किरण माने प्रकरण गेल्या कितीतरी दिवसापासून सुरु आहे. किरण माने कोण? त्याने काय केले? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. मालिकेतून एखाद्या कलाकाराला काढून टाकण्याची ही काही पहिली वेळ नाही. या आधी देखील मालिकेतून कलाकारांना परस्पर काढून टाकण्यात आलेले आहे. पण किरण माने प्रकरण यापेक्षा थोडे वेगळे नक्कीच आहे. याची चर्चा थेट राजकारणात देखील होऊ लागली आहे. स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत महत्वाची भूमिका साकारणाऱ्या किरण माने याला मालिकेतून का काढून टाकण्यात आले याबद्दलचे मौन आता वाहिनीने सोडत यामागील कारण दिलेले आहे. राजकारण नाही तर वर्तणूकीच्या कारणावरुन त्यांना या मालिकेतून काढून टाकण्यात आले आहे.
गानसम्राज्ञी लतादीदींना अजूनही काही काळ ठेवणार आयसीयुमध्ये, डॉक्टरांची माहिती
मालिकेने घेतला निर्णय
मालिकेने ज्या दिवसापासून किरणा माने यांना या मालिकेतून काढून टाकले आहे. त्या दिवसापासून वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळी चर्चा होऊ लागली आहे. काहींनी त्याने राजकीय भूमिका घेतल्यामुळे त्याला काढून टाकले अशी एक अफवा उठवली त्यामुळे किरण माने यांच्या समर्थनार्थ खूप लोक उभी राहिली. लोकशाही चालत असलेल्या देशात आपली मत मांडण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. असे असताना केवळ आपले मत मांडले म्हणून मालिकेतून काढून टाकले हे अनेकांना रुचले नव्हते. पण आता मालिकेने यावर मौन सोडले आहे. मालिकेने किरण माने आणि इतरांनी लावलेले सगळे आरोप खोडून काढले आहेत. वाहिनीने याचे स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, मालिकेत काम करणाऱ्या सगळ्या महिला सहकलाकारांना विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. सहकालाकारांच्या माहितीनुसार किरण माने हे सतत महिलांना अपमानास्पद बोलायचे. त्यांना या संदर्भात समजदेखील देण्यात आली होती. पण तरी देखील त्यांनी काहीही बदल केला नाही. त्यामुळेच त्यांना मालिकेतून काढून टाकण्यात आल्याचे प्रॉडक्शन हाऊसने सांगितले.
लिहिली भली मोठी पोस्ट
मालिकेतून काढून टाकल्यानंतर किरण माने यांनी एक भली मोठी पोस्ट लिहिली. आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगितले. आपण राजकारणातील भूमिका मांडल्यामुळे मला काढून टाकले असे सांगून त्यांनी सत्य हे बाहेर येईल असे देखील सांगितले. इतकेच नाही तर त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवा असे देखील सांगितले. त्यामुळे आता हे नेमकं प्रकरण काय? याचा थांगपत्ता लागणे कोणालाही कठीण झाले होते. खूप शक्यता आणि अशक्यता वर्तवल्या जाऊ लागल्या. अनेक राजकीय व्यक्तींनी त्याची बाजू घेतली. पण आता खरे कळाल्यानंतर अनेकांनी किरण माने यांना फटकारले आहे. मालिकेतून अचानक काढून टाकणे जितके चुकीचे तितके खोट्या पद्धतीने परिस्थिती रंगवणे देखील चुकीचे त्यामुळेच आता किरण माने ट्रोल देखील होऊ लागले आहेत.
टिकटॉक फेम सूरज चव्हाण झळकणार चित्रपटात, “का रं देवा” चित्रपटातून भेटीला
काहींनी केले समर्थन
पण अजूनही काही कलाकार आणि राजकारणी यांनी किरण मानेला पाठींबा दिला आहे. त्याच्या समर्थनार्थ अनेकांनी आपली मते देखील मांडली आहेत. पण मालिकेने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता या प्रकरणाचा शेवट काय होईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
किरण माने प्रकरणात तुम्हाला कोणाची भूमिका पटते? ते आम्हाला नक्की कळवा.
कडक उपवासानंतर अजय देवगणने घेतलं सबरीमाला मंदिरात अय्यपाचं दर्शन