ADVERTISEMENT
home / घर आणि बगीचा
अतिस्वच्छता ही बिघडवू शकते मानसिक आरोग्य

अतिस्वच्छता ही बिघडवू शकते मानसिक आरोग्य

घर स्वच्छ सुंदर असावं असं खूप जणांना वाटतं. स्वच्छता ही आरोग्यासाठी फारच चांगली असते. कारण स्वच्छता जिथे आरोग्य तिथे असे म्हटले जाते. पण असे असले तरी देखील काही जणांना प्रमाणापेक्षा जास्त स्वच्छता करण्याची आवड असते. ही अतिस्वच्छता देखील मानसिक आरोग्यासाठी चांगली नाही. जर तुम्हाला अतिस्वच्छता म्हणजे OCD चा त्रास असेल तर तुम्ही काही गोष्टींवर आताच आवर घालणे गरजेचे आहे. प्रमाणाबाहेर स्वच्छता राखण्याचे अनेक दुष्परिणाम असून त्याचा परिणाम तुमच्यासोबत तुमच्या आजुबाजूला असणाऱ्या लोकांनाही होऊ लागतो. तुम्ही या आजाराच्या आहारी जात असाल तर तुम्ही तुमचे मानसिक आरोग्य आताच सांभाळणे गरजेचे आहे. अतिस्वच्छता नेमकी कशाप्रकारे तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करते ते आता जाणून घेऊया.

पावसाळ्यात भिजण्याआधी अशी तयार करा तुमची त्वचा

OCD म्हणजे काय?

OCD म्हणजे काय?

Instagram

ADVERTISEMENT

OCD म्हणजे  ओव्हर क्लिनलिसिंग ड्राईव्ह..खूप जणांना अति स्वच्छतेची सवय असते. ही सवय कधी लागते हे कळत नाही. एखादा कप्पा साफ करता करता कधी त्यांना अति स्वच्छता करावीशी वाटते हे देखील कळत नाही. अशा व्यक्तिंना कोणी जराशी जरी घाण केली तरी देखील त्रास होऊ लागतो. हा एक प्रकारचा आजार आहे. कारण अशा व्यक्ती कालांतराने बऱ्याच वेगळ्या वागू लागतात.  

यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा ‘या’ गुडलक वास्तू टीप्स (Goodluck Vastu Tips)

अतिस्वच्छता आणि मानसिक आजार

अतिस्वच्छतेचा तुम्हाला त्रास झाला असेल तर तुमच्यासोबत असा काही गोष्टी हमखास घडू शकतातत. जर असे संकेत तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही आताच तुमचा हा स्वभाव बदलायला हवा.

1. अतिस्वच्छतेची सवय लागली असेल तर तुमची अगदी बारीक बारीक गोष्टीमध्ये चिडचिड होऊ लागते.  

2. घरात कोणी मनासारखे वागले नाही तर त्यावरुन सतत कुरकुर होऊ लागते. वेळप्रसंगी काही जण  घरात आली आणि त्यांनी काही कचरा केला तर ते लागलीच साफसफाई करायला सुरुवात करतात. 

ADVERTISEMENT

3. खूप जणांना घरात किंवा बाहेर इतर लोकं आले की, ते घाणचं घेऊन आले असतील असे वागू लागतात. त्यांना कोणतेही काम न देता आपण सगळी काम करण्याचा खटाटोप ही लोकं करतात. 

4. नकारात्मक विचारांनी भरलेली अशी ही लोकं असतात. त्यांना अगदी  कोणत्याही चांगल्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना सतत मनात वाईट विचार येऊ लागतात. 

6. सगळ्या गोष्टी निरखून बघण्याची सवय ही देखील या लोकांना लागलेली असते. अगदी कुठेही घेतल्यानंतर अमूक एक गोष्ट धुतली का नाही  असे त्यांना सतत वाटू लागते. त्यासाठी ते एखाद्याचे डोके खातात. 

7. घृणा ही या लोकांमध्ये जास्त प्रमाणात  असते. सतत या लोकांना दुसऱ्यांबद्दलच राग येत असतो. 

ADVERTISEMENT


या काही गोष्टी तुमच्यासोबत होत असतील तर तुम्ही मानसिक आजारी आहात. त्यामुळे तुम्ही याची योग्य काळजी घ्या.

जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात ‘प्रेम’

24 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT