मुरूमं ही नेहमीच चेहऱ्याचे सौंदर्य कमी करतात. ज्याप्रमाणे चेहऱ्यावर मुरूमं येतात. त्याचप्रमाणे तुमच्या ओठांवरही अर्थात लिप लाईनवरही मुरूमं होऊ शकतात. हे असं होणं नक्कीच सामान्य आहे. पण यामुळे नक्कीच निराशा होते आणि त्याशिवाय ओठांवर आलेल्या मुरूमामुळे खूप त्रासही होतो. तसंच चेहऱ्यारवर आलेल्या मुरूमांवर लावण्यात येणारे मलम हे ओठांना लावता येतेच असं नाही. कारण असे क्रिम्स हे असुरक्षित समजण्यात येतात. चेहऱ्यावर इतर ठिकाणी क्रिम्स लावणे सोपे आहे पण ओठांवर नक्कीच नाही. पण तुम्हाला त्रास करून घेण्याची गरज नाही. कारण ओठांवरील मुरूमं काढून टाकण्यासाठी नैसर्गिक आणि सोपे उपाय घरच्या घरी करता येतात. तुमच्या स्वयंपाकघरातील काही पदार्थांचा वापर करून याचा उपयोग करून घेता येतो. पण उपाय करण्यापूर्वी नक्की कोणत्या कारणामुळे मुरूम आले आहे हे जाणून घ्या. व्हायरल इन्फेक्शन तर नाही ना याची खात्री करून घ्या. जाणून घेऊया ओठांवर सतत मुरूमं येत असतील तर त्यावर नक्की घरगुती सोपे उपाय काय आहेत.
लिंबाचा रस
Shutterstock
लिंबाचा रस हे एक प्रभावी अँटीबॅक्टेरियल एजंट आहे ज्याचा उपयोग करणे अत्यंत सुरक्षित आहे. अनेक अभ्यासावरून सिद्ध झाले आहे की, लिंबाचा रस हा मुरूमांवर एक प्रभावी क्लिंन्झर आहे. लिंबाचा रस लावल्याने अॅस्ट्रिजेंट गुण त्वचेमध्ये कसदारपणा निर्माण करतात. त्वचेमधील तेल आणि गाण दोन्ही बाहेर काढण्यासाठी याचा उपयोग होतो. लिंबाचा रस वापरून तुम्ही काही वेळात ओठांवर लावलेला हा रस स्वच्छ करू शकता. हा लावल्यानंतर स्वच्छ पाण्याचा उपयोग करूनच काढावा. तसंच ओठ पुसायला अत्यंत मऊ मुलायम टॉवेलचा वापर करावा. ओठांची काळजी घेणं अत्यंत गरजेचे आहे.
तुळशीची पाने
Shutterstock
तुळशीच्या पानांचादेखील ओठांवरील मुरूमांवर उपयोग करून घेता येतो. हा अत्यंत गुणकारी आणि आयुर्वेदिक उपाय आहे. सल्फरचा उपयोग आणि टेट्रासायक्लिनच्या एकत्र कॉम्बिनेशनमुळे मुरूमांवर त्वरीत आणि लवकर उपाय करता येतो. तुम्हाला केवळ एका स्वच्छ कापसाचा उपयोग करून तुळशीच्या पानाचा रस ओठांवर आलेल्या मुरूमांवर लावायचा आहे. काही वेळ ठेऊन स्वच्छ पाण्याने धुवा. याचा परिणाम एक दोन दिवसातच दिसून येईल.
कडुलिंबाचे तेल वा पाने
Shutterstock
कडुलिंबाच्या पानांचा उपयोग हा मुरूमांसाठी अगदी परंपरागत करण्यात येत आहे. अभ्यासानुसार कडुलिंबाच्या तेलात आणि पानांमध्ये मुरूमांवर त्वरीत उपाय करण्याचे गुण समाविष्ट असतात. यामध्ये नैसर्गिक अँटिबॅक्टेरियल आणि अँटिइन्फ्लेमेटरी गुणांचा भरणा असतो. कडुलिंबाचे तेल हे अत्यंत मजबूत असते आणि त्यामुळे मुरूमांवर लावण्याआधी नारळ तेल अथवा ऑलिव्ह ऑईलमध्ये मिक्स करूनच मग याचा वापर करावा. वयस्कर लोकांसाठी हे नक्कीच सुरक्षित आहे. पण लहान मुलांवर प्रयोग करू नका. कारण त्यांना उलटीसारख्या परिणामाला सामोरे जावे लागू शकते.
वाफ
Shutterstock
चेहऱ्याला वाफ देऊन तुम्ही पोर्स बंद करू शकता आणि घाण हटवू शकता. हे अत्यंत सौम्य़ शुद्ध स्वरूपात कार्य करते आणि रक्तप्रवाह वाढविण्यासही फायदेशीर ठरते. पण कोणत्याही अन्न शिजविण्याच्या भांड्यातून ही वाफ घेऊ नका. तर स्टीमरचाच वापर करा. ओठांवर आलेले मुरूमं घालविण्यासाठीही याचा उपयोग होतो. वाफ घेऊन झाल्यावर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. वाफेमुळे पोर्समधील असणारी घाण निघून जाण्यास मदत मिळते. तसंच यातील अशुद्ध तेलही निघून जाते.
बर्फ
लाल आणि सुजलेल्या मुरूमांवर तुम्ही आईस पॅक लावल्यास, याचाही उपयोग होतो. एका मुलायम कपड्यामध्ये अथवा टिश्यूमध्ये काही बर्फाचे तुकडे ठेवा आणि ओठाला लावा. यामुळे त्वचेमध्ये रक्तप्रवाह हळूवार होतो. त्यामुळे सूज कमी व्हायला आणि लालपणा कमी होण्यास मदत मिळते.
कोरड्या चेहऱ्यावर असतील मुरूमं, तर नक्की ट्राय करा ‘हे’ फेस वॉश (Best Face Wash For Pimples)
ग्रीन टी
Shutterstock
ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि पॉलिफेनोल्स भरपूर प्रमाणात असतात. हे दोन्ही पदार्थ सीबमचे उत्पादन होण्यापासून रोख लावतात. नैसर्गिक तेल जेव्हा मुरूमांसाठी जबाबदार ठरते तेव्हा अधिक प्रमाणात घाण निर्माण होते. याशिवाय ग्रीन टी मध्ये अंँटिबॅक्टेरियल असतात आणि यामध्ये हार्मोन संतुलित करण्याची क्षमता असते. त्यामुळे शरीराच्या आत आणि बाहेर दोन्हीकडे हे उपयुक्त ठरते. ग्रीन टी तयार करून तुमच्या ओठावर आलेल्या मुरूमांना लावा आणि परिणाम पाहा.
मुरूमं घालवण्यासाठी करा हळदीचा 5 तऱ्हेने उपयोग
काय काळजी घ्यावी
- या नैसर्गिक उपायांशिवाय ब्रेकआऊट आणि सूज थांबविणेदेखील महत्त्वाचे आहे. त्वचा स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी काळजी घ्यायला हवी
- मुरूमं आलेल्या ठिकाणी ग्लॉस, लिप बाम अथवा अधिक मेकअप करणे थांबवा. या उत्पादनांमुळे अधिक त्रास होण्याची शक्यता असते
- ओठ नियमित चांगले स्वच्छ करा. नाश्ता आणि जेवण झाल्यावर दातांसह ओठही स्वच्छ करणे गरजेचे आहे. एका स्वच्छ टॉवेलने व्यवस्थित ओठांना स्वच्छ करा
- मुरूमांपासून सुटका मिळण्यासाठी स्क्रबचा वापर करू नका. यामुळे अधिक त्रास होईल
- ओठांना सतत हात लाऊ नका. यामुळे अधिक बॅक्टेरिया आणि घाण जमा होते
- ओठांवर मुरूमं आल्यावर ते फोडण्याचा प्रयत्न करू नका. यामुळे आसपासची त्वचा अधिक दूषित होते आणि त्यामुळे अजून मुरूमं येण्याची शक्यता असते.
या नैसर्गिक उपायांचा उपयोग करून आणि आम्ही दिलेल्या टिप्सचा वापर करून ओठांवर आलेल्या मुरूमांपासून सुटका करून तुम्ही घेऊ शकता.
त्वचेवरील मुरूमांपासून सुटकेसाठी सोपे घरगुती उपाय
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक