सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो म्हणजे एक मोटरमन गाडी थांबवून गाडीच्या समोरच लघुशंका करत असल्याचा. हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला खरा. पण आता लोकांनी या मोटरमनची बाजू घ्यायला सुरुवात केली आहे. हा ‘नेचर्स कॉल आहे तो तुम्ही आम्ही कोणीच चुकवू शकत नाही.आता ज्याने कोणी हा व्हिडिओ केला आहे त्याला मात्र या व्हिडिओमुळे ट्रोल केले जाईल की, काय अशी शक्यता आहे. पण इतक्या प्रवाशांना घेऊन त्यांना सुखरुप स्टेशनपर्यंत पोहोचवणाऱ्या सारथीच्या म्हणजेच या मोटरमनच्या पाठीशी आम्ही नक्कीच आहोत.
लहान मुलांना अशा लावता येईल वाचनाची गोडी
नेमकं प्रकरण काय?
तर झालं असं की, उल्हासनगर आणि विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकादरम्यान एक मोटरमन ट्रेन खाली उतरला आणि तो रेल्वेसमोर लघुशंका करु लागला. ही घटना बुधवारी दुपारी घडली. सोनू शिंदे नावाचा एक प्रवासी या दरम्यान तिथून जात होता. त्याने या मोटरमनला पाहिले. त्याला त्याच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही. म्हणून त्याने व्हिडिओ रेकॉर्ड करायला घेतला. या व्हिडिओमध्ये सदर मोटरमन गाडी खाली उतरुन लघवी करताना दिसत आहे.
Is he driving car🚗or Train🚂?🤔
Viral Video – Motorman caught stopping train btwn Ulhas nagar & Vithalwadi to take a leak, video goes viral 😄
He was wasted thousands of commuters time,@rajtoday @KMMIRROR @MukeshMakhija_v @damuNBT @mumbairailusers @RailMumbai pic.twitter.com/4d5HqghFRZ
— @PotholeWarriors🇮🇳 #RoadSafety 🏍🛵🛣 (@PotholeWarriors) July 18, 2019
काय म्हणाले वरिष्ठ अधिकारी
आता हा व्हिडिओ शूट केल्यानंतर जेव्हा मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आला. अनेक प्रसारमाध्यमांनी या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा केली पण त्यांनी अजूनही तपास सुरु असल्याचे म्हटले आहे.
तुला पाहते रे मालिकेचा असा असेल शेवट, शनिवारी मालिका घेणार निरोप
तुम्हाला काय वाटतं ?
social media
मुंबईकरांसाठी त्यांची लाईफलाईन म्हणजे त्याची लोकल आहे. दिवसाची सुरुवात ते लोकल ने करतात आणि दिवसाचा शेवटही. त्यामुळे त्यांच्यासाठी ती फार महत्वाची आहे. या लोकलला चालवणारा हा देखील एक माणूस आहे. लांब प्रवास करताना अशा गोष्टी टाळता येत नाही. इतक्या प्रवाशांना सुखरुप पोहोचवण्याची जबाबदारी ही या मोटरमनवर असते. असे असताना जर त्यांना काही होत असेल तर त्यांनी नेमकं काय करावं नाही का? लघुशंका, काही दुखणं जर टाळता येत नसेल तर अशावेळी प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी सुखरुप पोहोचवण्यासाठी त्यांनी त्या क्षणी काही निर्णय घेणे गरजेचे असते. कदाचित लघुशंका अडवणे हे या मोटरमनसाठी शक्य नसल्यामुळेच त्याने गाडी थांबवून लघुशंका करण्याचे ठरवले असावे. कदाचित त्याच्या गाडीला सिग्नलही मिळाला असावा. या सगळ्याचा विचार करायला हवा.
जाणून घ्या लोकांनी काय दिल्या प्रतिक्रिया
14 महिन्यांनंतर सोनम कपूर आणि नवऱ्यामधील दुरावा संपणार
This video proves poor condition of train drivers.. & need of such toilets on board too.. 1coach with toilet behind Train Driver coach.. isnt it…? #LocalTrain #MumbaiLocal
— @PotholeWarriors🇮🇳 #RoadSafety 🏍🛵🛣 (@PotholeWarriors) July 18, 2019
A suburban train motorman is being ridiculed and mocked on social media after someone filmed him halting the train to urinate on the tracks. I think it is extremely unfortunate and sad. Motormen drive long distances and are under tremendous stress. We must sympathise with them.
— Nauzer Bharucha (@nauzerbTOI) July 18, 2019
Oye, Chamchagiri karne se pehle yaad rakh ye b insaan hai… humaara naukar nahi.
He doesn't even hv a toilet.
Are yu gonna insure his life n kidneys? Raaste pe khade rehke kabhi mootta nahi bolna matt.
Agar apne Paapa Motorman hote, tab bhi tu ye video shoot aur tweet karta kya?— Khurshed J L (@Khurshedlawyer) July 18, 2019
TRAIN DRIVER IS ALSO HUMAN BEING , IT IS BIO BREAK , TELL ME WHERE HE SHOULD GO. RATHER THAN BLAMING HIM , YOU SHOULD HAVE HELD INDIAN RAILWAYS GUILTY AS THEY DO NOT THINK ABOUT DRIVERS . YOUR TWIST OF WORDS CAN COST HIS JOB , WILL YOU FEED HIS FAMILY …
— AKV (@anandve16027479) July 18, 2019
प्रसारमाध्यमांनीही ठेवावे भान
एखादी बातमी एक्सक्लुझिव्ह करण्यासाठी हल्ली कोणताही व्हिडिओ प्रसारमाध्यमांना पुरेसा असतो. पण असे करताना त्यांना त्यांच्या चॅनेलच्या टीआरपीपुढे काहीच दिसत नाही. पण हा व्हिडिओ शूट करताना ही कोणाची तरी खासगी गोष्ट आहे याचे भान ठेवायला हवे होते. त्या मोटरमनला काही त्रास आहे का? हे जाणून न घेता हा व्हिडिओ सरळ व्हायरल करण्यात काहीच अर्थ नव्हता. हे एकच उदाहरण नाही. पण हल्ली स्पर्धेत टिकण्यासाठी कोणत्याही बातम्या दाखवल्या जातात. आणि अशा प्रकारच्या गोष्टींना थारा दिला जातो. हा आता ठाणे पाणीपुरी संदर्भातील किळसपणाचा व्हिडिओ ही बातमी अगदी सोळा आणे खरी होती. ती विधायक होती. पण अशा व्हिडिओंमधून काहीही साध्य होण्यासारखे नाही. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी भान ठेवणे गरजेचे आहे.