home / DIY फॅशन
perfect-wedding-dress-shopping

लग्नासाठी परफेक्ट वेडिंग ड्रेस कसा निवडाल, जाणून घ्या टिप्स

लग्नासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आपण निवडतो. आपल्या लग्नात आपल्यालाच सर्वात सुंदर दिसायचं असतं आणि यात नक्कीच काही वेगळं नाही. त्यासाठी आपण अनेक दुकानं फिरतो. वेगवेगळ्या साड्या आणि वेडिंग ड्रेस निवडतो. आपल्याला लग्नात अगदी परफेक्ट दिसायचं असतं. पण कधी कधी काही काही लग्नांमध्ये स्टाईल आणि वेडिंग ड्रेस यांचा परफेक्ट मेळ बसत नाही. स्टायलिश दिसण्यासाठी आपण कोणता कार्यक्रम आहे त्यानुसार ड्रेस निवडायला हवा. लग्नासाठी नक्की कसा लुक हवा, परफेक्ट वेडिंग ड्रेस निवडण्यासाठी आपल्याला नक्की काय करायला हवं आणि कोणती काळजी घ्यायला हवी ते आपण या लेखातून पाहूया.

आपल्या शरीराचा आकार जाणून घ्या

तुम्ही कोणताही वेडिंग ड्रेस (wedding dress) हा तुमच्या शरीराच्या आकारानुसार घेतला पाहिजे. जेणेकरून तो घातल्यानंतर तुम्ही त्यामध्ये बेढब दिसणार नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण कोणता ड्रेस घालत आहोत, त्याचा रंग कसा आहे आणि आपल्याला व्यवस्थित सूट होत आहे की नाही याचे तुम्ही योग्य प्रकारे लग्नाच्या आधी अंदाज लावायला हवेत. ड्रेस घेताना त्याचे फिटिंग आणि तुमच्या शरीराचा आकार अवास्तव मोठा दिसणार नाही याची काळजी घ्यायला हवी. 

सर्वात आधी सँपल पाहा 

शरीराचा आकार समजून घेतल्यानंतर तुम्ही कोणता लेहंगा निवडणार आहात त्याचे सँपल पाहायला सुरूवात करा. तुम्ही ऑनलाईन खरेदी करणार असाल तर तुमच्या आकाराला योग्य आणि तुमच्या रंगाला साजेसे असे लेहंगा निवडा. सँपल निवडल्यानंतर तुम्हाला परफेक्ट वेडिंग ड्रेस मिळू शकतो. तुम्ही सँपल शोधता तेव्हा तुम्हाला त्यामध्ये अधिक व्हरायटी दिसून येते 

ट्रेंडी डिझाईन

लग्नामध्ये लेहंग्याची स्टाईल तीच असते मात्र त्यावरील वर्क, डिझाईन आणि ओढणीचेदेखील डिझाईन बदलत असते. त्यामुळे लग्नासाठी परफेक्ट वेडिंग ड्रेस निवडताना तुम्ही सध्याचा कोणता ट्रेंड चालू आहे याबाबत जाणून घ्यायला हवे. त्यानुसार तुम्ही सध्याची स्टाईल पाहून तुमच्या लग्नासाठी योग्य ड्रेस निवडा. तसंच तुम्हाला सध्या लग्नामध्ये कोणते रंग अधिक चांगले दिसून येत आहेत अथवा तुमच्या स्किनटोननुसार, ट्रेंडी रंग कोणते आहेत याचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे तुम्ही निवड करा.

कुठे कराल खरेदी?

सँपल पाहिल्यावर तुम्हाला ट्रेंड आणि अन्य डिझाईन्सचा अंदाज नक्कीच लावता येईल. यानंतर लग्नानंतर तुम्हाला जी साडी अथवा लेहंगा घ्यायचा आहे त्याची खरेदी नक्की कुठून करायची याचा शोध तुम्ही घ्या. ऑनलाईन खरेदी आहे की तुम्ही दुकानात जाऊन तुमच्या डोक्यात असणारे कपडे खरेदी करणार आहात याचा तुम्ही अंदाज घ्या. म्हणजे तुम्हाला परफेक्ट वेडिंग ड्रेसची खरेदी करता येते. पण ऑनलाईन खरेदीपेक्षा तुम्ही दुकानात जाऊन खरेदी करणे अधिक योग्य ठरते. कारण तुम्ही घेणार असणाऱ्या वेडिंग ड्रेसचे योग्य फिटिंग (Fitting of Wedding Dress), त्या ड्रेसचा दर्जा याची योग्य परख करता येते. त्यामुळे तुम्ही योग्य निवड करू शकता. 

फिटिंग नक्की तपासा

लग्नासाठी परफेक्ट वेडिंग ड्रेस हवा असेल तर तुम्हाला सर्वात आधी फिटिंग व्यवस्थित तपासून घ्यायला हवे. कपड्यांची खरेदी करताना तुम्ही ट्रायल रूममध्ये जाऊन फिटिंग आणि कपड्यांचा रंग नक्की तपासा. काही जण अगदी शेवटच्या क्षणापर्यंत फिटिंग तपासत नाहीत आणि त्यामुळे लग्नामध्ये नक्कीच त्रास होतो. कारण लग्नाच्या घाईगडबडीत आपल्या शरीराच्या आकारातही फरक झालेला असतो. त्यामुळे तुम्ही लग्नासाठी साडीचा ब्लाऊज फिटिंग व्यवस्थित करून घ्या अथवा लेहंगादेखील व्यवस्थित फिटिंग पाहून घ्या. याशिवाय ड्रेसची शिलाई, रंग याचा दर्जाही तपासून घ्या. घाईघाईत अजिबात खरेदी करू नका. कारण यामुळे तुम्ही कधीही परफेक्ट खरेदी करू शकणार नाही. 

वेळेनुसार करा खरेदी 

लग्नाचा मुहूर्त हा सकाळचा आहे की रात्रीचा आहे त्यानुसार तुम्ही लग्नाच्या कपड्यांची खरेदी करा. रात्रीसाठी वेगळा रंग आणि दिवसा लग्न असेल तर कपड्यांचा रंग वेगळा निवडावा लागतो. तुम्ही अशापद्धतीने निवड केल्यास, तुमचा लेहंगा लुक अथवा साडी डिझाईन लुक लग्नात योग्य दिसेल. तसंच तुम्ही तुमच्या जोडीदारासह जर लग्नाचे कपडे मॅच करणार असाल तर तुम्हाला त्याचीही काळजी घ्यावी लागेल. तुम्ही एकत्र असल्यावर रंग उत्तम आणि उठावदार दिसेल अशाच रंगाची निवड करा आणि त्यानुसार कपड्यांची खरेदी एकत्र करा. तरच तुम्ही तुमच्या लग्नासाठी परफेक्ट वेडिंग निवडू शकता. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

07 Jan 2022

Read More

read more articles like this
good points logo

good points text