ADVERTISEMENT
home / मनोरंजन
अजय देवगणने घेतले अय्यप्पाचे दर्शन

कडक उपवासानंतर अजय देवगणने घेतलं सबरीमाला मंदिरात अय्यपाचं दर्शन

 पडद्यावर कितीही धाडसी कलाकाराची भूमिका साकारत असले तरी कलाकार हे सर्वसामान्य असतात. त्यानाही हे यश मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि बऱ्याच गोष्टीवर ते विश्वासदेखील ठेवतात. देवासोबत त्यांचे एक अनोखे नाते असते. अजय देवगणचे देखील अयप्पा देवासोबत असेच कनेक्शन आहे. कडक उपवास करुन अजय देवगणने सबरीमाला मंदिरात जाऊन अय्यपाचे दर्शन घेतले आहे. त्याचे काही फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. यामध्ये त्याने डोक्यावर काहीतरी घेतले असून चेहऱ्यावर मास्क लावला आहे. जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती

इंद्रा आणि दिपूच्या नात्यात ट्विस्ट, सानूसोबत लागणार इंद्राचं लग्न

 घेतले अय्यपांचे दर्शन

 घेतले अय्यपांचे दर्शन

देशातील सबरीमाला मंदिर हे फारच प्रसिद्ध आहे. केरळच्या तिरुअनंतपुरम या ठिकाणी सबरीमाला देवाचे मंदिर आहे.  या देवासाठी लागणारा कडक 41 दिवसांचा उपवास त्याने केला असे देखील या संदर्भात सांगितले जात आहे. अजयने तो उपवास करुन डोक्यावर इरुमुडी डोक्यावर घेऊन तो सबरीमाला मंदिरात पोहोचल्याचे दिसत आहे. सबरीमाला मंदिरात जाण्यासाठी त्याने काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. अयप्पा देवाचं दर्शन घेत त्याची कृपादृष्टी प्राप्त करणे तितके सोपे नसते. यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात. म्हणजे चप्पल न घालता चालणे, जमिनीवर झोपून चालणे असे काही कडक नियमांचे पालन करावे लागते. या सगळ्या कडक नियमांचे पालन करुनच अजय देवगण तिथे पोहोचला असे कळत आहे.

ADVERTISEMENT

मौनी रॉयचे लग्न, गोव्यामध्ये रंगणार लग्नसोहळा

आगामी चित्रपटाची तयारी

दरम्यान, अजय देवगण याने हे सगळे त्याच्या चित्रपटासाठी केले असे देखील सांगितले जात आहे.  कारण अजय देवगणने त्याच्या इन्स्टा हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये तो त्याच काळ्य कपड्यामध्ये दिसत आहे. हा चित्रपट त्याचा आगामी चित्रपट असल्याचे देखील म्हटले जात आहे.  तो साऊथचा रिमेक असलेल्या कैथी नावाच्या चित्रपटात दिसणार आहे. त्यासाठी त्याने ही कठीण परिश्रम घेतले असे सांगितले जात आहे. अजय देवगण आधी अनेक कलाकारांनी त्यांच्या चित्रपटासाठी अशाप्रकारे अयप्पा देवाचे दर्शन घेतलेले आहे.

सूर्यवंशीमध्ये दिसला सिंघम

कोव्हिडच्या मोठा काळानंतर अजय देवगण सूर्यवंशी या चित्रपटात दिसला होता. अवघ्या काहीच काळासाठी तो या चित्रपटात असला तरी देखील सिंघमचा दबदबा इतका होता की, त्याला त्या ठिकाणी पाहून खूप जणांना आनंद झाला. त्याच्या एंट्री दरम्यान टाळ्या आणि शिट्टयांचा वर्षाव झाला. त्यानंतर  त्याचा चित्रपट अद्याप आलेला नाही. आता  त्याचा कैथी नावाचा एक दाक्षिणात्य चित्रपट येणार आहे. त्यासाठी त्याची ही जोरदार तयारी सुरु आहे. साऊथचा कैथी नावाचा चित्रपट हा सगळ्यात मोठा बजेटचा चित्रपट आहे. त्यामध्ये त्याची प्रमुख भूमिका आहे. इतकेच नाही. तर या चित्रपटाचा हा हिंदी रिमेक असणार आहे. त्यामुळे आता खूप जणांना या नव्या चित्रपटाची प्रतिक्षा आहे. 

आता या नव्या फोटोनंतर त्याचा चित्रपट कधी येईल ते याची वाट सगळे पाहात आहेत.

ADVERTISEMENT

ओटीटीवर येणार ‘पुष्पा’ भेटीला, हिंदीत पाहायला मिळणार चित्रपट

13 Jan 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT