ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
चेहऱ्यावर सुरकुत्या असतील तर असा करा मेकअप

चेहऱ्यावर सुरकुत्या असतील तर असा करा मेकअप

प्रत्येकाच्या चेहऱ्याचा आकार आणि त्वचेचा प्रकार हा वेगळा असतो. काहींची त्वचा ही कायम तुकतुकीत दिसते. तर काहींची त्वचा तरुण वयातच फार सुरकुतलेली असते. तुम्ही थोडे डोळे बारीक करा किंवा डोळे मोठे करा डोळ्यांच्या आजुबाजूला आणि कपाळावर तुम्हालाही अधिक सुरकुत्या दिसत असतील तर तुम्ही मेकअप करताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेते असते. म्हणूनच आज सुरकुत्या असलेल्या चेहऱ्याने नेमका मेकअप कसा करायचा ते जाणून घेऊया. चला करुया सुरुवात

आकर्षक दिसण्यासाठी ओव्हरनाईट ब्युटी हॅक्स

असा करावा चेहऱ्यावर सुरकुत्या असल्यास मेकअप

असा करावा चेहऱ्यावर सुरकुत्या असल्यास मेकअप

Instagram

ADVERTISEMENT
  •  चेहऱ्यावरील कोणत्या भागात तुम्हाला सुरकुत्या आहेत ते आधी बघून घ्या. त्वचा सैल असेल तर अनेकदा अशा पद्धतीने सुरकुत्या पडतात. त्यात फार नवल वाटण्याचे कारण नाही. डोळ्यांच्या बाजूला, ओठांजवळ आणि कपाळावर सर्वसाधारपणे सुरकुत्या पडतात. याशिवाय ओठांच्या बाजूलाही काहींना सुरकुत्या असतात. 
  • तुमच्या चेहऱ्याचा प्रकारण कोणताही असला तरी तुम्हाला फ्लॉ लेस मेकअप हवा असेल तर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. सगळ्यात आधी चेहऱ्यावरील ओलावा टिकून ठेवेल अशा प्राईमरचा उपयोग करा. प्राईमरमुळे पुढील मेकअप बसण्यास मदत होते. 
  • प्राईमर लावल्यानंतर अनेक जण डोळ्यांचा मेकअप आधी करतात. जर तुम्ही कन्सिलर लावत असाल तर त्याचा वापर योग्यपद्धतीने करा. कारण जर तुम्ही जास्त फेस कन्सीलर लावला तर तुमच्या डोळ्याच्या बाजूला मेकअप होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे ते बेताने लावा.
  • आयमेकअप करताना डोळयांच्या कडांकडे फार जास्त मेकअप करु नका. कन्सिलर आणि फाऊंडेशन लावल्यानंतर फिक्सिंग पावडरचा प्रयोग करायला मुळीच विसरु नका. त्यामुळे मेकअप व्यवस्थित राहतो. 
  • फाऊंडेशन चेहऱ्यावर लावताना ते फार कोरडे होता कामा नये. जर फाऊंडेशन कोरडे झाले तर त्याचे पापुर्दे पडण्याची शक्यता अधिक होते. फाऊंडेश सुकल्यासारखे वाटत असेल तर तुम्ही पाण्याचा स्प्रे अगदी एकदाच चेहऱ्यावर मारा. त्यामुळे एखाद्या ठिकाणी फाऊंडेशन राहिले असेल तर ते पसरण्यास मदत होईल. 
  • लिपस्टिक आयशॅडो या गोष्टी अगदी व्यवस्थित आणि प्रमाणात लावल्या तर तुम्हाला मेकअपचा फार काही त्रास होणार नाही. पण जर या गोष्टी अधिक लागल्या तर मात्र तुम्हाला त्याकडे सतत लक्ष द्यावे लागेल. 
  • तुम्ही मेकअपमध्ये कितीही वेगवेगळे प्रकार करुन पाहिला आणि सगळ्या टिप्स जरी वापरल्या तरी काही जणांच्या सुरकुत्या या फार खोल असतात. कन्सिलर लावूनही अनेकदा त्या झाकल्या जात नाही. अशावेळी तुम्ही कायम सोबत एक मेकअप स्पंज ठेवा. तुम्हाला ज्यावेळी मेकअप फुटत आहे असे वाटत असेल त्यावेळी तुम्ही स्पंज हलकासा भिजवून घ्या. हा स्पंज ज्या ठिकाणी तुम्हाला मेकअप फुटलेला वाटत आहे त्याठिकाणी हलक्या हाताने आणि एका बाजूला करुन फिरवा त्यामुळे तुमचा मेकअप थोडा ओला होता. आणि सुरकुत्या घालवण्यास मदत करतो. 

आता मेकअप करताना काही गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे तुमचा मेकअप मुळीच खराब होणार नाही.

फळांचा असा वापर करुन मिळवा तजेलदार त्वचा

तुम्ही काही चांगल्या मेकअप प्रोडक्टच्या शोधात असाल तर MyGlamm चे हे प्रॉडक्ट तुमच्यासाठी आहेत सगळ्यात बेस्ट

डागविरहीत त्वचेसाठी करा वेलचीच्या फेसपॅकचा वापर

ADVERTISEMENT
18 Oct 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT