कोणत्याही वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या नेसल्यावर दागिने घालयाचे असतात अथवा अन्य कोणत्याही प्रकारच्या कपड्यांवर कोणते दागिने योग्य दिसतील हे माहीत असायला हवे. अनेकदा कपडे चांगले असतात मात्र त्यावर बटबटीत दागिने घातले जातात आणि मग कपड्यांची आणि तुमच्या लुकची शोभाही निघून जाते. पण मग अशावेळी नक्की काय करायचे तर अशा वेळी तुम्हाला कोणत्या कपड्यांवर Maximalist आणि Minimalist दागिन्यांचा वापर करता यायला हवा हे माहीत असायला हवे. रिच पॅटर्स, गडद रंग, क्लासिक व्हरायटी, मोठे आकार आणि वेगवेगळे डिझाईन्स अशा पद्धतीच्या दागिन्यांना मॅक्सिझमलिस्ट म्हणतात. याचा संपूर्ण लुकवर एक बोल्डनेस असतो. तर अगदी नाजूक आणि एलिगंट, रॅव्हिशिंग अशा लुकच्या दागिन्यांना मिनिमलिस्टिक दागिने म्हणतात. तुमच्या नियमित वापरामध्येही हे दागिने तुम्हाला वापरता येतात. असे दागिने हे तुमच्या आऊटफिटचा केंद्रबिंदू ठरतात. बऱ्याच कार्यक्रमांना तुम्हाला अशा दागिन्यांची गरज भासते.
कानातले (Earrings)
आपण नेहमी तयार होताना सर्वात पहिल्यांदा नक्की कोणता कार्यक्रम आहे याचा विचार करतो आणि त्याचप्रमाणे कोणते कपडे घालायचे आणि त्यावर कोणते दागिने घालायचे याचा विचार करतो. तुम्हाला कानातले नक्की कोणते घालायचे असा विचार येत असेल तर तुम्ही लग्न, मुंज अशा कार्यक्रमांच्या वेळी थोडे जाडसर डिझाईन्सचे बांधणी डिझाईन्सचे, अँटीक असे कानातले घातल्यास, अधिक सुंदर दिसतात. याशिवाय रिलायन्स ज्वेल्सचे (Reliance Jewels) लिप्पन काम डिझाईन (Lippan Kaam Design) असणारे 22 कॅरट सोन्याचे कानातले हे अँटीक फिनिशचे असून कोणत्याही साड्यांवर हे डिझाईन अत्यंत उत्तम आणि उठावदार दिसते.
डिझाईनर साड्यांवर हिऱ्यांची अंगठी आणि ब्रेसलेट (Diamond Rings and Bracelets)
एखाद्या कार्यक्रमामध्ये तुम्ही डिझाईनर साडी नेसण्याचे ठरवले असेल तर अशा साड्या या तुम्हाला वेगळा लुक देतात. अशा साड्यांवर तुम्हाला हिऱ्याची अंगठी निवडणे आणि ती घालणे सोयीचे ठरते. याशिवाय तुम्ही हिऱ्याचे नाजूक ब्रेसलेट आणि अंगठी घालून हा लुक पूर्ण करू शकता. डिझाईनर साड्यांवर भरजरी दागिने घातल्यास लुक बिघडू शकतो. त्यापेक्षा तुम्ही तुमच्या साडीच्या रंगाप्रमाणे आणि त्यावरील डिझाईन्सप्रमाणे तुम्ही हिऱ्याच्या अंगठी आणि ब्रेसलेटचा वापर करून घेऊ शकता. उगीच बटबटीत लुक करण्यापेक्षा अगदी सहज आणि सोपा आणि तितकाच आकर्षक असा हा लुक तुम्हाला कार्यक्रमात नक्कीच शोभून दिसेल यात शंका नाही.
कुरती आणि पंजाबी ड्रेसवर वापरा पेंडंट (Pendants For Kurti Look)
कोणत्याही कार्यक्रमात तुम्हाला कुरती अथवा पंजाबी ड्रेसवर नक्की कोणते दागिने घालायचे असतील हे कळत नसेल तर तुम्ही अगदी मिनिमल दागिन्यांचा वापर करावा. एक लहानसे 22 कॅरेट अथवा अगदी 18 – 14 कॅरेट सोन्याचे पेंडंटही तुम्हाला गळ्यात खूप सुंदर दिसते. याशिवाय तुम्ही अगदी टॉप्स घाला आणि साधा सुंदर लुक तुम्हाला अधिक आकर्षक दिसण्यास मदत करतो. तुम्हाला कार्यक्रम मोठा आहे म्हणून अगदी बटबटीत आणि जड दागिने घालण्याची गरज नाही. तर तुम्ही कोणता वेष परिधान करत आहात त्यानुसार तुम्ही हे दागिने निवडावेत. आजकाल इमिटेशन दागिनेही खूप वापरण्यात येतात. पण तुम्हाला सोन्याच्या अथवा हिऱ्याच्या दागिन्यांचा उपयोग करून घ्यायचा असेल तर तुम्हाला या टिप्स नक्कीच उपयोगी ठरतील.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक