ज्योतिषशास्त्रानुसार तळहातावरील रेषा या आपल्या जीवनातील बऱ्याच गोष्टी सूचित करत असतात. हस्तरेषाशास्त्रानुसार तुमच्या तळहातावरील काही रेषा या फारच शुभ मानल्या जातात. पुरुषांचा उजवा हात आणि स्त्रियांचा डावा हात पाहिला जातो. पुरुष आणि स्त्रिया यांच्या हातांवरील रेषा साधारणपणे सारख्याच असल्या तरी देखील त्याचा अर्थ वेगवेगळा असू शकता. त्यामुळे पुरुषांच्या हातावरील आणि स्त्रियांवरील रेषा कोणत्या आणि त्याचा अर्थ जाणून घेऊया.
तळहातावरील H
तळहातावर H चिन्ह दिसणे हे फारच शुभ मानले जाते. हातावरील तिन्ही रेषा एकत्र आल्यानंतर पहिल्या दोन रेषेत हा H तयार होत असतो. हातावर H तयार होत असेल तर अशा व्यक्ती फारच नशीबवान समजल्या जातात. असे म्हणतात ज्यांच्या हातावर H तयार होतो. अशांची प्रगती ही 40 वर्षानंतर होऊ लागते. वयाच्या 40 कडे येताना त्यांच्याकडे अमाप पैसा येऊ लागतो. अशा व्यक्ती जे काही करण्याचा निर्णय घेतात त्या सगळ्यामध्ये ते यशस्वी होतात. त्यांच्यामध्ये हा अशा बदल होतो की त्यांना कळत नाही की त्यांच्या आयुष्यात हे नेमके काय होत आहे.
स्पष्ट रेषा
खूप जणांच्या हातावरील रेषा या फारच स्पष्ट असतात. हातावरील त्यांच्या या रेषा या फारच उठून दिसतात. जर तुमच्या हातावर स्पष्ट रेषा असतील तर तुमचा हात फारच शुभ आहे असे म्हणावे. हातावर स्पष्ट रेषा असणाऱ्यांना पैशांची कधीच कमतरता होत नाही. त्यांना कायम पैसे मिळत राहतात. व्यवसाय आणि नोकरी यामध्ये त्यांची कायम प्रगती होत राहते.
घरात देवदेवतांचे असे फोटो मुळीच असू नयेत
कोमल हात
खूप जणांचा हात रखरखीत असतो. तर काही जणांचा हात हा फारच कोमल असतो. जर तुमचा हात अगदी कोमल असेल तर असा कोमलपणाही शुभ मानला जातो. तळहातावर जर मस्तिष्क रेषा असेल तर अशी रेषा ही भाग्यवान लोकांची असते असे म्हणतात. तळहातावर मस्तिष्क रेषा ( Head line) रेषा कशी जाणून घ्यायची असा विचार करत असाल तर दोन रेषांच्या मधील रेषा ही मस्तिष्क रेषा असते. ही रेषा सगळ्यांच्याच हातावर असते. पण ती जितकी स्पष्ट असेल तितके चांगले. मस्तिष्क रेषा ही माणसाचा स्वभाव व्यक्त करते. याला फाटे फुटले असतील तर या रेषेनुसार तुमच्यामध्ये आई- वडील या दोघांचे गूण आलेले आहेत.
देव्हाऱ्यात कधीही ठेवू नका या गोष्टी
अंगठ्यावर चक्र
हस्तरेषाशास्त्रानुसार तुमच्या हातावर असलेले चक्र हे देखील फार महत्वाचे असते. तुम्ही खूप जणांकडून नक्की ऐकले असेल की, चक्राचा गोलाकारपणा हातावर असेल तर अशा व्यक्ती या फारच भाग्यवान मानल्या जातात. या व्यक्ती या फाऱ धनवान असतात. अंगठ्याचा ठसा जर अगदी गोलाकार चक्राप्रमाणे असेल तर ते फारच शुभ मानले जाते. अशांना आयुष्यात कशाचीच कमी भासत नाही.
जर तुमच्या तळहातावर अशा रेषा असतील तर तुमचे भाग्य चांगलेच फळफळणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार जन्माष्टमीला होत आहे अद्भुत संयोग, जाणून घ्या
जाणून घ्या गुरूपुष्यामृत योगाची माहिती | Gurupushyamrut Yoga Chi Mahiti