लग्न केल्यानंतर प्रत्येक महिलेमध्ये अनेक बदल होत असतात. तर लग्न करण्यापूर्वी महिलांना अनेक प्रश्नही असतात. आपल्या हार्मोन्सच्या बाबतीत अथवा लग्नानंतर सेक्स केल्यानंतर काय होईल याबाबीत अनेक प्रश्न मनात साचलेले असतात. त्यामुळे लग्नापूर्वीच प्रत्येक मुलीने गायनॉकॉलॉजिस्टला भेट देऊन तिच्या मनातील शंका दूर करून घ्यायला हवी. तिने आपल्या मनातील प्रश्न विचारून त्यांचे निरसन करून घ्यायला हवे. तुम्हाला डॉक्टरांना नक्की काय विचारायचे हेदेखील माहीत असायला हवे. कोणत्याही मुलीचे लग्न होणार असेल तर त्यांनी आपल्या गायनॅकला काही महत्त्वाचे प्रश्न विचारावे आणि ते नक्की काय आहेत, ते आम्ही तुम्हाला सांगतो.
पहिल्यांदाच इंटरकोर्स केल्याने त्रास होतो का?
लग्न ठरल्यानंतर सर्वात पहिल्यांदा प्रश्न असतो तो म्हणजे व्हजायनल इंटरकोर्समुळे (vaginal intercourse) त्रास होतो का? तर अर्थात नक्कीच यामुळे त्रास होतो. त्यामुळे तुमच्या जोडीदारासह तुम्हाला कम्फर्टेबल राहण्याची गरज आहे आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासह याबाबत चर्चा करावी. जेणेकरून तुम्हाला त्याचा अधिक त्रास होणार नाही.
व्हर्जिनिटीची परख ही केवळ रक्तस्रावामुळे होते का?
लग्न आणि व्हर्जिनिटी (Virginity) या गोष्टींबाबत अनेक मिथ्य आहेत. सर्व महिलांचे शरीर हे वेगवेगळे असते आणि असं अजिबात नाही की, पहिल्यांदाच इंटरकोर्स केल्यावर रक्तस्राव होईल. अनेक मुली लहानपणापासून जिम्नॅस्ट, विविध खेळ यामध्ये सहभागी झालेल्या असतात. त्यामुळे लहान वयात कोणत्याही फिजिकल अॅक्टिव्हिटी दरम्यान हायमन तुटू शकते. त्याचा व्हर्जिनिटीसह कोणताही संबंध नाही. त्यामुळे अशा गोष्टींचा विचार करणं हे अत्यंत चुकीचं आहे.
लग्नात मासिक पाळी सुरू झाल्यास काय करावं? मासिक पाळीत सेक्स करावा का?
आपल्या लग्नात अथवा पहिल्या रात्री मासिक पाळीचा त्रास नसावा असं प्रत्येक महिलेला वाटतं. तुम्हाला असं वाटत असेल तर तसं पाऊलही उचलायला हवं. लग्नाच्या दोन महिने आधी तुम्ही तुमच्या स्त्रीरोगतज्ज्ञांना याबाबतीत सांगा. त्यामुळे तुमच्या मासिक पाळीची तारीख बदलण्यास तुमची मदत डॉक्टर करू शकतात. त्यासाठी आवश्यक असणारी औषधेही तुम्हाला डॉक्टरांकडून दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र स्वतःहून कोणतीही गोष्ट न केलेली बरी. तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला यासाठी घेणे आवश्यक आहे. मासिक पाळीत सेक्स करावा की नाही हादेखील प्रश्न असतो. पण मासिक पाळीत सेक्स केल्यास, इन्फेक्शनचा धोका असतो. रक्तात व्हायरस असेल तरच हा धोका संभवतो. मात्र एक लक्षात ठेवा, मासिक पाळीत सेक्स केल्यास, गरोदर राहण्याची शक्यता अधिक असते.
नियमित इंटरकोर्ससाठी कोणते हायजीन गाईड फॉलो करणे आवश्यक आहे का?
हे अत्यंत गरजेचे आहे. बऱ्याच महिलांना लग्नानंतर नियमित इंटरकोर्सच्या वेळी नक्की काय हायजीन पाळावे याबाबत माहिती नसते. हे अत्यंत सोपे आहे. तुम्ही नियमित व्हजायना स्वच्छ ठेवा, तसंच योनीबाबत योग्य माहिती घ्या आणि कायम कोरडी राखण्याचा प्रयत्न करा. याशिवाय प्युबिक हेअर ट्रिम करून घ्या. तुम्हाला नियमित स्वतःला हायड्रेट ठेवण्याचीही गरज आहे. या गोष्टी तुम्ही पाळल्यास, तुमचा नियमित इंटरकोर्स नक्कीच समाधानकारक होईल आणि व्हजायना निरोगी ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळायच्या हेदेखील तुम्हाला कळेल.
शरीराला नुकसान न होण्यासारखे योग्य कॉन्ट्रासेप्शन कसे असू शकते
सर्वात सोपा आणि सुरक्षित असा उपाय म्हणजे कंडोमचा वापर करणे. याशिवाय तुम्ही IUD चा वापर करू शकता. युट्रसमध्ये एक कॉईलप्रमाणे डिव्हाईस सेट करण्यात येते जे नको असलेली गर्भधारणा रोखण्यास अर्थात गर्भ राहू नये म्हणून मदत करते. तसंच गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर तुम्ही करू शकता. पण गर्भनिरोधक गोळ्या घेण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका. तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि कुटुंब नियोजनच्या दृष्टीने जे योग्य आहे तो सल्ला तुम्हाला डॉक्टर नक्कीच व्यवस्थित देतील.
व्हजायनल वॅक्सिंग सुरक्षित आहे का?
लग्न होणार असते तेव्हा अनेक ब्युटी ट्रिटमेंट्स घेतल्या जातात. त्यामध्ये बॉडी स्क्रबपासून फेशियल, बॉडी मसाज, फुल बॉडी वॅक्सिंग याचा समावेश असतो. बिकिनी वॅक्स (Bikini Wax) करण्यासाठी मात्र बरेचदा महिला घाबरतात. कारण यामध्ये अधिक दुखते. त्यामुळे लग्नापूर्वी 3-4 महिने तुम्ही हे करून पाहावे. व्हजायनल वॅक्सिंग (Vaginal Waxing) प्रत्येकासाठी वेगळे ठरते. त्वचा कशी आहे त्यानुसार याचे परिणाम होतात. त्यामुळे करण्याआधी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. प्युबिक हेअर काढण्याचा सोपा उपाय म्हणजे ट्रिम करणे हा आहे.
आपल्या मनातील प्रश्न तुम्ही लग्नापूर्वी नक्की गायनॉकॉलॉजिस्टना विचारा. हे अत्यंत गरजेचे आहे. तुमच्या कुटुंब नियोजनापासून ते सुरक्षित गर्भधारणेपर्यंत याचा उपयोग होतो. लग्नानंतर खूपदा इंटिमेट व्हायला होतं. त्यामुळे आधीच शंकानिरसन करणं योग्य आहे.