ओमेगा थ्री फॅटी अॅसिड पदार्थ (Omega-3 Fatty Acids Food) ला ओमेगा थ्री युक्त पदार्थ असंही म्हटलं जातं. ओमेगा थ्री तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी फायद्याचं असतं. जसं की, यामुळे दृष्टी सुधारते, ह्रदयाच्या समस्या दूर होतात, ताणतणाव अथवा चिंता काळजी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. थोडक्यात जर तुमच्या आहारात ओमेगा थ्री युक्त पदार्थ असतील तर तुम्हाला मेंदूचे आजार आणि मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोका कमी असतो. गर्भारपणात याचे सेवन केल्यामुळे बाळाच्या मेंदूचा चांगला विकास होतो. यासाठीच जाणून घ्या असे कोणते पदार्थ आहेत, ज्यामुळे तुम्हाला ओमेगा थ्री फॅटी अॅसिड भरपूर मिळू शकतात. ओमेगा थ्री फॅटी अॅसिडयुक्त पदार्थ खाण्यामुळे प्रतिकार शक्ती वाढते, यासाठी आधी जाणून घ्या प्रतिकार शक्ती कमी आहे हे ओळखण्याची लक्षणे (Signs Of A Weak Immune System In Marathi)
ओमेगा थ्री फॅटी अॅसिडयुक्त पदार्थ
आहारात ओमेगा थ्री फॅटी अॅसिडयुक्त पदार्थ असतील तर तुमच्या शरीराचे योग्य पोषण होते आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. यासाठी या पदार्थांचा आहारात समावेश करा.
अंडी
अंड्यामध्ये प्रोटीन्स, व्हिटॅमिन्ससोबत भरपूर ओमेगा थ्री फॅटी अॅसिड असतं. अंडी खाण्यामुळे शरीराचे चांगले पोषण होते. यामुळे तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि आजारपण दूर राहते. यासाठी दररोज एक अंडं प्रत्येकाच्या आहारात असायला हवं. जाणून घ्या अंडी खाण्याचे फायदे | Benefits of Eating Eggs In Marathi
अवाकॅडो
अवाकाडो हे फळ भारतीय नसलं तरी आजकाल भारतात सहज उपलब्ध होत आहे. ओमेगा थ्री फॅटी अॅसिडचा हे फळ चांगला स्त्रोत आहे. जर तुम्ही आहारात याचा समावेश केला जर तुमची रोग प्रतिकार शक्ती नक्की मजबूत होते.
मासे
अंड्यांप्रमाणे मासे देखील ओमेगा थ्री फॅटी अॅसिडयुक्त असतात. काही मासे खाण्यामुळे तुमच्या शरीराला प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, मॅग्नेशिअम, पोटॅशिअमसह ओमेगा थ्री फॅटी अॅसिड भरपूर मिळते. ज्यामुळे तुमचे आरोग्य कायम सुदृढ राहते. यासाठी वाचा मासे खाण्याचे फायदे जाणून घ्या (Fish Benefits In Marathi)
अक्रोड
अक्रोडमध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा थ्री फॅटी अॅसिड असतं. रोग प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी तुम्ही नियमित अक्रोड खायला हवेत. फक्त खाण्यासाठीच नाहीतर अक्रोड आहे सौंदर्यदायी देखील, यासाठी जाणून घ्या अक्रोड खाण्याचे फायदे (Benefits Of Walnut In Marathi)
अळशी
ओमेगा थ्री फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात मिळावे असं वाटत असेल तर आहारात अळशीचा समावेश करा. कारण अळशी खाण्यामुळे तुम्हाला इतर व्हिटॅमिन्ससह ओमेगा थ्री चांगल्या प्रमाणात मिळते. ज्यामुळे तुमच्या मेंदू आणि ह्रदयाचे कार्य सुरळीत होते, मधूमेह नियंत्रणात येतो.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक