home / मनोरंजन
सारा अली खान पुन्हा पडली का प्रेमात

कार्तिकनंतर साराच्या आयु्ष्यात आली आहे का ही व्यक्ती

 बबली अशी चकाचक गर्ल सारा अली खान कोणाला आवडत नाही असे होणार नाही. सारा ही सगळ्यंच्या खूपच आवडीची आहे. ती काय घालते? ती काय करते यामध्ये लोकांना खूपच जास्त आवड असते. याचे कारणही तसेच आहे. कारण ती जे करते ते लोकांना खूप आवडते. क्युट कार्तिक आर्यन किती आवडतो हे सांगितल्यानंतर तिच्या मागे आणि कार्तिकच्या मागे सगळा मीडिया लागला होता ते एकमेकांना डेट करतात अशा देखील बातम्या होत्या. पण आता साराच्या आयुष्यात कोणीतरी आणखी आलं आहे. तिचं नाव आता एका नव्या व्यक्तीसोबत जोडलं जात आहे. ही व्यक्ती कोण? असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल तर वाचा

सारा करतेय का डेट?

आता या सगळ्या चर्चेला सुरुवात झाली ती म्हणजे एका पोस्टनंतर. केदारनाथ चित्रपटाचा सहाय्य्क दिग्दर्शक जहा हांडा याने काही स्टोरी शेअर केल्या आहेत. ज्यामध्ये तो आणि सारा एकमेकांना मिठी मारुन पोझ करताना दिसत आहेत. संशय इथे अधिक बळावत नाही. पण ज्यावेळी त्यामध्ये लव्ह यू दिसते. त्यामुळे हा संशय अधिकच जास्त बळावताना दिसतो. आता या फोटोमुळेच सारा जहां एकमेकांना डेट तर करत नाही ना? अशी चर्चा सगळीकडे होऊ लागली आहे.  आता या नवीन नावामुळे साराच्या पाठी पुन्हा एकदा मीडिया हात धुवून लागला आहे. पण याची कोणतीही खात्री देता येणार नाही. कारण सारा अनेकदा कुटुंबासोबत आणि जवळच्या लोकांसोबत बाहेर जात असते आणि फोटोज शेअर करत असते. 

या कारणामुळे निआ शर्मा होऊ लागलीय ट्रोल

कार्तिकसोबत जोडले होते नाव

कॉफी विथ करणमध्ये साराने तिला कार्तिक आर्यन आवडल्याचे सांगितले होते. त्याच्यासोबत डेटवर जायला आवडेल असे देखील सांगितले होते. या संदर्भात सैफ अली खानला प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने देखील अनेक प्रश्न केले होते. पण त्यानंतर सारा आणि कार्तिक खूप वेळा एकत्र दिसले. त्यांनी एकमेकांना डेट केले. पण त्यानंतर त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सतत येऊ लागल्या. त्यामुळे आता ते एकत्र नाहीत यावर शिक्कामोर्तब झाला आहे. इतकेच नाही. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्यासोबतही साराचे नाव जोडले गेले. पण त्यांनी एकत्र चित्रपट केल्यामुळे हे नाव जोडले गेले होते. पण त्याचा प्रत्यक्ष काहीही संबंध नव्हता. पण आता या नव्या नावामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

साराचा चकाचक डान्स

सध्या जिकडे तिकडे चर्चा होती ती म्हणजे साराच्या चकाचक या गाण्याची. ती या गाण्यात इतकी मस्त नाचली होती. तिचा अतरंगी रे नावाचा एक चित्रपट नुकताच येऊन गेला आहे. या चित्रपटातील चकाचक हे गाणं तिच्यावर चित्रित करण्यात आलं. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला होता. यामधील हे गाणं इतकं चांगलं ट्रेंडमध्ये होतं की खूप जणांनी या गाण्यापासून चांगले रिल्स तयार केले आहेत .त्यामुळे हे गाणं चांगलचं हिट झाले. 

आता खरंच कार्तिकनंतर सारा जहाच्या प्रेमात आहे का? हे लवकरच कळेल

11 Jan 2022

Read More

read more articles like this
good points logo

good points text