ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
Ranveer singh and Samantha ruth prabhu teaming up for a new project in Marathi

लवकरच रणवीर सिंह आणि सामंथा रूथ प्रभु झळकणार एकत्र, शेअर केला फोटो

रणवीर सिंहचा ‘जयेश भाई जोरदार’ पाहून प्रेक्षकांच्या हाती निराशा लागली, पण असं असलं तरी लवकच नव्या उत्साहात रणवीर पुन्हा प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झाला आहे. रणवीर सिंह त्याच्या हटके स्टाईल आणि उत्साहासाठी लोकप्रिय आहे. त्यामुळे एखाद्या चित्रपटाचे अपयश मनाला लावून घेणारा तो नक्कीच नाही. रणवीर आलियासोबत रॉकी और रानी की प्रेम कहानीच्या शूटिंगमध्ये व्यस्त असला तरी दुसरीकडे साऊथ अभिनेत्री सामंथा रूथ प्रभूसोबतही त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावरून तो आणि सामंथा एका नव्या प्रोजेक्टसाठी एकत्र आल्याचं जाणवत आहे. सध्या बॉलीवूड विरूद्ध टॉलीवूड असा वाद सुरू असला तरी दोन्ही इंडस्ट्रीमधील कलाकार मात्र त्यांच्या कामासाठी एकमेकांसोबत चांगले सबंध राखताना दिसत आहेत. सामंथाने स्वतः शेअर केली पोस्ट…

सामंथाने शेअर केली पोस्ट

सामंथा रूथ प्रभुने तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये ती युनिफॉर्ममध्ये दिसत आहे. हा युनिफॉर्म पायलटचा असल्याचं वाटत आहे. तिच्यासोबत बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह असून त्याने यात निळ्या रंगाचा शर्ट परिधान केलेला आहे. सामंथाने या फोटोवर ‘दी स्वीटेस्ट एव्हर रणवीर सिंह’ असं टॅग केलं आहे. रणवीरनेही सामंथाची स्टोरी त्याच्या अकाउंटवरून शेअर केली आहे. या फोटोवरून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. चाहत्यांनी असा अंदाज बांधला आहे की लवकरच ही नवी जोडी चित्रपटामधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यामुळे चाहत्यांना आता रणवीर आणि सामंथाची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहण्याचे वेध लागले आहेत.

काय आहे हा प्रोजेक्ट

सामंथा रूथ प्रभुने जरी त्या दोघांचा फोटो शेअर केला असला तरी त्यासोबत ते कोणत्या चित्रपटासाठी एकत्र आल्याची हिंट तिने दिलेली नाही. शिवाय दोन्ही कलाकारांनी अजून त्याच्या या आगामी प्रोजेक्टबद्दल काहीच जाहीर केलेलं नाही. मात्र सामंथाने तिच्या एका वेगळ्या पोस्टमध्ये ती लवकरच काहीतरी खास घेऊन प्रेक्षकांसमोर येणार आहे असं शेअर केलेलं आहे. खरंतर सामंथाकडे साऊथचे अनेक चित्रपट आहेत. कुशी, यशोदा, शाकुंतल आणि सिटाडेल या चित्रपटांमधून ती लवकरच झकळणार आहे. रणवीर सिंहदेखील रॉकी और रानी की प्रेम कहानीच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या चित्रपटात रणवीरसोबत आलिया भट मुख्य भूमिकेत असणार आहे, पूजा हेगडे आणि जॅकलीन फर्नांडिस या दोन अभिनेत्रींसोबत रणवीर सर्कस या चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहे. तसंच साऊथच्या अन्नियां  चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये कियारा आडवाणीसोबत काम करत आहे. त्यामुळे सामंथासोबत रणवीर कोणत्या चित्रपटातून एकत्र झळकणार याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच लागली आहे.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
06 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT