ADVERTISEMENT
home / Mythology
या राशींसाठी नोव्हेंबर महिना असणार एकदम खास

या राशींसाठी नोव्हेंबर महिना असणार एकदम खास

चला हा हा म्हणता आता वर्ष संपत आलं आहे. 2020 हे वर्ष सगळ्यांसाठीच फार त्रासदायक आणि काहीतरी नवं शिकवणारं होतं. पण आता दिवस बदलू लागले आहेत.  आता सगळं पूर्ववत होत आहे. त्यामुळे येणारे दिवस हे चांगले असणार आहे. आता हा नोव्हेंबर महिना तुमच्या राशीनुसार कसा जाणार आहे ते जाणून घेऊया. राशीमध्ये काहीही लिहिलेले असले तरी काही गोष्टी घडवणे हे तुमच्या हातात असते. त्यामुळे हे राशीभविष्य वाचून तुम्ही खचून न जाता त्यातून योग्य तो मार्ग काढा 

12 राशीमध्ये चार राशी असतात जास्त बलशाली

राशीसांठी असा जाईल महिना

Instagram

ADVERTISEMENT

मेष: 

 मेष राशीसाठी नोव्हेंबर महिना थोडा चॅलेजिंग असणार आहे. कामाच्या
ठिकाणी काही किरकोळ वाद तुम्हाला निराश करु शकतात. तुमच्या सहकर्मचाऱ्यामुळे मन:स्ताप होऊ शकतो. या महिन्यात तुम्हाला आर्थिक कमाईचे एखादे साधन शोधावे लागेल. त्यामुळे खर्च पुरे करु शकाल. कौटुंबिक जीवनात काही समस्या येतील त्या सावकाशीने सोडवा. जर तुमचे काही प्रेमसंबंध असतील तर या महिन्यात तुमच्या घरातील व्यक्तिंना ते कळू शकेल. 

वृषभ: 

विदेशात जाण्याचा कित्येक महिन्यांपासून प्रयत्न करत असाल तर तुम्हाला या महिन्यात परदेशात जाण्याचे योग संभवत आहेत. करिअरमध्ये आनंदवार्ता मिळणार आहे. आर्थिक व्यवहार जपून करा. आरोग्याची काळजी घ्या. कारण या महिन्यात तुम्हाला काही शारीरिक विधी संभावतात. त्यामुळे त्याची योग्य काळजी घ्या. विद्यार्थी वर्गाने उलट बोलणे टाळा. त्याचे परिणाम वाईट होतील.

ADVERTISEMENT

मिथुन: 

 करिअरच्या दृष्टिकोनातून हा महिना तुमच्यासाठी  फार महत्वाचा आहे. तुम्हाला कोणताही निर्णय घेताना फार काळजी घेणे गरजेचे आहे. तुमचे कौंटुबिक जीवन आणि वैवाहिक जीवन हे सर्वसामान्य असणार आहेत. विद्यार्थी वर्गाला यश मिळण्याची शक्यता आहे. पण त्यासाठी मेहनत घेणे गरजेचे आहे. आरोग्याची काळजी घेणेही या राशीसाठी फार महत्वाची आहेत. 

कर्क:  

करिअर, प्रेमसंबंध या सगळ्याच बाबतीत कर्क राशींच्या व्यक्तीचा हा महिना चांगला जाणार आहे.आर्थिक चणचण असल्यास त्यातून मार्ग निघणार आहे. प्रेमप्रकरणात यश मिळण्याची शक्यता आहेत. ज्या व्यक्ती जास्त काळासाठी नात्यात आहेत त्यांचे प्रवासाचे योग संभावतात.  आरोग्यामध्ये सुधारणा होणार आहे. तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येणार आहेत. त्याचा आनंद लुटा. 

ADVERTISEMENT

सिंह: 

ग्रहमानानुसार तुम्हाला या महिन्यात करीअरच्या दृष्टिने अत्यंत  विचारपूर्वक निर्णय घ्या. कामाच्या ठिकणी तुम्हाला हमखास यश मिळणार आहे. आई-वडिलांशी बिघडलेले संबंध पुन्हा चांगले होतील. परदेशात जाऊन शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांना त्यांची मनपसंत संधी मिळणार आहे. आरोग्याची थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. कंबर आणि खांदा दुखी असे काही त्रास होण्याची शक्यता आहे. त्याकडे लक्ष द्या. 

कन्या:

बिझनेसमध्ये उतरु पाहणाऱ्या कन्या राशीच्या व्यक्तिंना अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागेल. पण तरीही तुमची आर्थिक बाजू सक्षम राहील. विवाहित लोकांसाठी हा महिना खूप चांगला जाणार आहे. पण आरोग्याची काळजी घेणे या लोकांसाठी फारच गरजेचे असणार आहे.डोळा आणि कान याकडे अधिक लक्ष द्या.  विद्यार्थी वर्गासाठी हा महिना चांगला असणार आहे. 

ADVERTISEMENT

तूळ: 

 पैशांच्या दृष्टिकोनातून तूळ राशीसाठी हा महिना खूप चांगला आहे. आर्थिक फायदा होण्याची शक्यता दिसत आहे. घरी आईचा तुमच्या निर्णयाला पाठिंबा मिळणार आहे. प्रेम प्रकरणात असलेल्या अडचणी दूर होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी वर्गाला अभ्यासाची गोडी लागेल.  आारोग्याचा विचार करता पाठ, कंबर, पोट असे विकार संभावतात.

वृश्चिक :

नोकरीत ताण-तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. अनेक कठीण पेच निर्माण होतील ज्यासाठी तुम्हाला योग्य निर्णय घ्यावा लागेल. काहींना नोकरीसही मुकावे लागणार आहे.  पण तरीही तुमची आर्थिक स्थिती ही मजबूत राहील. कामाचा मोबादला मिळेल. नात्यात काही कारणामुळे दुरावा येण्याची शक्यता आहे. कामाचा ताण पाहता आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. 

ADVERTISEMENT

आठवड्यातील कोणता दिवस आहे तुमच्यासाठी शुभ, काय सांगते तुमची रास

धनु:

काहीतरी चांगले मिळवण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागणार आहे. आर्थिक स्थिती थोडी वर-खाली होईल. खर्चामध्ये वाढ संभवतात. घरी कोणाची तरी तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. ज्यामुळे तुम्ही चिंतीत राहाल. वैवाहिक आणि प्रेम जीवन चांगले राहील. विद्यार्थी वर्गाला काही नव्या गोष्टी येण्याचे योग संभावतात. 

मकर: 

ADVERTISEMENT

 कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले राहील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. कौटुंबिक जीवनात काही अडचणी येतील पण तरीही त्याचा सामना केल्यावाचून पर्याय नाही. प्रेमात असाल तर थोडे सांभाळून राहा कारण काही अडचणी येण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात काही कारण नसताना क्लेश होण्याची शक्यता आहे. तेथे लक्ष द्या. या महिन्यात डोकंदुखी सारख्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. 

कुंभ : 

विदेशात जाण्याची शक्यता या महिन्यात आहे. पण तरीही आर्थिक बाजूंचा विचार करुन काही गोष्टींचे निर्णय घ्या. घरी असलेल्या ज्येष्ठ व्यक्तींची काळजी घ्या. आरोग्याची काळजी घेणे या महिने गरजेचे आहे. कान, नाक, घसा असे काही आजार होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी वर्गासाठी हा महिना चांगला आहे त्यांनी योग्य मेहनत घेऊन यश मिळवावे. 

मीन:

ADVERTISEMENT

  मीन राशीसाठी नोव्हेंबर महिना करीअरच्या दृष्टिकोनातून थोडा त्रासदायक असणार आहेत. काही कामांसाठी प्रवासाचे योग संभावतात. विद्यार्थी वर्गासाठी हा महिना चांगला असणार आहे.  कौटुंबिक जीवनात थोडे तणाव येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या गोष्टी सांभाळून घ्या. आर्थिक स्थिती चांगली राहील. 

नोव्हेंबर महिना हा तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. त्यामुळे आलेल्या अडचणींचा सामना करुन हा महिना चांगला घालवा.

भयंकर गॉसिप करणाऱ्या असतात या राशी, तुम्ही तर नाही ना यातले

29 Oct 2020
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT