ADVERTISEMENT
home / मेकअप
#POPxoReviews: या फेस आणि आय किटने परिपूर्ण करा तुमची मेकअप बॅग

#POPxoReviews: या फेस आणि आय किटने परिपूर्ण करा तुमची मेकअप बॅग

फेस्टिव्ह सीझन असो वा एखादी ऑफिस पार्टी तुम्ही परफेक्ट दिसायलाच हवं. आजकाल धावपळीच्या युगात कधी कधी असंही होतं प्रवास  लांबला तर थेट एखाद्या कार्यक्रमालाच पोहचावं लागतं. मग अशा वेळी फ्रेश होण्यासाठी वेळ नसेल तर कोणत्याही क्षणी परफेक्ट दिसण्यासाठी तयारीत असायला हवं. सोबत एखादा छान ग्लॅम लुकचा ड्रेस आणि मेकअप किट असेल तर आयुष्य सरळ आणि सोपं होतं. अशा वेळी फ्लाईटच्या वॉशरूममध्येही तुम्ही पटकन तयार होऊ शकता. आम्ही बऱ्याचदा याचा अनुभव घेतला आहे. पण यासाठी विमानातून प्रवास करताना तुमच्या हॅंडबॅगेत मावेल असं मेकअपचं साहित्य तुमच्याजवळ असायला हवं. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत असे मेकअप किट शेअर करत आहोत जे तुमच्याजवळ प्रवासात कायम राहू शकतात. 

काय आहे हे ?

POPxo ने मेकअप कलेक्शनची एक अशी छोटी रेंज बाजारात आणली आहे ज्यामध्ये तुमच्या फेस आणि आय मेकअपच्या सगळ्या गरजा भागवल्या जाऊ शकतात. यात आहेत ब्लश, हायलायटर, दोन आयशॅडो शेड आणि सेटिंग पावडर. तु्म्ही या किटने दिवसा मेकअप करू शकताच पण रात्रीचा ग्लॅम लुक मेकअपही याने सहज करता येतो जो माझा खूप आवडीचा आहे. एका मिनी मेकअप किटमध्ये जे जे हवं ते सगळं यात आहे. आहे ना भारी प्रॉडक्ट ? एवढंच नाही हे आहे फक्त 459 रू. ज्यामुळे तुमचे पैसेही जास्त खर्च होणार नाहीत.

तुम्हाला ते का आवडेल ?

मला यात सर्वात जास्त आवडला तो त्याचा आकार… कारण यात आहे मेकअपसाठी गरजेचं ब्लश, हायलायटर, आयशॅडो, सेटिंग पावडर एकत्र तेही अगदी छोट्याशा आकारात. या पॅलेटमध्ये चांगल्या गुणवत्तेच्या पिगमेंटेड फॉर्म्युलाचा वापर केलेला आहे. ज्यामुळे तुम्ही जे पैसे खर्च करता त्यानुसार चांगला लुक मिळतो. शिवाय हा मेकअप अगदी सहज तुमच्या त्वचेवर ब्लेंड होतो.

एवढ्या कमी पैशांमध्ये एक चांगलं मेकअप पॅलेट मिळणं ही अशक्य अप्रतिम गोष्ट आहे. तुम्हाला हे पॅलेट उबर क्युट, पिंक शेडच्या पॅकेजिंगमध्ये मिळतं. तुमच्या बॅगेत हे मिनी पॅलेट कुठेही राहू शकतं. ज्यामुळे तु्म्ही कुठेही कधीही मेकअपसाठी सज्ज राहू शकता. 

ADVERTISEMENT

रेटिंग –

रंग – 10/10

पॅकेजिंग – 10/10

फॉर्म्युला – 9/10

कसे वापराल ?

The Hot Damn Face & Eye मध्ये तुम्हाला चार एकाच पॅलेटमध्ये चार स्टेपचा मेकअप करता येईल. चेहऱ्यावर फाउंडेशन लावून झालं की याची सुरुवात करा.

ADVERTISEMENT
  • मेकअप बेस – तुमचा मेकअप झाल्यावर तो सेट करण्यासाठी सेटिंग पावडरने तो सेट करा. ज्या ठिकाणी तुम्हाला जास्त घाम येतो तिथे यातील थोडं प्रॉडक्ट घ्या आणि ब्लेंड करा. जसं की, डोळे, ओठांच्या वर खाली, नाकाजवळ जास्तीची पावडर ब्रशने झटकून टाका.
  • डोळे – या पॅलेटमधील डार्क मॅट शेड तुम्ही तुमच्या डोळ्याच्या मधल्या आणि बाहेरील भागावर लावू शकता. त्यानंतर लाईट शिमर शेड घ्या आणि डोळ्याच्या पापण्यावर हलकेच लावा.
  • गाल – यातील ब्लशने तुमचे गाल आणि गालाचा उंचवठा रंगवा. ब्लश गालाच्या मध्यापासून डोळ्याच्या वरच्या दिशेने फिरवा आणि ते ब्लेंड करा.
  • हायलायटर – हायलायटरचा वापर तुम्ही एका छोट्या हायलायटर ब्रशने चेहऱ्यावरील उंच भाग हायलाइट करण्यासाठी वापरू शकता. जसं की चिकबोन्स, नाकाचा शेंडा, आयब्रोजचा वरचा भाग आणि हनुवटी

काही जास्तीच्या मेकअप टिप्स

  • डार्क मॅट आयशॅडोने लाइट कौन्टोंरिंगही छान होतं
  • आयमेकअपमध्ये आणखी थोडी मजा येण्यासाठी ब्लश आणि हायलायटर वापरता येईल.

हे प्रॉडक्ट कसं दिसतं ?

मग वाट कसली पाहाताय ? स्टॉक संपण्याआधी तुमचं मेकअप किट लगेच बुक करा.

फिचर इमेज – Rimsha Shaikh

तुमच्यासह सौंदर्याचे भविष्य निर्माण करण्यासाठी POPxo आणि MyGlamm दोघेही एकत्र आले आहेत! तुम्हीही The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि MyGlamm कडून मोफत लिपस्टिकसह मिळवा रू. 1000 चे ब्युटी बेनिफिट्स!

ADVERTISEMENT
01 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT