ADVERTISEMENT
home / मनोरंजन
sharvari wagh

हिंदीमध्ये झळकतोय आता हा नवा मराठमोळा चेहरा, मिळत आहेत नवे कॅम्पेन्स

बॉलीवूडवर राज्य करण्यासाठी अनेक मराठमोळे चेहरे अगदी पहिल्यापासून आहेत. तनुजा, नूतन, स्मिता पवार, माधुरी दीक्षित, उर्मिला मातोंडकर, राधिका आपटे आणि आता यामध्ये नाव घेतलं जातंय ते म्हणजे शर्वरी वाघ. सध्या बॉलिवूडमधला नवा मोहक तरुण चेहरा आहे तो म्हणजे शर्वरी वाघचा (Sharvari Wagh).  ‘बंटी और बबली 2’ (Bunty aur Babli 2) मध्ये शर्वरीने मोठ्या पडद्यावर मोठ्या दिमाखात पदार्पण केले. यात ती अत्यंत हॉट आणि सुंदर दिसली होती. नजीकच्या भविष्यात ती उत्तम कामगिरी करेल याची खात्री आता सर्वांनाच वाटत आहे. अत्यंत आत्मविश्वासाने शर्वरीने आपली पावलं रूतवायला सुरूवात केली आहे. शर्वरी आता नव्या कॅम्पेनसाठी सज्ज झाली आहे. एका केसांच्या शँपूच्या ब्रँडने शर्वरीची ब्रँड अम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे! इतक्या कमी कालावधीत शर्वरीने तीन ब्रँड साईन केले आहेत. 

अधिक वाचा – गानसम्राज्ञी लतादीदींना अजूनही काही काळ ठेवणार आयसीयुमध्ये, डॉक्टरांची माहिती

ब्रँड्स करत आहेत शर्वरीला साईन

“यश राज फिल्म्सचासुद्धा शर्वरीवर विश्वास असल्याचे दिसून येत आहे आणि या कंपनीच्या मोठ्या चित्रपटांमध्ये ती भूमिका करत असल्याने हे स्पष्ट होत आहे. ‘बंटी और बबली 2’ या चित्रपटात तिची प्रमुख भूमिका होती आणि वायआरएफच्या अजून एका चित्रपटात ती झळकणार आहे, ज्याचे दिग्दर्शन ‘हिचकी’ फेम सिद्धार्थ पी. मल्होत्रा करणार आहेत, असे कळते. शर्वरी हा नवा लोकप्रिय चेहरा असेल अशी चित्रपट वर्तुळात चर्चा आहे आणि तिची ‘स्टार’ असल्याची प्रतिमा दर्शविण्यासाठी तिला मोठे ब्रँड्स मिळवून देण्यासाठी वायआरएफची संपूर्ण यंत्रणा अविरत काम करत आहे.”, असे सूत्रांकडून कळते. 

अधिक वाचा – किरण माने प्रकरणात मालिकेने सोडले मौन, मालिकेतून का काढले याचे दिले कारण

ADVERTISEMENT

मराठमोळा चेहरा अधिक भावतोय 

“पाँड्स (Ponds) आणि एले18 (ELL18) नंतर हेड अँड शोल्डर्सची (Head and Shoulders) वर्णी लागल्याने तिला नियुक्त करण्यासाठी ब्रँड्सही उत्सुक आहेत हे दिसून येत आहे कारण नजीकच्या भविष्यात स्टारपदी पोहोचण्याची क्षमता शर्वरीमध्ये आहे, हे तिच्या व्यक्तिमत्वातून झळकत आहे. वायआरएफसोबत तीन चित्रपट करण्याची तिची डील आहे आणि या बॅनरसोबत ती अजून एका मोठ्या चित्रपटात काम करणार आहे हे सर्वांनाच माहीत आहे. ‘द फरगॉटन आर्मी’ आणि ‘बंटी और बबली 2’ या दोन्ही कलाकृतींमधील अभिनयाने तिने सर्वांना प्रभावित केले आहे. त्यामुळे शर्वरीचे भविष्य उज्ज्वल आहे याची चित्रपटक्षेत्राला खात्री आहे. म्हणूनच तिच्यात आता गुंतवणूक करणे हे ब्रँड्ससाठी योग्य पाऊल असेल. कारण नजीकच्या भविष्यात एंडोर्समेंटच्या क्षेत्रात तिचे मानधन वाढणार आहे.”, अशी पुष्टी सूत्रांनी जोडली. याशिवाय शर्वरीचा चेहराच नाही तर तिचा अभिनयदेखील प्रेक्षकांना आवडत आहे. त्यामुळे आता बॉलीवूडला पुन्हा एक नवा मराठमोळा चेहरा मिळणार असल्याचीही चर्चा सुरू झाली आहे. तसंच बॉलीवूडवर लवकरच हा मराठमोळा राज्य करेल असंही अनेकांना वाटत आहे. तसंच अगदी कमी कालावधीमध्ये शर्वरीचा फॅन फॉलोईंग वाढला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 

अधिक वाचा – प्रेक्षकांच्या इच्छेनुसार ठरणार आता एकताची इच्छाधारी नागिण, या अभिनेत्रीच्या नावाची चर्चा

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

17 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT