यदायी टिप्स मराठी । Health tips in Marathi
आरोग्यदायी टिप्स मराठी । Health tips in Marathi 
 1. कायम वजनाकडे लक्ष ठेवा आणि योग्य वजन राखा. वजन अतिरिक्त प्रमाणात वाढले तर त्यामुळे अनेक गंभीर आजारांना तोंड द्यावे लागते. 
 2. दररोज किंवा दर आठवड्याला वजन मोजा. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आहारात व व्यायामात योग्य ते बदल करता येतील.
 3. जंक फूड व फास्ट फूडचे सेवन मर्यादित करा आणि संतुलित आहार घ्या. 
 4. रोज सकाळची न्याहारी करण्यास विसरू नका. आहारात प्रोटीन व फायबरचे प्रमाण अधिक ठेवा व फॅट्स आणि साखरेचे प्रमाण मर्यादित ठेवा. ताजे, सकस व पौष्टिक जेवण घ्या. 
 5. रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी रोजच्या आहारात सिझनल फळे व भाज्यांचा समावेश करा. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने मल्टीविटामिन सप्लिमेंट्स घ्या. तुमच्या शरीरात पोषक तत्वांची पातळी योग्य ठेवण्यासाठी दररोज मल्टीविटामिन सप्लिमेंट घेणे हा एक उत्तम पर्याय आहे. कारण अनेक व्हिटॅमिन्स आपल्याला रोजच्या अन्नातून मिळतीलच असे नाही. 
 6. व्हिटॅमिन A, B6, B12, C, D आणि E, तसेच जस्त, लोह, तांबे, सेलेनियम आणि मॅग्नेशियम हे पोषक घटक आपल्या शरीराचे कार्य योग्य प्रकारे चालण्यासाठी आवश्यक असतात. म्हणून त्यासाठी आवश्यकता असेल तर डॉक्टरांना विचारून मल्टीव्हिटॅमिन सप्लिमेंट घ्या. 
 7. दररोज योग्य प्रमाणात पाणी प्या आणि हायड्रेटेड रहा. बाजारात मिळणाऱ्या साखरयुक्त पेयांचे सेवन शक्यतोवर टाळा किंवा मर्यादित ठेवा. त्याऐवजी नारळपाणी, ताक, लिंबू सरबत, घरी काढलेले फळांचे ताजे रस यांचे सेवन करणे फायदेशीर आहे. पण यातही अतिरिक्त प्रमाणात साखर घालू नका. साध्या पाण्याबरोबरच डिटॉक्स वॉटर किंवा इन्फ्युज्ड वॉटर प्या.
 8. नियमित व्यायाम करा आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय व्हा. जिममध्ये जाणे जमत नसल्यास घरीच व्यायाम करणे ही चांगली कल्पना आहे. दररोज किमान तीस मिनिटे चालणे किंवा सायकलिंग किंवा योगासने करणे तब्येतीसाठी उत्तम आहे. 
 9. तुमचा स्क्रीनटाईम मर्यादित ठेवा. संगणकावर बराच वेळ घालवल्यास मधुमेह आणि हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका संभवतो. म्हणूनच कामाचे काही तास सोडल्यास इतर वेळेला डोळे व संपूर्ण आरोग्य जपण्यासाठी स्क्रीनटाईम मर्यादित ठेवा. 
 10.  पुरेशी शांत झोप घ्या. तुमच्या झोपेची गुणवत्ता आणि प्रमाण व तुमची रोगप्रतिकारक शक्ती यांचा जवळचा संबंध आहे. जर आपल्याला पुरेशी झोप व विश्रांती मिळाली नाही तर आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि मेंदूवर देखील वाईट परिणाम होतो. म्हणूनच दररोज रात्री सात ते आठ तासांची झोप घेणे आवश्यक आहे. 
 11. मद्यपान व धुम्रपानापासून लांब राहा. धुम्रपानामुळे शरीराची प्रचंड हानी होते व अनेक गंभीर रोगांचा धोका निर्माण होतो. म्हणूनच धूम्रपान पूर्णपणे टाळा. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन अजिबात करू नका. मद्यपानामुळेही लिव्हर व किडनीच्या आरोग्यावर परिणाम होतात त्यामुळे शक्यतोवर मद्यपान करणे टाळा किंवा मद्यपानाचे प्रमाण मर्यादित ठेवा. 
 12. शारीरिक आरोग्याप्रमाणेच मानसिक व भावनिक आरोग्याचीही काळजी घ्या. आयुष्यातील ताणतणाव व भावनांचे योग्य व्यवस्थापन करा. जर तुम्हाला काही कारणाने नैराश्य किंवा अँझायटी किंवा इतर काही मानसिक त्रास होत असेल तर वेळीच वैद्यकीय मदत घेण्यास संकोच करू नका. 
 13. आपल्या मानसिक आरोग्याचा शारीरिक आरोग्याशी खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे मानसिक आरोग्य जपणे देखील तितकेच महत्वाचे आहे. प्राणायाम व ध्यानधारणा करणे, रोजनिशी लिहिणे, छंद जोपासणे, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे यामुळे मनावर सकारात्मक परिणाम होतात आणि मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

त्वचेसाठी आरोग्यदायी टिप्स | Healthy Skin Tips In Marathi

त्वचा हा शरीराचा सर्वात मोठा अवयव आहे. आपल्या शरीराचे संरक्षण करण्याचे महत्वाचे काम त्वचा करते. त्वचा निरोगी असताना आपले विविध आजारांपासून संरक्षण करण्यासाठी कठोर परिश्रम करते. पण जेव्हा त्वचेच्या आरोग्याशी तडजोड केली जाते तेव्हा शरीराचे संरक्षण करण्याची त्वचेची क्षमता बिघडते. त्यामुळे त्वचेची नियमितपणे काळजी (Healthy Skin Tips In Marathi)  घेणे महत्वाचे आहे. रोज काही गोष्टींचे नियमतपणे पालन केल्यास त्वचेचे आरोग्य टिकून राहण्यास मदत होते. त्वचेची काळजी घेण्यासाठी पुढील टिप्सचे (Skin Care Tips In Marathi) पालन करा आणि सुंदर व निरोगी त्वचा मिळवा आणि जाणून घ्या उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल.

त्वचेसाठी आरोग्यदायी टिप्स | Healthy Skin Tips In Marathi
त्वचेसाठी आरोग्यदायी टिप्स
 1. त्वचेचे उन्हापासून संरक्षण करा. त्वचेची काळजी घेण्याची सर्वात महत्वही पायरी म्हणजे सूर्यापासून संरक्षण करणे होय. सूर्यप्रकाशामुळे सुरकुत्या, त्वचेवर डाग पडणे आणि इतर समस्या उद्भवू शकतात व त्वचेच्या कर्करोगाचा धोका देखील वाढतो.
 2. म्हणूनच उन्हात जाताना कमीतकमी 15 च्या SPF सह ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन वापरा. ​​ढगाळ वातावरण असले तरीही सनस्क्रीन लावा, 
 3. सकाळी 10 ते संध्याकाळी 4 या दरम्यान उन्हात बाहेर जाणे टाळा. कारण या काळात सूर्याची किरणे सर्वात तीव्र असतात.
 4. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी लांब बाह्यांचे शर्ट व फुलपँट घाला. शक्य असेल तर मोठ्या हॅटने तुमची त्वचा झाकून टाका
 5.  धूम्रपान टाळा.  धूम्रपानामुळे तुमची त्वचा अकाली वृद्ध दिसू लागते आणि सुरकुत्या पडतात. धुम्रपान त्वचेच्या बाहेरील थरांमधील लहान रक्तवाहिन्या अरुंद करते, ज्यामुळे रक्त प्रवाह कमी होतो आणि त्वचा निस्तेज होते. 
 6. धुम्रपान केल्याने त्वचेमधील कोलेजन आणि इलास्टिनचे देखील मोठे नुकसान होते व त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढतो. 
 7.  आंघोळीसाठी खूप गरम पाणी घेऊ नका आणि दीर्घ काळ उष्ण पाण्याच्या संपर्कात राहू नका. यामुळे त्वचेतील आर्द्रता कमी होते व त्वचा कोरडी पडते. आंघोळीसाठी शक्यतोवर कोमट पाणी वापरा.
 8. हार्श साबण वापरू नका. साबण आणि डिटर्जंट तुमच्या त्वचेतून आर्द्रता काढून टाकू शकतात. त्याऐवजी, सौम्य प्रकारचा साबण वापरा.
 9. आपल्या त्वचेचे संरक्षण  करण्यापूर्वी शेव्हिंग करताना शेव्हिंग क्रीम, लोशन किंवा जेल लावा. तसेच त्वचेला इजा होऊ नये म्हणून प्रत्येक वेळेला स्वच्छ व धारदार रेझर वापरा. केस ज्या दिशेने वाढतात त्याच दिशेने शेविंग करा. 
 10. आंघोळ केल्यावर किंवा चेहेरा धुतल्यानंतर त्वचा खसाखसा न पुसता टॉवेलने हलक्या हाताने पाणी पुसून टाका जेणेकरून तुमच्या त्वचेवर थोडा ओलावा शिल्लक राहील.
 11. कोरड्या त्वचेला मॉइश्चरायझ करा. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुमच्या त्वचेला अनुकूल असे मॉइश्चरायझर वापरा.
 12. सकस आहार घ्या. आपल्या शारीरिक आरोग्याप्रमाणेच त्वचेच्या आरोग्यासाठीही निरोगी आहार घेणे आवश्यक आहेत. भरपूर ताजी फळे, भाज्या, प्रक्रिया न केलेले धान्य आणि प्रथिने यांचा आहारात नियमितपणे समावेश करा.
 13. योग्य प्रमाणात पाणी प्या. भरपूर पाणी प्यायल्याने तुमची त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. 
 14. ताणतणावाचे व्यवस्थापन करा. तणावाचा आपल्या त्वचेवरही परिणाम होऊ शकतो. व त्वचा अधिक संवेदनशील बनवू शकतो. त्यामुळे मुरुमांचा त्रास आणि इतर त्वचेच्या समस्या होऊ शकतात. म्हणूनच तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी पुरेशी झोप घ्या, संतुलित आहार घ्या. योग्य व नियमित व्यायाम करा आणि तुम्हाला आनंद मिळेल अशा गोष्टी करण्यासाठी वेळ काढा.

हे उपाय केलेत तर तुम्हाला सुंदर व निरोगी त्वचेचे वरदान मिळेल. 

अधिक वाचा – पावसाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी

ADVERTISEMENT

सुंदर आणि निरोगी केसांसाठी आरोग्यदायी टिप्स | Healthy Hair Tips In Marathi

आपले केस कसे आहेत यात आनुवंशिकता महत्त्वाची भूमिका बजावते. परंतु आपला आहार, जीवनशैली व वातावरण यांचाही आपल्या केसांवर मोठा परिणाम होतो. केसांची काळजी घेण्याचा तुमचा एकूण दृष्टीकोन कसा आहे यावरही तुमच्या केसांचे आरोग्य ठरते. आपल्या डोक्याच्या संरक्षणासाठी असलेले आपले केस सुंदर, लांब व दाट (Hair Growth Tips In Marathi) असावेत असे प्रत्येकालाच वाटते. पण त्यासाठी केसांची काळजी (Hair Care Tips In Marathi) अगदी निगुतीने घ्यावी लागते. केस गळतीवर घरगुती उपाय करता येतात. केसांचे आरोग्य राखण्यासाठी व त्यांची काळीज घेण्यासाठी (Tips For Healthy Hair In Marathi) पुढील टिप्स वाचा. 

सुंदर आणि निरोगी केसांसाठी आरोग्यदायी टिप्स | Healthy Hair Tips In Marathi
सुंदर आणि निरोगी केसांसाठी आरोग्यदायी टिप्स
 1.  केसांच्या आरोग्यासाठी प्रथिने अत्यंत आवश्यक आहेत. केस आणि टाळूच्या आरोग्यासाठी योग्य आहार हा एक महत्त्वाचा घटक आहे. केस प्रामुख्याने प्रथिनांपासून बनलेले असतात, म्हणून दररोज आहारात किमान 45 ग्रॅम प्रथिने घ्या. 
 2. प्रोटीनच्या कमतरतेमुळे केस कमकुवत व ठिसूळ केस होतात. तसेच ते निस्तेज होतात व गळतात. 
 3. झिंकच्या कमतरतेमुळे केस गळू शकतात. यासाठी आहारात नट्स, अक्रोड, पेकान, काजू आणि बदाम यांसारख्या पदार्थांचा समावेश करा.
 4. तसेच आहारात भरपूर प्रमाणात भाज्या, फळे, हिरव्या पालेभाज्या, सॅलड्स घ्या. व भरपूर प्रमाणात पाणी प्या. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने मल्टीव्हिटॅमिन सप्लिमेंट घ्या. 
 5. ओमेगा -3 फॅटी ऍसिडचे सेवन वाढवल्याने केसांची मुळे आणि सेबेशियस ग्रंथी उत्तेजित होऊ शकतात. यामुळे टाळूचे आरोग्य सुधारते
 6. तुम्ही आठवड्यातून किती वेळा केसांना शॅम्पू लावता यावर देखील केसांचे आरोग्य अवलंबून असते. तुमचे केस तेलकट असतील तर तुम्हाला जास्त वेळेला केस धुण्याची गरज असते. आपल्या केसांची गरज ओळखून त्यानुसार केस धुण्याचे वेळापत्रक ठरवा व शक्यतोवर ऑरगॅनिक उत्पादनांचा वापर करा.
 7. केसांसाठी योग्य शॅम्पू निवडा. चुकीचे शॅम्पू आणि स्टाइलिंग एजंट वापरल्याने केसांचे नुकसान होऊ शकते. तुमच्या केसांच्या प्रकारासाठी योग्य असलेली उत्पादने निवडा.  अमोनियम लॉरील सल्फेट किंवा सोडियम लॉरील सल्फेट सारखे कठोर घटक असलेले शॅम्पू शक्यतोवर टाळा.
 8. केस धुतल्यावर त्यांचे कंडिशनिंग करणे ही केस मऊ, चमकदार ठेवण्यासाठी एक महत्त्वाची पायरी आहे. तुमच्या केसांसाठी कोणते कंडिशनर योग्य आहे हे शोधून काढा व ते वापरा. 
 9. दिवसातून एकापेक्षा जास्त वेळा केस धुवू नका. केस धुताना खूप गरम किंवा खूप थंड पाणी वापरणे टाळा.
 10. केस ओले असताना हळूवारपणे हाताळा कारण ते ओले असताना तुटण्याची शक्यता जास्त आहे. ओले केस टॉवेलने जास्त खसाखसा पुसू नका. विलग करण्यासाठी जाड व रुंद दात असलेला कंगवा वापरा, परंतु ओले केस जास्त ब्रश करू नका.
 11. केस ब्लो ड्राय करताना सर्वात कमी सेटिंगपासून प्रारंभ करा आणि आवश्यकतेनुसार हळूहळू उष्णता वाढवा. जेव्हा शक्य असेल तेव्हा तुमचे केस नैसर्गिकरित्या हवेत कोरडे होऊ द्या.
 12. केसांच्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी आणि रक्ताभिसरण वाढविण्यासाठी आपल्या टाळूला नियमितपणे मालिश करा.
 13. केस निरोगी ठेवण्यासाठी आणि तुटणे टाळण्यासाठी – प्रत्येक 10 ते 12 आठवड्यांनी – नियमितपणे केसांना खालून कट द्या. 

अधिक वाचा – कोरड्या आणि निस्तेज केसांसाठी घरगुती उपाय

उन्हाळ्यासाठी काही हेल्थ टिप्स मराठी  | Summer Health Tips In Marathi

उन्हाळा हा ऋतू तीव्र स्वरूपाचा असतो त्यामुळे या ऋतूमध्ये आरोग्याच्या अनेक समस्या होऊ शकतात. उन्हाळा सुरु झाला की तब्येत जपण्यासाठी आपल्याला आहार आणि इतर राहणीमानातही बदल करावे लागतात. या उन्हाळ्यात त्रास होऊ नये म्हणून या टिप्सचे (Summer Health Tips In Marathi) पालन करा जेणे करून तुम्हाला उन्हाळ्याचा फार त्रास होणार नाही.  

उन्हाळ्यासाठी काही हेल्थ टिप्स मराठी  | Summer Health Tips In Marathi
उन्हाळ्यासाठी काही हेल्थ टिप्स मराठी  | Summer Health Tips In Marathi
 1. उन्हाळ्यात उष्माघात होण्याचा धोका असतो. हा हायपरथर्मियाचा एक गंभीर प्रकार आहे. उष्माघात होतो कारण आपल्या शरीरात जास्त उष्णता शोषली जाते. ही एक गंभीर स्थिती आहे आणि यासाठी त्वरित वैद्यकीय उपचार होणे आवश्यक आहे. 
 2. उष्माघाताचा त्रास झाल्यास त्वरित शरीराचे तापमान कमी करणे महत्वाचे आहे. म्हणून उष्माघात झाल्यावर थंड पाण्याने आंघोळ करा. सैल व हलके कपडे घाला व भरपूर पाणी प्या. उन्हात असताना अंगमेहनतीची कामे शक्यतोवर टाळा. 
 3. उन्हाळ्यात हात पाय किंवा ओटीपोटात उष्णतेमुळे किंवा डिहायड्रेशनमुळे क्रॅम्प आल्यास थंड ठिकाणी विश्रांती घ्या. फळांचे रस किंवा इलेक्ट्रोलाइट-समृद्ध पेय प्या. क्रॅम्प कमी झाल्यानंतरही अंगमेहनत करू नका कारण यामुळे उष्माघात होऊ शकतो.
 4. उन्हाळ्यात उष्णतेमुळे खूप घाम येणे, अशक्तपणा, चक्कर येणे, डोकेदुखी, मळमळ, शुद्ध हरपणे, क्रॅम्प येणे हे त्रास होतात अशा वेळी  थंड जागी विश्रांती घ्या. नारळपाणी, घरगुती सरबते, ताक, लिंबूपाणी अशी पेये प्या.थंड पाण्याने आंघोळ करा किंवा स्पंज बाथ घ्या. सुती व हलके कपडे वापरा.
 5. उन्हाळ्यात डिहायड्रेशनचा त्रास होतो. तोंड आणि डोळे कोरडे पडतात, त्वचा कोरडी पडते. घाम येत नाही . हातात किंवा पायांत क्रॅम्प येतात मळमळणे, हृदय धडधडणे आणि चक्कर येणे असा त्रास झाल्यास भरपूर प्रमाणात पाणी व द्रव पदार्थ प्या.
 6. उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेतली नाही तर उष्णतेच्या जास्त संपर्कामुळे त्वचा लाल होते. जास्त उष्णतेमुळे रक्तवाहिन्या प्रसरण पावतात म्हणून त्वचेवर लालसरपणा दिसून येतो.यासाठी: थेट सूर्यप्रकाशात जाणे टाळा व नेहमी SPF 30+ असलेले चांगले सनस्क्रीन वापरा
 7. जेव्हा आपण थेट सूर्यप्रकाशात बरेच तास घालवतो तेव्हा अल्ट्राव्हायोलंट रेडिएशनमुळे त्वचेला त्रास होतो. . म्हणूनच सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत जेव्हा सूर्यप्रकाश तीव्र असतो तेव्हा घरातच थांबा. बाहेर पडू नका. सनबर्न झाल्यास त्यावर काकडीचा रस, दोन कप चूर्ण दूध आणि दोन चमचे सुक्या लैव्हेंडरच्या फुलांचा रस एकत्र करून लावा. 
 8. उन्हाळ्यात घामोळ्यांचा त्रास होतो. अशा वेळी थंड शॉवर घेणे, सैल कपडे घालणे, आंघोळीनंतर टॅल्कम पावडर लावणे व पुरळांवर कॅलामाइन लोशन लावणे हे उपाय आपण करू शकतो. 
 9. उन्हाळ्यात कलिंगड/ टरबूज दही आणि इतर थंड पदार्थ खाणे आवश्यक आहे. अशा पदार्थांमध्ये कॅलरीज कमी असतात आणि व ते पचायलाही हलके असतात. उन्हाळ्यातही आपल्याला पौष्टिक आहार आवश्यक असतो. म्हणून  फळे, भाज्या, दूध, तृणधान्ये, मांस, कडधान्ये आणि स्निग्ध पदार्थ यांचा आहारात समावेश करा. 

अधिक वाचा- उन्हाळ्यात डिहायड्रेशनपासून वाचण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

ADVERTISEMENT

गरोदरपणासाठी हेल्थ टिप्स मराठी  | Pregnancy Health Tips In Marathi

गर्भावस्थेचा काळ हा स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा काळ असतो. अशा वेळी स्त्रीच्या उदरात एक जीव वाढत असतो. आईची व पोटातील बाळाची तब्येत देखील नाजूक असते. त्यामुळे या परिस्थितीत गरोदर स्त्रियांच्या आरोग्याची काळजी (Pregnancy Care Tips In Marathi) घेणे अत्यंत आवश्यक आहे. गरोदरपणात कुठली काळजी घ्यायला हवी यासाठी पुढील टिप्स (Pregnancy Tips In Marathi) वाचा. तसेच गरोदरपणात काय खावे हे जाणून घ्या.

गरोदरपणासाठी हेल्थ टिप्स मराठी  | Pregnancy Health Tips In Marathi
गरोदरपणासाठी हेल्थ टिप्स मराठी 
 1. गरोदरपणात तुम्हाला स्वतःच्या तब्येतीविषयी किंवा बाळाच्या वाढीविषयी कुठलीही शंका असल्यास तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा. तुमची मासिक पाळी चुकली असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कारण पहिल्या तीन महिन्यांत तब्येत जपणे खूप आवश्यक असते. 
 2. गरोदरपणात तुमच्याच आहारावर बाळाची तब्येत व वाढ तसेच तुमचेही आरोग्य अवलंबून असते. म्हणूनच आहारात विविध आरोग्यदायी व पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. गर्भावस्थेत कुठला आहार घ्यायला हवा याबद्दल आहारतज्ज्ञांशी चर्चा करून तुमचा डाएट प्लॅन बनवून घ्या.
 3. गर्भावस्थेत तुम्ही अन्नाच्या गुणवत्तेकडे व स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे व अन्न सेवनाबद्दल जागरूक असले पाहिजे कारण त्याचा थेट परिणाम तुमच्या बाळाच्या आरोग्यावर होतो. कमी शिजलेले मांस किंवा पाश्चराईज न केलेले दूध तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी विषारी आणि घातक ठरू शकते.
 4. धुम्रपानामुळे गर्भामध्ये दोष तयार होण्याचा धोका तिप्पट होतो.म्हणूनच गरोदरपणात अजिबातही धूम्रपान करू नये.
 5. गर्भावस्थेत तुम्हाला चालतील असे व्यायाम करा. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य त्या स्ट्रेचिंग एक्सरसाइज केल्याने तुमच्या स्नायूंना आराम मिळेल आणि क्रॅम्प्स येणे कमी होईल.  हे व्यायाम केल्याने तुमचे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत मिळेल. हे व्यायाम तुम्हाला तुमच्या संपूर्ण गर्भधारणेदरम्यान फिट राहण्यास मदत करतील व बाळंतपणाची प्रक्रिया देखील सुलभ होण्यास मदत मिळेल आणि गर्भधारणेनंतरचे वजन लवकर कमी करण्यात मदत होईल.
 6. गरोदरपणात आहारात सुपर फूड्स समाविष्ट करा. क्विनोआ, ब्रोकोली, एवोकॅडो, ब्लूबेरी, फ्लेक्स सीड्स हे पौष्टीक पदार्थ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. 
 7. दररोज किमान 8-10 ग्लास पाणी प्या. थकवा आणि चक्कर येणे टाळण्यासाठी स्वतःला चांगले हायड्रेटेड ठेवा.
 8. दारूचे व्यसनबाळाच्या आरोग्यासाठी व वाढीसाठी हानिकारक आहे. यामुळे जन्मजात दोष, विकार किंवा गर्भपात देखील होऊ शकतो.म्हणूनच संपूर्ण गरोदरपणात व स्तनपानाच्या काळात देखील मद्याला स्पर्शही करू नका. 
 9. तुम्हाला कॉफी आवडत असेल तर त्याचे मर्यादित प्रमाणात तुम्ही सेवन करू शकता. पण खूप जास्त कॅफीनमुळे गर्भपात होण्याचा धोका वाढतो. म्हणूनच कॉफीचे प्रमाण मर्यादित ठेवा. 
 10. गरोदरपणात जास्त श्रम करू नका. शक्य तितका आराम करा! स्वतःच्या शरीराला आणि मनाला जास्त ताण देऊ नका. 

अधिक वाचा – गरोदरपणात करायचे व्यायाम

निरोगी हृदयासाठी हेल्थ  टिप्स | Heart Health Tips In Marathi

संतुलित आहार, नियमितपणे व्यायाम करणे व तणावाचे व्यवस्थापन करणे अशा निरोगी जीवनशैलीमुळे हृदय निरोगी राहते. हृदयाची काळजी घेण्यासाठी तुम्ही या टिप्स (Heart Health Tips In Marathi) फॉलो करू शकता. 

निरोगी हृदयासाठी हेल्थ  टिप्स | Heart Health Tips In Marathi
निरोगी हृदयासाठी हेल्थ  टिप्स | Heart Health Tips In Marathi
 1. हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी धूम्रपान सोडा. कोरोनरी हृदयविकाराच्या मुख्य कारणांपैकी धूम्रपान हे एक प्रमुख कारण आहे. 
 2. सक्रिय जीवनशैलीचा अवलंब करा. सक्रिय राहणे तुमच्या हृदयविकाराचा धोका कमी करू शकते. व्यायाम हा एक उत्तम मूड बूस्टर आणि स्ट्रेस बस्टर आहे.  दर आठवड्याला 150 मिनिटे मध्यम-तीव्रता एरोबिक व्यायाम करा. हे लक्ष्य साध्य करण्याचा एक मार्ग म्हणजे आठवड्यातून 5 दिवस 30 मिनिटे व्यायाम करणे. तुम्हाला जेथे शक्य असेल तेथे चालत जा किंवा सायकल चालवा. 
 3. तुमचे वजन व्यवस्थापित करा. जास्त वजनामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. नियमित शारीरिक हालचालींसह भरपूर फळे आणि भाज्या, चरबी आणि कमी साखर असलेला निरोगी, पौष्टिक व संतुलित आहार घ्या.
 4. भरपूर फायबर खा. हृदयविकाराचा धोका कमी करण्यात मदत करण्यासाठी दिवसातून किमान 30 ग्रॅम फायबर खा 
 5. जास्त प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट असलेले पदार्थ खाल्ल्याने तुमच्या रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते. यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. कमी फॅट्स असलेले पदार्थ आहारात घ्या. च
 6. आहारात मीठ कमी करा. निरोगी रक्तदाब राखण्यासाठी, जास्त मीठ खाणे टाळा आणि आपल्या स्वयंपाकात कमी मीठ घालण्याचा प्रयत्न करा.
 7. जर एखाद्या पदार्थामध्ये 1.5 ग्रॅम मीठ (किंवा 0.6 ग्रॅम सोडियम) प्रति 100 ग्रॅमपेक्षा जास्त असेल तर त्यात मीठ जास्त आहे. तो पदार्थ तुम्ही खाऊ नका.  प्रौढांनी दिवसभरात एकूण 6 ग्रॅमपेक्षा कमी मीठ खावे. 
 8. मासे खा. पिलचार्ड्स, सार्डिन आणि सॅल्मन यांसारखे मासे हे ओमेगा-३ फॅट्सचे स्त्रोत आहेत, जे हृदयरोगापासून संरक्षण करण्यास मदत करू शकतात.
 9. मद्याचे सेवन मर्यादित ठेवा. कारण अल्कोहोलमध्ये कॅलरीज असतात. नियमितपणे जास्त मद्यपान केल्याने तुमच्या हृदयावर परिणाम होऊ शकतो. 

अधिक वाचा – हार्ट अटॅक येण्याची लक्षणे

ADVERTISEMENT

सुंदर आणि निरोगी डोळ्यांसाठी आरोग्यदायी टिप्स  | Eye Health Tips In Marathi

डोळे हा एक अत्यंत महत्वाचा परंतु नाजूक अवयव आहे. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. तुमचे डोळे निरोगी ठेवण्यासाठी आणि दृष्टी चांगली ठेवण्यासाठी या टिप्स (Eye Health Tips In Marathi) वाचा. 

निरोगी डोळ्यांसाठी आरोग्यदायी टिप्स  | Eye Health Tips In Marathi
निरोगी डोळ्यांसाठी आरोग्यदायी टिप्स 
 • डोळे चांगले ठेवण्यासाठी निरोगीव संतुलित आहार घ्या. तुमच्या आहारात भरपूर किंवा फळे आणि भाज्यांचा समावेश करा., विशेषतः हिरव्या पालेभाज्या आणि ओमेगा-३ फॅटी ऍसिडचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ खाल्ल्याने डोळ्यांना फायदा होतो.
 • जास्त वजन किंवा लठ्ठपणामुळे मधुमेह होण्याचा धोका वाढतो. मधुमेहामुळे डायबेटिक रेटिनोपॅथी किंवा काचबिंदू होण्याचा धोका जास्त असतो. म्हणूनच वजन आटोक्यात ठेवा. 
 • व्यायामामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यात मदत होऊ शकते. या आजारांमुळे डोळ्यांच्या किंवा दृष्टीच्या काही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. 
 • तीव्र सूर्यप्रकाशामुळे डोळे खराब होऊ शकतात आणि मोतीबिंदू आणि मॅक्युलर डिजेनेरेशनचा धोका वाढू शकतो. UV-A आणि UV-B दोन्ही रेडिएशन 99 ते 100% रोखतील असे सनग्लासेस वापरून आपल्या डोळ्यांचे संरक्षण करा. 
 •  डोळ्यांना दुखापत होऊ नये म्हणून, काही खेळ खेळताना किंवा जोखमीचे काम करताना डोळ्यांचे संरक्षण आवश्यक आहे.
 • धुम्रपान टाळा. धूम्रपानामुळे  मॅक्युलर डिजेनेरेशन आणि मोतीबिंदू असे डोळ्यांचे आजार होण्याचा धोका वाढतो आणि ऑप्टिक नर्व्हचे नुकसान होऊ शकते.
 • डोळ्यांचे काही आजार अनुवांशिक असतात.  त्यामुळे तुमच्या कुटुंबातील कोणाला डोळ्यांचे विकार असल्यास नियमितपणे डोळ्यांची तपासणी करून घ्या. डोळ्यांचे आजार व उपचार जाणून घ्या.
 • कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरत असल्यास संक्रमण टाळण्यासाठी कॉन्टॅक्ट लॅन्ड घालताना आधी आपले हात स्वच्छ धुवा. तसेच लेन्सना योग्यरित्या कसे स्वच्छ करावे यावरील सूचनांचे अनुसरण करा आणि आवश्यकतेनुसार बदला.
 • जर तुम्ही संगणक बराच वेळ बघत असाल तर तुम्ही डोळे मिचकावणे विसरू शकता आणि तुमचे डोळे थकू शकतात. डोळ्यांवर येणारा ताण कमी करण्यासाठी, 20-20-20 हा नियम वापरून पहा: दर 20 मिनिटांनी, 20 सेकंदांसाठी आपल्या समोर सुमारे 20 फूट दूर पहा. डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी हा उपाय करा.

अधिक वाचा – अंडरआय बॅग किंवा डोळ्याखालील सूज कमी करण्याचे घरगुती उपाय

दररोज लागणाऱ्या हेल्थ टिप्स  | Daily Health Tips In Marathi

निरोगी जीवनासाठी दैनंदिन दिनचर्येत काही छोटे मोठे बदल केलेत तर तुम्हाला निरोगी जीवनशैली जगता येऊ शकते. या सोप्या टिप्स पाळा (Daily Health Tips In Marathi) आणि उत्तम आरोग्य मिळवा. 

दररोज लागणाऱ्या हेल्थ टिप्स  | Daily Health Tips In Marathi
दररोज लागणाऱ्या हेल्थ टिप्स 
 •  दिवसाची सुरुवात एक ग्लास लिंबू पाण्याने करा. अर्ध्या लिंबाचा रस पाण्यात घाला आणि दिवसाची सुरुवात ताजेतवाने करण्यासाठी हे प्या. लिंबाचा रस तुमच्या शरीरातील आम्लतेची पातळी कमी करतो, ज्यामुळे, फंगल इन्फेक्शन आणि ऑस्टिओपोरोसिस यांसारख्या रोगांपासून तुमचे संरक्षण होते. 
 • दररोज सकाळी व्यायाम करा. सकाळी लवकर उठून व्यायाम केल्याने तुमची उर्जा पातळी वाढते आणि तुमचे रक्ताभिसरण सुधारते. दररोज फक्त 20 किंवा 30 मिनिटे व्यायाम केल्याने तुमचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
 • दररोज सकाळी चांगला पौष्टिक नाश्ता करा.सकाळच्या न्याहारीत प्रथिने, स्लो-रिलीज कार्बोहायड्रेट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा समावेश करा.
 • हायड्रेटेड रहा. शरीरात निर्जलीकरण झाल्यामुळे त्रास होतो आणि एकाग्रता कमी होऊ शकते. दिवसभरात कमीत कमी आठ ते दहा ग्लासेस पाणी प्या. 
 • पौष्टिक जेवण करा. दुपारचे जेवण देखील नाश्त्याप्रमाणेच संतुलित असले पाहिजे. कधीही जेवण स्किप करू नका. दुपारच्या जेवणाच्या वेळी जास्त फॅट्स टाळा, कारण त्यामुळे सुस्ती येते. 
 • रात्रीचे जेवण पौष्टीक व हलके ठेवा. रात्रीच्या जेवणात हिरव्या पालेभाज्या हा एक उत्तम पर्याय आहे कारण त्यात अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात आणि त्यांचा अल्कानायझिंग प्रभाव असतो. पालेभाज्यांबरोबर रात्रीच्या जेवणात प्रोटीनचाही समावेश करा. 
 • दुपारी आणि संध्याकाळी कॅफिन टाळा, कारण त्यामुळे तुम्हाला रात्री शांत झोप लागण्यास त्रास होईल. 
 • आराम करण्यासाठी वेळ काढा. उच्च तणाव पातळीमुळे तुम्हाला नैराश्य आणि उच्च रक्तदाब यासह अनेक समस्यांचा धोका निर्माण होतो. तुम्हाला आनंद देणारा छंद जोपासा आणि तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग म्हणून दररोज थोडा वेळ तुमच्या छंदाला द्या. 

निरोगी शरीरासाठी महत्वाची  योगासने  – Yoga Tips For Healthy Life In Marathi

दिवसातून केवळ अर्धा तास योगासने करून तुम्ही तुमचे शरीर तंदुरुस्त आणि लवचिक ठेवू शकता. यासाठी तुम्हाला जास्त वेळ घालवण्याची गरज नाही. पुढील योगासने केल्यास तुमचा व्यायाम तर होईलच शिवाय ताणतणाव कमी होण्यास देखील मदत मिळेल. पावर योगा केल्याचेही अनेक फायदे आहेत.

ADVERTISEMENT

उत्तानासन योगाने शरीर राहील सुदृढ

हे आसन सरळ उभे राहून केले जाते. हे करण्यासाठी सरळ उभे राहा.हळूहळू कंबर वाकवून श्वास घेताना आपल्या पायाच्या बोटांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. थोडा वेळ या आसनात राहा व  परत सामान्य स्थितीत या. आसन करताना गुडघे वाकणार नाहीत याची काळजी घ्या.

सुखासन

या आसनामुळे शारीरिक आणि मानसिक तणाव दूर होतो. जर तुम्हाला तुमचे मन शांत ठेवायचे असेल तर या आसनाचा दररोज सराव करा. हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम चटईवर मांडी घालून बसा. डोळे बंद करा. मग हातांचे तळवे तुमच्या गुडघ्यावर ठेवा आणि  दीर्घ श्वास घ्या. ही प्रक्रिया वारंवार केल्याने श्वासोच्छवास नियंत्रणात राहील.

ADVERTISEMENT
निरोगी शरीरासाठी महत्वाची  योगासने  - Yoga Tips For Healthy Life In Marathi
निरोगी शरीरासाठी महत्वाची  योगासने 

ताडासन

ताडासन केल्याने शारीरिक आणि मानसिक संतुलन विकसित होते. यासोबतच तुम्हाला तुमचे पोस्चर सुधारायचे असेल तर हे आसन तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे आसन संधिवाताच्या रुग्णांसाठी खूप चांगले मानले जाते. हे आसन करण्यासाठी सरळ उभे राहा. यानंतर पाय जवळ घ्या व हात पूर्णपणे वर करून दीर्घ श्वास घ्या. डोळे बंद ठेवा. काही काळ या स्थितीत राहिल्यानंतर, हळूहळू श्वास सोडा आणि पुन्हा पूर्वीच्या स्थितीत या..

शवासन

निरोगी जीवनशैलीसाठी शवासन खूप फायदेशीर आहे. हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम चटईवर झोपा व पाय आणि हात सरळ ठेवा.पायांमध्ये थोडे अंतर ठेवा. शरीर सैल सोडा आणि लक्ष श्वासावर केंद्रित करा. किमान 10 मिनिटे या स्थितीत रहा. आता हळूहळू श्वास सोडा आणि सामान्य स्थितीत या.

ADVERTISEMENT

अधिक वाचा निरोगी राहण्यासाठी फिटनेस टीप्स मराठी

सुदृढ शरीरासाठी आहार – Diet For Good Health in Marathi

सुदृढ शरीरासाठी निरोगी, पौष्टिक व संतुलित आहार गरजेचा आहे. या टिप्स वाचून तुम्हाला संतुलित आहार कसा घ्यायचा याची कल्पना येईल. 

सुदृढ शरीरासाठी आहार - Diet For Good Health in Marathi
सुदृढ शरीरासाठी आहार – Diet For Good Health in Marathi
 1. आहारातून कार्ब्स पूर्णपणे काढून टाकण्यापेक्षा चांगले कार्बोहायड्रेट निवडा. कार्ब्स आपल्याला ऊर्जेसाठी अत्यावश्यक आहेत. म्हणूनच रोजच्या आहार प्रक्रिया न केलेली धान्ये समाविष्ट करा. 
 2. रोजच्या आहारात प्रथिने घेतलीच पाहिजे.डाळी, कडधान्ये, मासे, पोल्ट्री, नट्स आणि बीन्स हे प्रोटिन्सचे सर्वोत्तम पर्याय आहेत.
 3. हेल्दी फॅट्स असलेले पदार्थ निवडा, सॅच्युरेटेड फॅट जास्त असलेले पदार्थ मर्यादित प्रमाणात खा आणि ट्रान्स फॅट असलेले पदार्थ टाळा. नट्स आणि मासे हे हेल्दी फॅट्सचे सर्वात आरोग्यदायी स्त्रोत आहेत.
 4. आहारात फायबरचा समावेश करा. तृणधान्ये, ताजी फळे व भाज्या असा भरपूर फायबरयुक्त आहार निवडा. 
 5. भाज्या व फळांतून आपल्याला व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटिऑक्सिडंट्स देखील मिळतात. त्यामुळे त्यांचा आहारात समावेश केलाच पाहिजे.  
 6. शरीराचे कार्य सुरळीत चालावे व हाडे भक्कम राहावीत यासाठी कॅल्शियम महत्वाचे आहे. कॅल्शियम असलेले पदार्थ जसे की दूध, खारीक, नाचणी यांचा आहारात समावेश करा. 
 7. तहान शमवण्यासाठी शीतपेये पिऊ नका. आपले साधे पाणीच आपल्या शरीरासाठी सर्वोत्तम आहे. 

FAQ – आरोग्यासंबंधी पडणारे काही सामान्य प्रश्न 

निरोगी खाणे महत्वाचे का आहे?

उत्तम आरोग्य आणि शरीराला पोषण मिळण्यासाठी  सकस आहार आवश्यक आहे. पौष्टिक अन्न  हृदयविकार, मधुमेह आणि कर्करोग यांसारख्या अनेक जुनाट असंसर्गजन्य आजारांपासून तुमचे संरक्षण करते. 

ADVERTISEMENT

पौष्टिक आहार म्हणजे काय? 

पौष्टीक आहार म्हणजे विविध प्रकारचे अन्न खाणे ज्यातून तुम्हाला आरोग्य राखण्यासाठीआणि उर्जा मिळविण्यासाठी आवश्यक पोषक तत्वे मिळतात. या पोषकतत्त्वांमध्ये प्रथिने, कर्बोदके, चरबी, पाणी, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा समावेश होतो. प्रत्येकासाठीच पौष्टीक आहार आवश्यक आहे.

दूध पिणे आरोग्यासाठी चांगले आहे का?

दूध हे कॅल्शियम, फॉस्फरस, बी जीवनसत्त्वे, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन डी सारख्या महत्त्वाच्या पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. दूध हा प्रथिनांचा उत्कृष्ट स्त्रोत आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आहारात समाविष्ट केल्याने ऑस्टिओपोरोसिस आणि हाडांचे फ्रॅक्चर टाळता येऊ शकते. 

ADVERTISEMENT

भात खाणे शरीरासाठी चांगले आहे का?

तांदूळ हा कर्बोदकांचा एक समृद्ध स्त्रोत आहे.. कर्बोदके तुम्हाला उत्साही आणि समाधानी ठेवू शकतात आणि व्यायामाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. विशेषतः हातसडीचा किंवा तपकिरी तांदूळ हा फायबर, मॅंगनीज, सेलेनियम, मॅग्नेशियम आणि बी जीवनसत्त्वे यासह अनेक पोषक तत्वांचा उत्कृष्ट स्रोत आहे.

निरोगी राहण्याचे 3 मार्ग कोणते आहेत?

नियमित व्यायाम, पौष्टिक आहार आणि चांगली झोप हे निरोगी राहण्याचे सोपे मार्ग आहेत.

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

निरोगी आरोग्यासाठी योगासनाचे प्रकार

महिलांसाठी आरोग्यदायी टिप्स

24 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT