ADVERTISEMENT
home / Diet
Pregnancy Diet Chart In Marathi

जाणून घ्या गरोदरपणात काय खावे | Pregnancy Diet Chart In Marathi

आई होणं हा प्रत्येक महिलेसाठी सुखद अनुभव आहे. अर्थात हा आनंद शब्दात कधीच व्यक्त करता येत नाही. काही महिला तर गरोदर राहण्यासाठीही उपाय करतात. पण गरोदरपणाचा काळ हा प्रत्येक मातेसाठी अर्थात आईसाठी उतार-चढावाचा असतो. गर्भावस्थेमध्ये होणाऱ्या आईला खूपच काळजी घ्यावी लागते. विशेषतः खाण्याच्या बाबतीत. बरेचदा गरोदरपणाची लक्षणे जाणवल्यानंतर आता नक्की काय खायचे असा पहिला प्रश्न पडतो. गरोदरपणात तुमच्या खाण्याकडे विशेष लक्ष तुम्हाला पुरवावे लागते. प्रेगनन्सी टेस्ट किटचा वापर करूनही आजकाल आपण गरोदर आहोत की नाही हे कळतं. मग गरोदर असल्याचे कळल्यानंतर अथवा तुमच्या जवळच्या व्यक्तीपैकी कोणी गरोदर असेल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. गरोदरपणात कशा पद्धतीने खाणे निवडायला हवे (pregnancy diet chart in marathi) हेदेखील महत्त्वाचे आहे. याबाबत माहिती. 

गरोदरपणात काय खावे हा प्रत्येक महिलेला पडलेला पहिला प्रश्न असतो. गर्भावस्थेदरम्यान महिलेने काय खावे याची काळजी घेणे हे फक्त त्या महिलेचे कर्तव्य नसते तर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची ही जबाबदारी असते. गर्भावस्थेदरम्यान पौष्टिक जेवणच जेवयला हवे. पण गरोदरपणात खाण्यासाठी कोणते पदार्थ निवडायला हवेत (How to choose food in pregnancy) हेदेखील जाणून घेणे गरजेचे आहे.  ज्या पदार्थांची अलर्जी आहे त्या पदार्थांचे सेवन करू नका आणि अशा अवस्थेत महिलांनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आणि स्वतःला जपलं पाहिजे.अशा अनेक लहानसहान मात्र महत्त्वाच्या बाबी आहेत ज्या तुम्ही जाणून घ्यायला हव्यात. 

गरोदरपणात काय खावे? | What To Eat During Pregnancy In Marathi

गरोदरपणात काय खावे याबाबत गरोदर महिलांच्या मनात नेहमी द्विधा मनःस्थिती असते. पण सुरूवातीपासूनच काय खायला हवे याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. गर्भवती महिलांनी जेवणात कोणता आहार घ्यायला हवा (pregnancy diet chart in marathi), काय खायला हवे हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी तुम्ही खालील माहिती वाचणे आवश्यक आहे. 

1. फळे

गरोदरपणातील आहार
गरोदरपणातील आहार

गर्भावस्थेदरम्यान फळ खाणे (Pregnancy Ahar In Marathi) अत्यंत गरजेचे आहे. यामध्ये असणारे पौष्टिक तत्व हे होणाऱ्या बाळ आणि आई दोघांसाठीही अत्यंत गरजेचे आहे. वास्तविक गर्भावस्थेदरम्यान कोणतेही फळ उचलून खाल्ले असं होत नाही. काही ठराविक फळांचेच या दरम्यान सेवन करावे लागते. अशी कोणती फळे आहेत जाणून घेऊया. प्रेग्नेंसी मध्ये काय खावे ते पाहूया. 

ADVERTISEMENT

अवकॅडो – पोषक तत्वाबाबत सांगायचे झाले तर अवकॅडो हे अत्यंत चांगले फळ आहे. याला बटरफ्रूट असेही म्हणतात. यामध्ये अनेक गुण असून गर्भवती महिलांसाठी फायदेशीर ठरते. यामध्ये विटामिन्स, मिनरल आणि लोह यासारखी पोषक तत्वे असल्याने बाळ आणि आई दोघांच्या पोषणासाठी अत्यंत उत्तम ठरते. तसंच अँटिऑक्सिडंट आणि फायबर हे गर्भावस्था आणि स्तनपान दोन्हीसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. त्यामुळे गर्भवती महिलांना आपल्या आहारात (pregnancy healthy food in marathi) अव्हाकाडोचा समावेश करून घ्यायला हवा. 

