ADVERTISEMENT
home / मनोरंजन
prajakta gaikwad

प्राजक्ताच्या ‘साजनी’ या नवीन गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती

“स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज”(Swarajya Rakshak Chhatrapati Sambhaji Maharaj) या मालिकेत महाराणी येसूबाई राणीसाहेबांची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने (Prajkta Gaikwad) महाराष्ट्रातील तमाम रसिक प्रेक्षकांच्या मनात तिच्या अभिनयाच्या जोरावर घर केले आहे. ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आणि अजूनही प्रेक्षक या भूमिकेसाठी तिला दाद देताना दिसतात.आता प्राजक्ता प्रेक्षकांसमोर एका नव्या भूमिकेत येणार आहे. सोशल मीडियावरही प्राजक्ता ऍक्टिव्ह असते आणि प्रेक्षकही तिला मनापासून प्रतिसाद देतात. त्याच प्रेक्षकांसाठी प्राजक्ता ‘साजनी’ या गाण्यातून भेटीस येत आहे. “साजनी” या गाण्याबद्दल बोलताना प्राजक्ता म्हणाली हे गाणं अतिशय सुंदर आहे. ऐकायला खरंच खूप छान आहे याचे म्युझिक बिट्स गाणे ऐकणाऱ्याला गुणगुणायला लावतात. आणि हे गाणं जर सकाळी ऐकलं तर खूप फ्रेश वाटेल कारण या गाण्याचे म्युझिक खूप प्लेजेंट आहे.

अधिक वाचा – बऱ्याच वर्षांनी दिसतेय अशी केमिस्ट्री, श्रेयस-संकर्षणची जोडी आहे कमाल

मॉडर्न लुकमध्ये सुंदर दिसतेय प्राजक्ता 

या आधी ऐतिहासिक भूमिकेत  पहायला मिळणारी प्राजक्ता आता या गाण्यात नॉर्मल लुक मध्ये दिसतेय. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने म्हणजेच ६ ऑक्टोबरला या गाण्याचा टिझर लाँच झाला असून आता हे गाणं प्रेक्षकांना युट्युब, मायबोली चॅनेलवर पाहायला मिळणार आहे. या गाण्याची निर्मिती निर्माते शिवाजी जवळे, संदीप कुंजीर, गजानन सानप, संदेश भोंडवे यांनी केली आहे. तर S4G प्रॉडक्शन प्रस्तुत हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्राजक्तासोबत या गाण्यात सिद्धांत तुपे दिसणार असून त्याचा हा पहिलाच प्रोजेक्ट आहे. “साजनी” हे त्यांच्या स्वप्नातील गाणं आहे. हे गाणं म्हणजे प्रत्येकाच्या मनामनातलं, स्वप्नातलं गाणं असल्याने प्रेक्षकांना हे गाणं नक्कीच भावेल यांत शंकाच नाही. हे गाणे धैर्य आणि तेजस यांनी स्वरबद्ध केले असून याची संकल्पना निर्माते शिवाजी जवळे यांची आहे. या गाण्याला धीरज भालेराव यांनी दिग्दर्शित केले असून  याचे डिझायनिंग शलाका बोजवार यांनी केले आहे. तर सीमा दारवटकर यांनी मेकअप आर्टिस्टची भूमिका उत्तमरित्या पेलवली. बाळा कांबळे यांनी या गाण्याला शब्दबद्ध केले आहे. ‘साजनी’ हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. 

अधिक वाचा – Bigg Boss Marathi: आविष्कार दारव्हेकर बाहेर,टीम बदलणे पडले महागात

ADVERTISEMENT

प्राजक्ता दिसतेय वेगळ्या रूपात 

प्राजक्ताला आतापर्यंत ऐतिहासिक भूमिकेत अथवा नेहमी सालस आणि Girl Next Door अशा रूपातच पाहण्यात आलं आहे. प्राजक्ताचा फॅन फॉलोईंग खूपच जास्त आहे. या गाण्यामध्ये प्राजक्ता वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. प्रेक्षकांना तिचे हे रूप आणि तिचे हे गाणे चांगलेच भावले आहे. तुम्ही हे गाणं पाहिलंत का? पाहिलं असेल तर नक्कीच तुम्हाला प्राजक्ताचे हे रूप आवडेल. या नव्या रूपात आणि मॉडर्न रूपामध्ये प्राजक्ता सर्वांनाच आवडते आहे. तर लवकरच प्राजक्ता एखाद्या मालिकेत अथवा चित्रपटातही दिसावी अशीच तिच्या चाहत्यांची इच्छा आहे. सध्या प्राजक्ता याशिवाय नव्या कोणत्या प्रोजेक्टमध्ये काम करते आहे याबाबत मात्र अजूनही काही माहिती नाही. दरम्यान काही महिन्यांपूर्वीच प्राजक्ताने आपण एका चित्रपटात काम करत असल्याचे सोशल मीडियावरून सांगितले होते. हा चित्रपट कधी पूर्ण होणार याकडे तिच्या चाहत्यांचे आता लक्ष आहे. तर आता प्राजक्ता अजून कोणत्या नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार याकडेही चाहत्यांचे लक्ष आहे. 

अधिक वाचा – अंकिता लोखंडेच्या घरी लगीनघाई, या तारखेपासून सुरू होणार लग्नाचे विधी

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

01 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT