ADVERTISEMENT
home / xSEO
pregnancy madhe kase zopave

Pregnancy Madhe Kase Zopave | गरोदरपणात कसे झोपावे

गरोदरपणा म्हटले की प्रत्येक महिलेसाठी एक वेगळाच अनुभव असतो. प्रत्येक महिलेच्या पोटात वाढणाऱ्या बाळामुळे त्या महिलेला वेगवेगळे अनुभव येत असतात. गरोदरपणात पहिल्या महिन्यात कशी काळजी घ्यायची ते अगदी नवव्या महिन्यात कशी काळजी घ्यायची इथपर्यंत सगळा विचार करावा लागतो. इतकंच नाही तर बाळ पोटात असल्यानंतर सर्वात महत्त्वाचा ताण येतो तो म्हणजे गरोदर महिलेने नक्की कसे झोपायचे जेणेकरून पोटातील बाळाला त्रास होणार नाही. प्रेग्नेंसी मध्ये कसे झोपावे (Pregnancy Madhe Kase Zopave) हा प्रश्न गरोदर आहे समजल्यानंतर प्रत्येक महिलेच्या डोक्यात येतोच. गरोदरपणात अर्थात प्रेगेंन्सीमध्ये झोपताना येणारे अडथळेही अनेक आहेत. त्यामुळे गरोदरपणात कसे झोपावे (Pregnancy Madhe Kase Zopave In Marathi) याबाबत काही माहिती. तुम्हाला ही माहिती नक्कीच उपयोगी ठरेल. गरोदरपणात काय खावे हे महत्त्वाचे आहे तसंच कसे झोपावे हेदेखील महत्त्वाचे आहे.

Pregnancy Madhe Kase Zopave In Marathi | प्रेग्नेंसी मध्ये कसे झोपावे

Pregnancy Madhe Kase Zopave
Pregnancy Madhe Kase Zopave

गरोदरपणात अगदी पहिल्या महिन्यापासून बाळाच्या आईला जितकी झोप महत्त्वाची असते तितकीच पोटात असणाऱ्या बाळाला काही त्रास होऊ नये यासाठी प्रेग्नेंसीमध्ये कसे झोपावे (Pregnancy Madhe Kase Zopave) याची जाणीवही महत्त्वाची असते. वाढत्या पोटासह आरामदायी झोप मिळणे हे अत्यंत आव्हानात्मक असते. झोपण्यासाठी योग्य पद्धत न मिळाल्याने झोप सतत खराब होते आणि त्यामुळे तुम्हाला हाय ब्लड प्रेशरच्या समस्येला गरोदरपणात सामोरे जावे लागते. गर्भावस्थादरम्यान व्यवस्थित झोप घेणे हे बाळासाठी अत्यंत गरजेचे आहे. बाळाची वाढ कशी होते हे महत्त्वाचे असते. त्यामुळे तुमच्यासाठी कोणती पोझिशन हे झोपण्यासाठी योग्य आहे हे आपण जाणून घेऊया, जेणेकरून बाळाला होईल अधिक फायदा. 

गरोदरपणात झोपण्याची योग्य पद्धत 

प्रेग्नेंन्सीदरम्यान तुम्ही योग्य पद्धतीत झोपणे अत्यंत आवश्यक आहे. 

  • सुरूवातीच्या तीन महिन्यांच्या कालावधीत (First Trimester) तुम्ही सरळ झोपू शकता. ही झोपण्याची पद्धत तुम्हाला अथवा तुमच्या बाळाला हानीकारक ठरत नाही. पण तिसऱ्या महिन्यानंतर पोटाचा आकार वाढू लागतो आणि मग मात्र महिलांना झोपेच्या पद्धतीमुळे त्रास सहन करावा लागतो. 
  • चौथ्या महिन्यानंतर सतत पाठीवर झोपल्यास, युट्रसचा संपूर्ण भार हा तुमच्या पाठीवर पडतो आणि त्यामुळे तुमच्या शरीरातील खालच्या भागातील रक्तपुरवठा नीट होत नाही. त्यामुळे गरोदरपणात पाठीचा त्रास, पाईल्स, अपचन आणि श्वास घेण्यास त्रास अशा समस्यांना गर्भवती महिलांना सामोरे जावे लागते. त्यामुळे तुम्ही सहसा चौथ्या महिन्यानंतर डाव्या कुशीवर झोपणे योग्य ठरते. 
  • ज्या महिलांना आधीपासूनच पाठीचा त्रास आहे त्यांनी पोटाच्या खाली उशी ठेऊन कुशीवर झोपावे. यामुळे तुम्हाला स्वतःला आणि बाळालाही त्रास होणार नाही 
  • रात्री झोपताना तुम्हाला छातीत जळजळ होते असेल तर तुम्ही तुमच्या अंगाखाली उशी घेऊन गरोदरपणात झोपावे. यामुळे तुम्हाला आणि बाळाला त्रास होत नाही. सातव्या महिन्यानंतर अनेक महिलांना श्वास घेण्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे कूस न बदलता उशीचा वापर करा
  • गरोदरपणात झोपताना (Pregnancy Madhe Kase Zopave In Marathi) उजव्या कुशीवर झोपणे हे अधिक चांगले मानले जाते. पण त्याहीपेक्षा अधिक चांगले म्हणजे तुम्ही डाव्या कुशीवर झोपणे. डाव्या कुशीवर झोपल्यास, तुमच्या बाळाचे आरोग्य अधिक चांगले राहण्यास मदत मिळते. डाव्या कुशीवर झोपल्यामुळे गर्भ, किडनी आणि युट्रसपर्यंत रक्ताभिसरण प्रक्रिया ही अत्यंत चांगल्या पद्धतीने होते. ज्यामुळे तुमच्या बाळाला भरपूर ऑक्सिजन आणि पोषण मिळते. यामुळे तुमच्या शरीराच्या आतील भागांवर कमी ताण येतो आणि बाळाला कोणतीही हानी पोहचत नाही

या दोन पद्धतीने कधीही झोपू नका

Pregnancy Madhe Kase Zopave In Marathi
Pregnancy Madhe Kase Zopave In Marathi
  • गर्भावस्थेदरम्यान कसे झोपावे याप्रमाणेच कसे झोपू नये हे जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. गर्भावस्थेच्या सुरूवातीच्या दिवसात तुम्ही कदाचित पोटावर झोपणं ठीक आहे. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीमध्ये तुम्ही कधीही पोटावर झोपणे योग्य नाही. यामुळे गर्भाशयावर अतिरिक्त जोर येतो आणि बाळाला त्रास होण्याची शक्यता असते 
  • तसंच तुम्ही पाठीवरही अधिक तास झोपू नये. सतत पाठीवर झोपल्यास पाठीचा त्रास, श्वास घेण्याचा त्रास, अपचन, बद्धकोष्ठता आणि रक्ताची कमतरता या समस्यांना गर्भवती महिलेला सामोरे जावे लागू शकते

डाव्या बाजूला झोपणे कसे कराल सोपे

प्रेग्नेंसी मध्ये कसे झोपावे
प्रेग्नेंसी मध्ये कसे झोपावे

काही जणींना डाव्या कुशीवर झोपण्याची सवय नसते. त्यामुळे गरोदरपणात त्रास होतो. पण तुम्हाला डाव्या कुशीवर झोपताना पोटाखाली उशी ठेवल्यास सवय लावणे अधिक सोपे जाते. तसंच तुम्ही उशी ठेवल्यावर पाय आपल्या गुडघ्यापर्यंत दुमडून घेऊ शकता. यामुळे तुम्हाला आणि बाळाला आराम मिळतो. तसंच जास्तीत जास्त या काळात उशांचा वापर करावा. जेणेकरून तुम्हाला गरोदरपणात झोपण्याचा त्रास होणार नाही. 

ADVERTISEMENT

प्रेग्नंन्सीमध्ये झोपताना येणारे अडथळे

बऱ्याचदा महिलांना गरोदरपणाच्या पहिल्या आणि तिसऱ्या तिमाहीमध्ये झोप न येण्याचा त्रास होतो. अर्थात हे प्रत्येक महिलेच्या शरीर आणि बाळाप्रमाणे निगडीत आहे. तुम्हाला जर गरोदरपणात झोप न येण्याचा त्रास असेल अथवा प्रेग्नेंन्सीमध्ये झोपताना अडथळे येत असतील तर तुम्ही काही आरामदायक पोझिशनचा वापर करायला हवा. पण प्रेग्नेंन्सीमध्ये झोपताना येणारे अडथळे नेमके काय आहेत – 

  • साधारण चौथ्या महिन्यात महिलांचे पाय सुजतात त्यामुळे पाय आखडले जातात
  • तसंच झोपेत सतत घोरण्याने स्वतःलाच त्रास होतो 
  • पोटात बाळ असल्यामुळे काही जणींना सतत छातीत जळजळ होण्याचा त्रास होतो 
  • तर काही जणींना जेवणाचा वास सहन होत नाही आणि त्यामुळे सतत उलटी होण्याचा त्रास होऊन झोप कमी होते
  • अपचनाचा त्रास वाढल्यामुळे झोप लागत नाही 
  • मनात सतत बाळाचा विचार चालू असल्यामुळे बऱ्याचदा झोपेत दचकून जाग येते आणि त्यामुळे झोप पूर्ण होत नाही 

प्रेग्नंसीमध्ये किती वेळ झोपावे

प्रेग्नंसीमध्ये किती वेळ झोपावे - Pregnancy Madhe Kase Zopave
प्रेग्नंसीमध्ये किती वेळ झोपावे

गरोदरपणाचा काळ हा प्रत्येक महिलेसाठी अत्यंत नाजूक असतो. त्यामुळे जितका आराम करता येईल तितका आराम करण्याची आवश्यकता असते. या दिवसांमध्ये महिलेला आराम मिळाला तर तिच्या आरोग्यावर चांगला परिणाम दिसून येतो. पण नेमके किती वेळ झोपायला हवे अथवा प्रेग्नेंन्सीमध्ये किती वेळ झोपावे याबाबत महिलांना नीटशी किंवा पुरेशी माहिती नसते. 

पहिल्या तिमाहीत काही जणींना उलटी आणि अन्य त्रास होत असतो त्यामुळे झोप पूर्ण होत नाही. मात्र दुसऱ्या तिमाहीमध्ये महिलांनी किमान 7.5 अर्थात साडेसात तास झोप घेणे तरी आवश्यक आहे. यापेक्षा अधिक काळ झोप मिळाली तर उत्तमच. पण पुढील महिन्यांसाठी आपली ऊर्जा आणि झोप वाचवून ठेवण्यासाठी कमीत कमी इतके तास झोप तर असायलाच हवी. 

काही महिलांना या काळात अनिद्रेचा त्रास होतो. पण योग आणि मेडिटेशनच्या मदतीने ही समस्या दूर होऊ शकते. तसंच गरोदरपणात नक्की कसे झोपावे याबाबत डॉक्टरांकडून योग्य माहिती करून घ्यावी. आपण स्वतःहून कोणत्याही स्थितीमध्ये झोपू नये. घरातील मोठ्यांचे सल्ले ऐकून त्याप्रमाणेच योग्य पद्धतीने झोपावे. गरोदरपणात योग्य झोप घेण्याचे काही फायदे आहेत, हे सिद्ध झाले आहे. ज्या महिला शेवटच्या महिन्यांमध्ये सहा तासापेक्षा कमी झोपतात त्यांच्या प्रसूतीमध्ये सिझर होण्याचा धोका हा 4.5 पटीने वाढलेला दिसून आला आहे. त्याशिवाय ज्या महिलांची सारखी झोपमोड होत असते त्यांनाही हाच त्रास होतो. त्यामुळे किमान साडेसात तासापेक्षा अधिक झोप गरोदरपणाच्या काळामध्ये घेणे योग्य आहे. यामुळे प्रसूती वेळेवर आणि नॉर्मल होते. सिझर होण्याचा धोका राहात नाही. 

ADVERTISEMENT

गरोदरपणात झोपेसाठी काही सोप्या टिप्स | Tips To Follow While Sleeping In Pregnancy

गरोदरपणादरम्यान हार्मोन्समध्ये अनेक बदल होत असतात, त्यामुळे महिलांना अनेक आरोग्याच्या तक्रारींना सामोरे जावे लागते. अशावेळी अनेक महिलांना सतत घाबरल्यासारखे वाटणे, उलटी होणे, मळमळ होणे, रात्री झोप न येणे या समस्यांना सामोरे जावे लागते. यासाठी काही सोप्या टिप्स (Pregnancy Sleep Tips), जेणेकरून तुम्हाला गर्भावस्थेत चांगली झोप लागेल – 

  • रात्री नेहमी हलके जेवण जेवा. तसंच मसालेदार आणि तळलेल्या पदार्थांपासून दूर राहा
  • हेल्दी राहण्यासाठी रोज योग करा. यामुळे तुमच्या पायामध्ये आणि पाठीमध्ये होणारा त्रास कमी होईल आणि रात्री शांत झोप लागेल
  • एकाच वेळी सगळं खाऊ नका. तर काही काही वेळाने खात राहा. म्हणजे अपचानाची समस्या होणार नाही आणि वेळेवर झोप लागेल
  • झोपण्यापूर्वी कोणत्याही चिंता मनात ठेऊ नका. तुमच्या आवडीचे सॉफ्ट म्युझिक अर्थात गाणी ऐका. यामुळे मनाला शांतता मिळते आणि शांत झोप लागते 
  • झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने आंघोळ करा. यामुळे शरीर रिलॅक्स होते आणि वेळेवर झोप येते 

प्रश्नोत्तरे (FAQ’s)

1. उजव्या बाजूला झोपल्याने मी माझ्या बाळाला हानी पोहचवत नाही ना?
तुम्हाला असा प्रश्न मनात येणे साहजिक आहे. पण उजव्या बाजूला झोपण्यापेक्षा डाव्या बाजूला झोपणे अधिक योग्य आहे. कारण कदाचित उजव्या बाजूला अधिक काळ झोपल्यास, युट्रसला रक्तपुरवठा करणाऱ्या नसांवर दबाव येऊन त्रास होऊ शकतो. 

2. गरोदरपणात सरळ झोपू शकतो का?
गरोदरपणात तुम्ही पहिल्या तिमाहीमध्ये सरळ झोपू शकता. इतर महिन्यांमध्येही तुम्ही सरळ झोपू शकता. मात्र अधिक काळ नाही. कारण यामुळे तुमच्या पाठीवर ताण येऊन अन्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते. 

3. गरोदरपणात झोपताना कोणती पद्धत टाळावी?
एकावर एक पाय ठेऊन झोपणे, उपडी झोपणे तसंच सतत पाठीवर झोपणे या पद्धती टाळल्यास, तुम्हाला त्रास होत नाही. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. 

ADVERTISEMENT
22 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT