ADVERTISEMENT
home / मनोरंजन
ravrambha

“रावरंभा” च्या निमित्ताने गिरीश कुलकर्णी, ओम भूतकर पहिल्यांदाच ऐतिहासिक चित्रपटात एकत्र

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त लेखक अभिनेते गिरीश (Girish Kulkarni) आणि ओम भूतकर (Om Bhutkar) रावरंभा (Ravrambha) या आगामी ऐतिहासिक चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. अभिनेता  ओम भूतकर “राव” ही भूमिका साकारत असून “रंभा” ची भूमिका अभिनेत्री मोनालिसा बागल (Monalisa Bagal) साकारणार आहे तर अभिनेते गिरीश कुलकर्णी कोणती भूमिका साकारणार हे गुलदस्त्यात आहे. शशिकांत शीला भाऊसाहेब पवार हे “रावरंभा – या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. बेभान, झाला बोभाटा, भिरकीट असे उत्तम चित्रपट केलेले अनुप अशोक जगदाळे या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. ऐतिहासिक कथानक मांडण्यात हातखंडा असलेल्या प्रताप गंगावणे यांनी रावरंभाचं लेखन केलं आहे. आगामी ऐतिहासिक चित्रपटांमध्ये अनुप अशोक जगदाळे दिग्दर्शित ‘रावरंभा’ हा चित्रपट वेगळा ठरणार आहे. रावरंभातून एक ऐतिहासिक प्रेमकहाणी उलगडणार आहे. विशेष म्हणजे मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यात चित्रित होणारा हा पहिलाच ऐतिहासिक चित्रपट ठरणार आहे. डिसेंबर महिन्यात चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. 

अधिक वाचा – अभिनेत्री पूजा बॅनर्जीने चाहत्यांना दिली गोड बातमी, मार्चमध्ये देणार बाळाला जन्म

अनोखी प्रेमकहाणी

इतिहासाच्या पानांमध्ये रावरंभा ही सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतील एक अनोखी प्रेमकहाणीही दडली आहे. ही प्रेमकहाणीच “रावरंभा” या चित्रपटातून पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर येत आहे. गिरीश कुलकर्णी आणि ओम भूतकर यांनी या पूर्वी देऊळ, फास्टर फेणे अशा काही चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. या दोघांनीही आपल्या कसदार अभिनयानं स्वतःची ओळख निर्माण केली आहे. मात्र रावरंभा हा या दोघांचाही पहिलाच ऐतिहासिक चित्रपट आहे. त्यामुळे या दोन मातब्बर अभिनेत्यांना ऐतिहासिक चित्रपटात एकत्र पाहणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे. 

अधिक वाचा – ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेतून शुभांगी गोखलेंची एक्झिट, नेटकऱ्यांमध्ये चर्चा

ADVERTISEMENT

पहिल्यांदाच ऐतिहासिक चित्रपटात 

तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनातील पवित्र, पांडवकालीन जागृत देवस्थान… भोर तालुक्यातील,आणि पुणे जिल्ह्यात असलेले, आपल्या साताऱ्यातील वाईपासून जवळच किल्ले रायरेश्वराचे स्थान. याच किल्ले रायरेश्वरावर शंभू महादेवाच्या साक्षीने, बाल शिवाजींनी आपल्या १२ सवंगड्यांसह स्वराज्य स्थापनेची शपथ २६ एप्रिल १६४५ रोजी घेतली होती. यावरच आगामी मराठी सिनेमा “रावरंभा” याची कथा आहे. आपल्या ऐतिहासिक शाहूनगरीतील पहिल्या ऐतिहासिक सिनेमाचे चित्रिकरण पुढच्याच महिन्यात सुरू होत आहे. 

ओम आणि मोनालिसा एक वेगळी जोडी

या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले तेव्हापासून या सिनेमाविषयी अनेकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. आता या सिनेमाची उत्सुकता आणखी वाढणार कारण यातील एका प्रमुख कलाकाराची ओळख प्रेक्षकांसोबत होणार आहे. तर प्रेक्षकांसाठी सरप्राइज म्हणजे या सिनेमात अभिनेत्री मोनालिसा बागल प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. मोनालिसाला नेहमीच आपण वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिले आहे. मात्र तिला कधीही कोणत्याही ऐतिहासिक भूमिकेत पाहिलेले नाही. रंभा ही ऐतिहासिक भूमिका मोनालिसा साकारणार असून राव ही भूमिका ओम भूतकर साकारणार आहे. वेगळ्या बाजाचा ऐतिहासिक चित्रपट पाहायला मिळणार याचीही प्रेक्षकांना उत्सुकता आहे. आपल्याकडे नेहमीच शिवराय आणि इतिहासकालीन चित्रपटांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो. तर ओम आणि मोनालिसा ही जोडीही प्रेक्षकांना पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. याव्यतिरिक्त गाजलेले नाव गिरीश कुलकर्णीदेखील यासोबत जोडले गेले असल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढीला लागली आहे. 

अधिक वाचा – ‘रावरंभा’ या ऐतिहासिक सिनेमात दिसणार अभिनेत्री मोनालिसा बागल

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
08 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT