नव्या वर्षात नवे बदल करायचा विचार केला असेल तर तुमच्या सौंदर्यातही काही बदल नक्कीच व्हायला हवेत. आज आपण नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहोतच. त्यासोबतच नव्या वर्षात तुम्ही नव्याने ब्युटी रेेजिममध्ये काय बदल करायला हवे ते जाणून घेऊया. हे बदल फार मोठे किंवा महागडे नाहीत. तुमच्या नव्या वर्षात तुम्हाला उत्तम त्वचा हवी असेल तर हे बदल तुम्हाला नक्कीच फायद्याचे ठरतील. आता उत्तम त्वचा हवी म्हल्यावर तुम्हाला हे बदल नक्कीच वाचायला हवे. चला जाणून घेऊया हे बदल
वयातील बदल
वाढत्या वयानुसार त्वचेमध्ये बदल होत असतात. त्वचेमधील कोलॅजन आणि इलास्टिसिटी कमी होत असते. त्यामुळे तुमच्या त्वचेला आणि वयाला अनुसरुन तुम्ही तुमच्या ब्युटी रेजिममध्ये बदल करणे अपेक्षित असते. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्ही तुमच्या त्वचेला सध्या कशाची गरज आहे ते जाणून घेऊया आणि त्यानुसार बदल करुन घ्या. कोलॅजन बुस्ट करणाऱ्या क्रिम किंवा सप्लिमेंट तुम्ही आहारात समाविष्ट करा म्हणजे तुम्हाला त्याचे चांगले बदल त्वचेवर जाणवू लागतील.
तांदळाच्या पाण्यापासून तयार करा होमपेड पॅक, मिळवा सुंदर त्वचा आणि केस
क्रिम बदला
तुमच्या रुटीनमध्ये असलेल्या रोजच्या क्रिम बदला कारण काही क्रिम्स सतत लावल्यामुळे तुमच्या त्वचेला त्याची सतत सवय झालेली असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या सकाळच्या रुटीनपासून ते नाईट रुटीनपर्यंत सगळ्या क्रिम्स बदला त्यामुळे तुम्हाला इच्छित बदल होण्यास मदत मिळेल. त्यामुळे तुम्ही शक्य असल्यास तुमच्या सगळ्या क्रिम्स योग्य मार्गदर्शन घेऊन बदला. कधी कधी त्वचेला लागणारे काही घटक बदलले तरी देखील त्वचा अधिक चांगली दिसते. त्यामुळे नक्कीच तुम्हाला आणि तुमच्या त्वचेला नवा बदल मिळेल
फेसवॉश बदला
फेसवॉश हा आपल्या अगदी रोजच्या वापरातील प्रॉडक्ट. खूप जण सतत एकच प्रॉडक्ट वापरतात. त्यामुळे बर सांगितल्याप्रमाणे त्याचा परिणाम हा हळुहळू कमी होऊ लागतो. यासाठीच तुम्ही फेसवॉश बदला. तुम्हाला सुट होईल असे अन्य घटक असलेला फेसवॉश घ्या. त्यामुळेही तुमच्या त्वचेच्या समस्या कमी होताना दिसतील. दर सहा महिन्यांनी तुम्ही फेसवॉश बदलला तरी चालू शकतो. त्यामुळे अशा काही गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही फेसवॉश बदलणे हे कधीही फायद्याचे ठरु शकते.
सवयी बदला
गेल्या वर्षभरात तुमचे त्वचेकडे दुर्लक्ष झाले असेल तर या वर्षी असे अजिबात करु नका. त्वचेकडे अधिकाधिक लक्ष देण्यासाठी तुम्ही रोजची त्वचेची काळजी घ्यायला विसरु नका. बाहेरुन आल्यानंतर मेकअप काढायला विसरु नका. चेहरा साबणाने किंवा फेसवॉशने धुण्यापेक्षा तुम्ही जास्तीत जास्त वेळा पाण्याने धुवा. इतकेच नाही तर त्वचेला मॉश्चरायझर लावायला अजिबात विसरु नका.
आता नवीन वर्षात ब्युटी रेजिममध्ये हे महत्वाचे बदल करा.
खास व्यक्तीला भेटायला जाताना असा करा मेकअप, टाळा या चुका