वरूण धवन आणि परिणीती चोप्राची खऱ्या आयुष्यात चांगली मैत्री आहे. मात्र आजवर ते दोघं कोणत्याही बॉलीवूड चित्रपटात एकत्र दिसले नाहीत. तसं पाहायला वरूण धवनच्या ढिशूम या चित्रपटात एका गाण्यापुरती परिणीतीची झलक पाहायला मिळाली होती. मात्र त्या दोघांच्या मुख्य भूमिका असलेला एखादा चित्रपट आजवर झालेला नाही. मात्र लवकरच हे दोघं एका चित्रपटातून एकत्र झळकण्याची शक्यता आहे. काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार साजिद नाडियावाला प्रॉडक्शनच्या ‘सनकी’ या चित्रपटात वरूण आणि परिणीती एकत्र काम करणार आहेत.
काय आहे ‘सनकी’
सनकी एक एक्शन थ्रीलर चित्रपट असणार आहे. मात्र हा एखाद्या चित्रपटाचा रिमेक आहे का याबाबत कोणतीही माहीती समोर आलेली नाही. हा फक्त एक सस्पेंस ड्रामा असून त्यात वरूण धवन मुख्य भूमिकेत असेल असं माहीत झालं होतं. मात्र त्याच्यासोबत परिणीतिही या चित्रपटात असणार हे उघड झालं आहे. वरूण आणि परिणीतिने आजवर एकत्र काम केलेलं नसल्यामुळे ही फ्रेश जोडी मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी नक्कीच चाहते उत्सुक असणार आहेत. अजूनही याबाबत त्या दोघांनी काहीच जाहीर केलेलं नाही. मात्र सनकीमध्ये ते दोघं एकत्र असणार याबाबत सध्या प्राथमिक बोलणी त्यांच्यात सुरू आहेत. साजिदच्याच ढिशूम या चित्रपटात एका गाण्यात वरूण आणि परिणितीला एकत्र दाखवण्यात आलं होतं. मात्र ती फारच छोटीशी भूमिका होती. ज्यामुळे साजिदने आता वरूण आणि परिणीतिला मुख्य भूमिकेत एकत्र घेण्याचा विचार केला आहे.
परिणीतीने लावला आहे चित्रपटांचा सपाटा
बॉलीवूड अभिनेत्री परिणीति चोप्राने तिच्या अभिनय आणि बबली इमेजने चाहत्यांच्या मनात एक खास स्थान केलं आहे. सध्या तिचा दी गर्ल ऑन दी ट्रेन हा चित्रपट प्रदर्शित झालेला असून या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली प्रतिक्रिया मिळालेली आहे. लवकरच तिचा सायना हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. जो सायना नेहवालची बायोपिक असेल. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालेला असून त्यातील परिणीतीच्या अभिनयाची झलक पाहून सगळीकडे तिचं कौतुक होत आहे. संदीप और पिंकी फरार या चित्रपटातून ती अर्जून कपूरसोबत पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येत आहे. हा चित्रपट 19 मार्चला प्रदर्शित होत आहे. त्यानंतर रणबीर कपूर आणि अनिल कपूरसोबत ती एनिमल या चित्रपटातून झळकणार आहे. संदीप वांगाने वर्षाच्या सुरूवातीलाच या चित्रपटाची घोषणा केली होती. भुज दी प्राइड ऑफ इंडियासाठीही तिचं नाव पुढे आहे. थोडक्यात परिणीतिकडे सध्या एका पेक्षा एक चित्रपटांच्या ऑफर्स आहेत. त्यामुळे कदाचित ती वेळ दूर नाही जेव्हा ती बॉलीवूडच्या सर्व अभिनेत्रींनी मागे टाकत नंबर वन पोझिशन गाठेल अशी चर्चा सध्या बॉलीवूडमध्ये रंगली आहे.वरूण धवन सध्या त्याच्या आगामी रणभूमीमध्ये झळकण्याची शक्यता आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत जान्हवी कपूर असेल तर राज मेहताच्या जुग जुग जियो मधूनही तो प्रेक्षकांसमोर येणार आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
अभिनेत्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या अभिनेत्रीला अटक
मानसी नाईकचा पहिलाच रोमँटिक म्युझिक व्हिडिओ, वैशाली आणि स्वप्नीलचा स्वरसाज
असं काय म्हणाला टायगर श्रॉफ की ढसाढसा रडले जॅकी श्रॉफ