ADVERTISEMENT
home / मनोरंजन
रणवीर सिंह न्यूड फोटोशूट

न्यूड फोटोशूट करणं रणवीरला पडलं महागात, झाली तक्रार

 अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) सतत चर्चेत असतो. त्याचा अभिनय, त्याची खोडकरवृत्ती ही सगळ्यांनाच आवडते. पण शिवाय त्याचा हटकेपणा हा देखील अनेकांना भावणारा असतो. नुकतेच त्याने एक असे फोटोशूट केले ज्यामुळे अनेकांच्या भुवया चांगल्याच उंचावल्या. त्याने केलेले न्यूड फोटो टाकता टाकता काहीच मिनिटात चांगले व्हायरल झाले. काहींना या न्यूड फोटोची स्तुती केली तर काहींनी रणवीरला ट्रोलही केले. पण बॅड पब्लिसिटी ही सुद्धा एक पब्लिसिटी असते हे रणवीर चांगलेच जाणतो. त्यामुळे सोशल मीडियावर त्याच्याच त्या फोटोची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरु आहे. आता त्याच्या याच फोटोमुळे त्याला काही अडचणींना देखील सामोरे जावे लागणार आहे. त्याच्या अशा न्यूड फोटोशूटमुळे त्याच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार झाली असून मुंबईत अभिनेत्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे. 

या कारणासाठी केली तक्रार

रणवीर सिंहचे न्यूड फोटोशूट

खरंतरं रणवीरचं हे हॉट रुप पाहून त्याचे चाहते नक्कीच खूश झाले असतील. पण काही एनजीओजना मात्र हे अजिबात पटलेले दिसत नाही. त्यांनी केलेल्या तक्रारीनुसार यामध्ये महिलांच्या अस्मितेला धोका आहे. महिलांच्या भावना दुखावणारे असे हे फोटोशूट असल्यामुळे रणवीरने हे करुन चांगले केले नाही. असे एका एनजीओचे म्हणणे असल्यामुळे त्यांनी त्याच्याविरोधात मुंबई पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आता या तक्रारीनंतर रणवीर काय करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, या फोटोशूटला अनेकांनी ट्रोल केले आहे तर काहींनी पाठिंबा देखील दिला आहे. 

मग बुरख्याची सक्ती का?

एकीकडे समाजात आपल्या मनाने वागण्याचा अधिकार आहे. न्यूड होणं ही एक कला असेल तर बुरखा परिधान करणे ही कोणाला जबरदस्ती का वाटू शकते. असे ट्विट समाजवादी पक्षाचे आबू आझमी यांनी केले आहे. आबू आझमी यांच्या ट्विटचेही चांगले पडसाद उमटले आहेत. एकीकडे रणवीर ट्रोल होत असताना अनेक कलाकारांनी त्याच्या या फोटोशूटचे समर्थन केलेले आहे. त्यांच्यामते रणबीरने केलेले हे फोटोशूट त्याच्या मनाप्रमाणे केले आहे. त्याच्या या फोटोशूटमुळे त्याला आनंद मिळाला असेल तर आपण कोण त्याला ट्रोल करणारे? असे म्हणत अर्जुन कपूरनं त्याची पाठ थोपटली आहे. तर आलियाने देखील त्याचे फोटोशूट हे तारीफ करत त्याच्या विरोधात एकही चुकीची गोष्ट ऐकू शकत नाही अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. 

रणवीरला नाही पर्वा

रणवीर हा असा कलाकार आहे त्याला जे हवं तेच तो कायम करत आलेला आहे. त्याने अगदी छोटा कलाकार असण्यापासून ते प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचेपर्यंत आपला स्वभाव आहे तसाच ठेवला आहे. तो कधीही ट्रोलिंगची तमा बाळगत नाही. त्याला सगळ्या गोष्टी कराव्याशा वाटतात. त्याला अनेकदा त्याच्या अभिनयावरुन, फॅशनवरुन ट्रोल करण्यात येते. पण तो त्याची अजिबात तमा बाळगत नाही. उलट तो आहे त्या गोष्टी सकारात्मक घेऊन पुढे वाटचाल करतो. दरम्यान या फोटोशूटची चर्चा होणार हे रणवीर जाणतच असेल पण त्याने अद्याप त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

ADVERTISEMENT

तुम्हाला रणवीरचे हे फोटोज कसे वाटले?त्याने कोणता गुन्हा केला असे तुम्हाला वाटते का? आम्हाला नक्की कळवा.

26 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT