नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानात अनेक मराठी सेलिब्रिटीजनी आपला मतदानाचा हक्क आवर्जून बजावला. तसंच लोकांनाही मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. याचप्रमाणे अभिनेत्रा पुष्कर श्रोत्रीनेही आपल्या पत्नीसोबत मतदान केल्यावरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. पण हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच पुष्करला ट्वीटरवर आणि इन्स्टावर ट्रोल करण्यात आलं. याचं कारण होतं या फोटोसाठी पुष्करने दिलेलं कॅप्शन. पाहा हा फोटो
‘तब्बल एक-सव्वा तास सामान्य नागरिकाप्रमाणे लाईनीत घामाघूम अवस्थेत उभं राहून सामान्य नागरिकाचा पहिला हक्क बजावून आलोय! मतदान करुन आल्याचा आनंद काही वेगळाच!’ असं कॅप्शन या फोटोला दिलं आणि ट्रोलिंगला सुरूवात झाली.
वादग्रस्त कॅप्शनमुळे ट्रोल
पुष्करच्या ट्विट आणि पोस्टवर प्रतिक्रिया म्हणून सामान्य नागरिक असो वा सेलिब्रिटीज असो सगळ्यांनी रांगेत उभं राहूनच मतदान केलं पाहिजे असा सूर सोशल मीडियावर दिसून आला.
पुष्करची पोस्ट ट्रोल होताच संगीतकार कौशल ईनामदार यांनी त्याची बाजू मांडायचा प्रयत्न केला. पण तरीही सोशल मीडियावर नेटीझन्सची टीका सुरू होतीच.
शॉर्ट स्कर्ट घालणाऱ्या मुलींवर बलात्कार करा, असे म्हणणारी आंटी ट्रोल
एका कॅप्शनमुळे ट्रोल करणं किती योग्य
सेलिब्रिटीजना कधी आणि कोणत्या गोष्टींमुळे ट्रोल करण्यात येईल याचा काही नेम नाही. तसंच काहीसं यावेळीही झालं आहे. पुष्कर श्रोत्री हा अभिनेता नेहमीच त्याच्या विनोदी अभिनयामुळे ओळखला जातो. त्याने दिलेलं हे कॅप्शन जरी पटण्यासारखं नसलं तरी फक्त एका गोष्टींमुळे नेटीझन्सनी एवढं ट्रोल करणं योग्य आहे का? पाहा पुष्करने शेअर केलेल्या इतर पोस्ट्स
आपली पोळी आपण खाणं ही ‘प्रकृती’ आहे, पण आपल्यातली अर्धी पोळी दुसऱ्याला देणं ही खरी ‘संस्कृती’ आहे.
“पुष्कर शो Three” मुळे मला हे भाग्य मिळतंय आणि ह्या तीन संस्थांशी मी जोडला जातोय!
रविवार, ५ मे, संपूर्ण दिवस दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले (पूर्व)https://t.co/rQ81fGImUR pic.twitter.com/j9QXM87jkm— Pushkar Shrotri (@PushkarShrotri) May 3, 2019
My small contribution to make Maharashtra drought-free!#PaaniFoundation#1stMay#Mahashramadaan#GaradeGaon pic.twitter.com/FvZC1alnJF
— Pushkar Shrotri (@PushkarShrotri) May 1, 2019
कारण पुष्कर नेहमीच चांगल्या कामाबाबतच्या पोस्टही शेअर करत असतोच. त्यामुळे एखाद्या सेलिब्रिटीला फक्त एका कॅप्शनमुळे ट्रोल करताना नेटीझन्सनीही विचार करण्याची वेळ आली आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. तुम्हाला काय वाटतं याबद्दल.
फोटो सौजन्य – Instagram & Twitter
हेही वाचा –