home / मनोरंजन
पुष्पा येणार ओटीटीवर

ओटीटीवर येणार ‘पुष्पा’ भेटीला, हिंदीत पाहायला मिळणार चित्रपट

 साऊथचा सुपर धमाका ‘पुष्पा’ आता हिंदीत देखील अनुभवता येणार आहे. तेही घरबसल्या तुम्हाला हा चित्रपट पाहता येणार आहे. सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म हा सगळ्यांसाठीच एक मिनी थिएटर झाला आहे.  आता ज्यांना कोरोनाच्या भीतीने थिएटरमध्ये चित्रपट पाहता आला नसेल तर त्यांनी आता घर बसल्याच हा चित्रपटाचा आनंद घ्यायला हवा. अल्लू अर्जून आणि रश्मिका मंदाना स्टारर चित्रपटाने साऊथपेक्षाही अधिक कमाई महाराष्ट्रात आणि मुंबईत केली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा ओटीटीवर धुमाकूळ घालायला हा चित्रपट येणार आहे.

कार्तिकनंतर साराच्या आयु्ष्यात आली आहे का ही व्यक्ती

पुष्पाराजूचा स्वॅग येणार हिंदीमध्ये

अल्लू अर्जुन खूप जणांच्या गळ्याचा ताईत आहे. त्याच्यासारखा हिरो होणे नाही. हल्ली अनेक साऊथ चित्रपटाचे हिंदी डबिंग करण्यात येते. ते हिंदीत खूप जास्त चालतात. वेगळी स्टोरी आणि हिरोची धटींगगिरी एकदम वेगळी आणि झक्कास असल्यामुळे खूप जणांना हे खूप जास्त आवडते. साऊथचा पुष्पा हा चित्रपट खूप वेळानंतर रिलीज झाला. अल्लू अर्जुनचा मोठा चित्रपट असल्यामुळे साऊथ सोबतच इतर काही भाषांमध्ये हा चित्रपट आल्यामुळे खूप जणांनी हा चित्रपट पाहिला. हिंदीमध्ये हा चित्रपट आल्यामुळे खूप जणांना पाहायची संधी मिळाली. त्यामुळेच की काय हा चित्रपट हाऊसफुल्ल चालला. आता इतर चित्रपटांनाही संधी मिळणे गरजेचे असल्यामुळे कधीतरी तो थिएटरमधून जाईल. त्यामुळे प्रेक्षकांना पाहायला मिळाला नसेल तर आता त्यांना हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. 

श्रेयसने दिला आवाज

पुष्पाचे हिंदीमध्ये डबिंग करणारा कलाकार आणखी कोणी नसून मराठी कलाकार श्रेयस तळपदे आहे. हा आवाज खूप जणांना हवाहवासा आणि आपला वाटला यामागे कारणच तो होता. हिंदीत त्याने अल्लू अर्जुनला दिलेला आवाज त्याला चांगलाच बसला आहे. त्यामुळे श्रेयससाठी तरी हा चित्रपट तुम्ही नक्कीच पाहायला हवा. या शिवाय या चित्रपटातील केमिस्ट्री आणि स्टोरी ही लोकांना आवडेल अशी आहे.

ADVERTISEMENT

मराठी शिक्षणपद्धतीचा आरसा ‘बदली’

कमालीची कथा आणि लव्ह स्टोरी

 ‘पुष्पा’हा चित्रपट एक रक्त चंदनाची तस्करी करणारा आहे. मजुरी करताना घ्यावे लागणारे कष्ट आणि त्यासाठी लागणारी मेहनत पाहून तो स्वत: मोठे होण्याचा विचार करतो. एकटाट राहून मोठे होण्यासाठी तो सगळ्यांच्या विरोधात जातो. तिथेच तो प्रेमात पडतो एका मुलीसोबत जिला यातले काहीच माहीत नसते. पण ही तस्करी नंतर सगळ्यांच्या लक्षात येते. त्यात असलेले धोके आणि दुश्मनी पाहता त्याचा खूप मोठा पंगा होतो. पण तरीही या सगळ्यांना मात देऊन त्यांचा हेड बनतोच. पण हा चित्रपट इथेच संपलेला नाही. कारण त्याचा पुढचा पार्ट लवकरच येणार आहे. हा चित्रपट इतका मोठा आहे की, त्यानंतरचा पुढचा पार्टही लवकरच रिलीज व्हावा अशी सगळ्यांची इच्छा आहे. 

आता तुम्ही पहिला पार्ट पाहिला नसेल तर तुम्ही ओटीटीवर हा चित्रपट पाहायला हवा.

‘मिसेस मुख्यमंत्री’ ची जोडी मोठ्या पडद्यावर करणार ‘दिशाभूल’

ADVERTISEMENT
12 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
good points logo

good points text