संत्री –  विटामिन सी युक्त संत्र्यांमुळे गर्भवती महिलांना रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी मदत मिळते. गर्भार अवस्थेत आई आणि बाळ दोघांच्याही रोगप्रतिकारक शक्तीमध्ये सुधारणा करण्यासाठी रोजच्या खाण्यात संत्र्यांचा समावेश करून घ्यावा. तसंच महिलांना संत्र्यांच्या सेवनामुळे हायड्रेट राहण्याही मदत मिळते. 

केळी –  बाजारात सर्वात जास्त पटकन उपलब्ध होणारे फळ म्हणजे केळे. विटामिन्स आणि फायबरयुक्त या फळाचे सेवन गर्भावस्थेमध्ये खाण्याचा सल्ला डॉक्टरही देतात. साधारणतः महिलांना गर्भावस्थेत बद्धकोष्ठतेचा त्रास सहन करावा लागतो. पण या समस्येपासून केळ्याचे सेवन केल्यास, सुटका मिळते. याशिवाय यातील विटामिन बी-6 हे गर्भावस्थेच्या सुरूवातीच्या काळातील मळमळ आणि उलटीच्या त्रासापासूनही सुटका मिळवून देते. 

सफरचंद – गरोदर नसतानाही सफरचंद रोज खाण्याचा सल्ला देण्यात येतो. त्यामुळे या काळात तर सफरचंद खायलाच हवे. सफरचंद खाल्ल्यामुळे बाळाला दमा आणि अन्य अलर्जिक आजारापासून दूर ठेवण्यास आईला मदत मिळते. त्यामुळे नऊ महिन्यात बाळाची काळजी गरोदरपणात घेताना रोज सफरचंद खावे. नुकतीच गर्भधारण झाली असेल तर काळजी घ्यायलाच हवी. 

ADVERTISEMENT

डाळिंब – गर्भवती महिलांनी डाळिंबाचेही सेवन करावे. यामुळे जर तुम्हाला रक्ताच्या कमतरतेची समस्या असेल तर ती दूर होण्यास मदत मिळते. तसंच ज्या महिलांचे रक्त पातळ आहे त्यांनी गर्भारपणात डाळिंब खावे. पण त्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. 

2. भाजी

Pregnancy Food Chart In Marathi
Pregnancy Food Chart In Marathi

गर्भावस्थेदरम्यान ज्याप्रमाणे फळांचे सेवन गरजेचे आहे. त्याचप्रमाणे भाज्यांची निवड करणेही गरजेचे आहे. सहसा बटाटा, वांग वातूळ असल्यामुळे अतिसेवन गर्भावस्थेदरम्यान करू नये. अगदी मोठ्यांकडून ही सूचना वारंवार होत असते. मात्र पालेभाज्यांचा आपल्या आहारामध्ये नक्की समावेश करावा. याशिवाय ब्रोकली, फ्लॉवर, मटार, गाजर, काकडी, सिमला मिरची या भाजी आपल्या आहारामध्ये नेहमी असू द्याव्यात. विशेषतः पालेभाजी आणि हिरव्या भाज्यांचा अधिक समावेश करावा. यामधून अधिक प्रमाणात गरोदर महिलांना पोषक तत्व मिळत असल्यामुळे या भाज्यांची निवड करावी. आई आणि होणाऱ्या बाळासाठी हे अधिक गरजेचेही आहे आणि अधिक पोषण प्रदान करते. कोणतीही भाजी करण्यापूर्वी अगदी स्वच्छ धुऊन घ्यावी याची मात्र नेहमी तुम्ही काळजी घ्या

3. दुधाचे पदार्थ

Pregnancy Diet Chart In Marathi
Pregnancy Diet Chart In Marathi

गर्भवती महिलांना आपल्या होणाऱ्या बाळाच्या योग्य विकास आणि हाडांच्या मजबूतीसाठी कॅल्शियम आणि प्रोटीनची अत्यंत आवश्यकता असते. त्यामुळे दुधाचे पदार्थ गर्भधारणेनंतर तुम्हाला तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करायलाच हवेत. ज्या गर्भवती महिलांचे वय 19 – 50 दरम्यान आहे, त्या महिलांना रोज 1000 mg कॅल्शियम शरीरात घ्यायला हवे. त्यामुळे महिलांनी आपल्या जेवणात डेअरी उत्पादनांचा समावेश करावा. यामध्ये दूध, दही, पनीर या पदार्थांचा समावेश करावा. बाजारामध्ये या गोष्टी सहजपणाने उपलब्ध होतात. मात्र या नऊ महिन्यांमध्ये दही आणि पनीर घरीच तयार केले तर त्याचा तुम्हाला अधिक चांगला परिणाम दिसून येतो. याशिवाय तुम्ही सोया (Soya Milk) चे सेवनही करू शकता. डेअरी उत्पादन आणि कॅल्शियमचे सेवन केल्याने बाळामध्ये एक्झिमासारख्या समस्या होत नाहीत. 

4. धान्य

भाजी आणि फळांसह गर्भवती महिलांसाठी धान्याचा आपल्या आहारात समावेश करून घेणेही आवश्यक आहे. तुम्ही नाश्त्यामध्ये ओट्स, गव्हाचा ब्रेड (Whole Wheat Bread), तांदूळ, दलिया या सगळ्याचा समावेश करून घ्यायला हवा. या धान्यामध्ये अनेक पोषक तत्व (healthy food in pregnancy in marathi) आढळतात. विटामिन, प्रोटीन आणि फायबर या तत्वामुळे आई आणि बाळाला योग्य पोषण मिळते आणि गरोदरपणात आईची तब्बेतही व्यवस्थित राहाते. 

ADVERTISEMENT

5. नट्स आणि बी

Pregnancy Ahar In Marathi
Pregnancy Ahar In Marathi

गर्भावस्थेदरम्यान महिलांना आपल्या डाएटमध्ये नट्स अर्थात शेंगदाणे, काजू, बदाम आणि अक्रोड याचा समावेश करून घेण्याची आवश्यकता आहे. हे केवळ पोषणच देत नाहीत तर बाळाला अनेक अलर्जींपासून वाचण्यासही मदत करतात. याशिवाय गर्भवती महिलांनी अनेक स्वरूपात बी अर्थात सूर्यफुलाची बी अथवा तीळ खावे. मात्र हे आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सेवन करावे. तीळ उष्ण असल्याने अधिक सेवन करू नये. मात्र यात कॅल्शियम, झिंक आणि मॅग्नेशियमसारखे पोषक तत्व असतात, जे गर्भवती महिलांसाठी फायदेशीर ठरतात. 

6. प्रोटीन्स

गर्भावस्थेमध्ये जर आहाराबाबत विचार करायचा झाला तर प्रोटीनयुक्त आहारही तितकाच गरजेचा आहे. प्रोटीन हे शिशुचा टिश्यू बनण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. तसंच महिलांच्या स्तन आणि गर्भाशयाच्या टिश्यू विकसित करण्यासाठीही याचा उपयोग होतो. याशिवाय गर्भावस्थेदरम्यान मांसपेशी आणि रक्ताच्या समस्येपासून वाचविण्यासाठीही याचा उपयोग होतो. गर्भवती महिलांना प्रोटीन्स मिळविण्यासाठी अंडे, डाळी, दूध आणि दुधाच्या पदार्थांचे सेवन करावे. याशिवाय तुम्ही मासेही खाऊ शकता. मात्र आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि तुमच्या बाळाच्या वाढीनुसार तुम्ही याचे सेवन करावे. 

7. मिनरल्स

गर्भावस्थादरम्यान शिशुचा विकास महत्त्वाचा असतो आणि यासाठी तुम्हाला आई म्हणून शरीरासाठी मिनरल्सची आवश्यकता आहे. विटामिन, कॅल्शियम आणि लोह अशा मिनरल्सची तुमच्या शरीराला आवश्यकता असते. गर्भावस्थादरम्यान फोलेटच्या सेवनाने शिशुमध्ये जन्मतः विकार होण्यापासून वाचवता येते. तसंच विटामिन डी ची कमतरता बाळांमध्ये हाडांशी संबंधित समस्या निर्माण करते. त्यामुळे विटामिन डी चे आईसाठी खूपच महत्त्व आहे. कॅल्शियम हे बाळाच्या दात आणि हाडांसाठी लाभदायक ठरते. याशिवाय आयोडिन आणि जिंकसारखे मिनरल्स हे गर्भावस्थेदरम्यान खूपच लाभदायक ठरतात. तुम्ही तुमच्या आहारामध्ये डाळ, टॉमेटो, सिमला मिरची अशा पदार्थांचा नियमित समावेश करून घ्या. 

8. गर्भावस्थेमध्ये पाणी पिणे आहे गरजेचे

गरोदरपणात काय खावे
गरोदरपणात काय खावे

गर्भावस्थेदरम्यान शरीर हायड्रेट राखणे खूपच गरजेचे आहे. नेहमीच्या तुलनेत गर्भावस्थेदरम्यान शरीराला पाणी पिण्याची जास्त आवश्यकता भासते. गर्भावस्थेदरम्यान महिलांच्या शरीरामध्ये खूपच बदल होत असतो. त्यामुळे शरीराला हायड्रेट ठेवावेच लागते. एमनियोटिक द्रव बनविण्यासाठी पाण्याची गरज भासते. कारण हाच द्रव बाळाला सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करत असतो. याशिवाय हे स्तनांमध्ये दूध निर्माण करण्यासाठीही महत्त्वाचे ठरते. तसंच तर गर्भावस्थेदरम्यान उलटी होणे हे सामान्य आहे, पण काही महिलांना याचा अधिक त्रास होतो. अशावेळी शरीरामध्ये पाणी कमी होते आणि त्यामुळे वजन कमी होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे गर्भावस्थादरम्यान योग्य प्रमाणात नियमित पाणी पित राहावे. गर्भारपणात रोज दोन लीटरपेक्षा अधिक पाणी पिण्याची गरज आहे. 

ADVERTISEMENT

गरोदरपणासाठी खास डाएट चार्ट | Pregnancy Diet Chart In Marathi  

Pregnancy Diet Chart In Marathi
Pregnancy Diet Chart In Marathi

गरोदरपणात बाईने सर्वात जास्त काळजी घेणे गरजेचे असते मग ते छोट्या छोट्या गोष्टी असतील जसे कि गरोदर पणात काय खावे? किती खावे? त्याची वेळ काय? एवढंच नाही तर गरोदर पणात हळू हळू चालावे, जास्त प्रेशर घेऊ नये, या शिवाय गरोदर पणात कसे झोपावे? या कडे सुद्धा लक्ष देणे फार गरजेचे असते.

तसेच गरोदरपणात काय खावे याच्या अनेक टिप्स आपल्याला मिळत असतात (pregnancy food tips in marathi) तसंच प्रत्येक गरोदर महिलेसाठी आहार चार्ट (pregnancy food chart in marathi) हा वेगळा असतो. कारण प्रत्येक महिलेची गर्भावस्थादरम्यान शरीराची अवस्था आणि अगदी शरीराची ठेवणही वेगळी असते. त्यामुळे आहार चार्टही वेगवेगळा असतो. पण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण याबाबत निर्णय घ्यावा. प्रेग्नेंसी मध्ये काय खावे यासह तुम्ही आहार चार्टबाबतही जाणून घ्यायला हवे. 

जेवण्याची वेळकाय खावे 
सकाळी 6 – 7 दरम्यानअर्धा ते एक कप दूध, 4-5 बदाम आणि एक अक्रोड
नाश्ता – सकाळी 9 – 10 दरम्यानजे शाकाहारी आहेत, त्यांच्यासाठी एक वाटी दलिया आणि भाज्यांसह पोहे वा उपमा अथवा भाज्यांसह दोन गव्हाचे ब्रेड अथवा भाजी आणि पोळी किंवा गव्हाचा दलिया वा ओट्स 
जे मांसाहारी आहेत, त्यांच्यासाठी एक कप दूध अथवा एक वाटी दही, एक अंडे अथवा एक वाटी पनीर 
सकाळी 11 दरम्यान – मॉर्निंग स्नॅकआपल्या आवडीची दोन फळं – संत्रे, सफरचंद, केळे यापैकी 
दुपारचं जेवण – 1 – 2 दरम्यानतीन पोळ्या, एक वाटी भाजी, एक वाटी आमटी, एक वाटी दही वा कोशिंबीर, एक मध्यम आकाराच्या प्लेटमध्ये सलाड
संध्याकाळचा नाश्ता – 4-5 दरम्यानएक ग्लास दूध, एक लहान वाटी भाजलेले चणे, उकडलेले अंडे अथवा उकडलेले कडधान्य 
संध्याकाळी 6-7 दरम्यानदोन कोणतीही आवडती फळे (जी खाता येतील गरोदरपणात अशी)
रात्रीचे जेवण 9-10 दरम्यानतीन पोळ्या, भात, एक वाटी आमटी, एक वाटी भाजी, सलाड
रात्री झोपण्यापूर्वी 11 वाजताएक कप दूध आणि एक फळ (जे शरीराला हानीकरक नसेल)
Pregnancy Diet Chart In Marathi

प्रत्येक महिलेचे शरीर आणि बाळाची वाढ ही वेगळी असते. यापेक्षा अधिक भूक लागत असेल अथवा कमी भूक लागत असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणेच आहार ठेवावा याची काळजी घ्यावी. 

गरोदरपणात काय खाऊ नये | Pregnancy Made Kay Khau Naye

गरोदरपणात काय खावे हे जितके महत्त्वाचे आहे तितकेच कोणते पदार्थ खाऊ नयेत याचीही काळजी घ्यायला हवी. गरोदरपणामध्ये काय खाऊ नये (pregnancy made kay khau naye) याबाबत अधिक माहिती 

ADVERTISEMENT
  • आजकाल कॉफी आणि चहा याचे आपल्याला सेवन करण्याची खूपच सवय असते. पण गरोदरपणात कॉफी वा कॅफेनपासून अधिकाधिक दूर राहा
  • पपई, द्राक्ष, अननस आणि आंबा अशा फळांपासून दूर राहा. या फळामध्ये असणारी उष्णता बाळासाठी धोका ठरू शकते. त्यामुळे ही फळे गरोदरपणात खाणे टाळा. यामुळे गर्भपात होण्याचा धोकाही असतो. त्यामुळे या फळांपासून लांबच राहा
  • कोणतीही भाजी ही धुतल्याशिवाय वापरू नका. भाजीवर किटक असतात. त्यामुळे भाजी चिरण्यापूर्वी व्यवस्थित धुऊनच घ्या
  • कच्चे अंडे अथवा कच्चे मांस सेवन करू नका. यामध्ये विविध बॅक्टेरिया असतात जे बाळाच्या जीवाला धोका वाढवू शकतात. यामुळे वेळेआधीच बाळाला त्रास होऊ शकतो अथवा गरोदर महिला आजारीही पडू शकते
  • अनपाश्चराईज्ड दुधाचा वापर करू नका. यामुळे संक्रमण होण्याचा धोका असतो. तसंच याचा सरळ परिणाम हा बाळावर होत असतो. त्यामुळे हे खाणे टाळा
  • दारू पिऊ नका. यामुळे बाळाच्या मेंदूचा विकास थांबतो आणि बाळाच्या जन्मामध्येही अडथळे निर्माण होतात. त्यामुळे गरोदरपणात दारूपासून लांब राहा 

प्रश्नोत्तरे (FAQ’s)

1. मसालेदार खाण्याने गर्भपात होऊ शकतो का?
गर्भावस्थेत मसालेदार खाण्याने गर्भपात होत नाही. मात्र मसालेदार खाण्याने महिलांना गॅस, अॅसिडिटी आणि जळजळ अशी समस्या निर्माण होते. त्यामुळे अशावेळी जास्त मसालेदार खाऊ नका. तुम्हाला हवं तितकंच तिखट खाणे खा. याशिवाय तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार वागा. 

2. भात खाणे योग्य आहे की नाही?
गर्भावस्थेदरम्यान संतुलित प्रमाणात भात खाणे योग्य आहे. हाडांना मजबूती देण्यासाठी आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी भात खावा. मात्र जास्त प्रमाणात भात खाल्ल्यास मधुमेह अथवा अन्य त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे बाळाला हानी पोहचेल असं काहीही करू नका. 

3. गर्भावस्थेत आईस्क्रिम खाल्ल्यास काय होते?
गर्भावस्थेत आईस्क्रिम खाल्ल्यास संक्रमणाचा धोका होऊ शकतो. यामध्ये कच्चे अंडे असते त्यामुळे बाहेर आईस्क्रिम खाण्यापेक्षा तुम्ही घरीच अंड्याशिवाय आईस्क्रिम तयार करून खाऊ शकता. यामुळे तुम्हाला धोका नाही. पण त्याआधी डॉक्टरांचा सल्ला मात्र नक्की घ्या. 

25 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT