ADVERTISEMENT
home / Fitness
लॉकडाऊनमध्ये सतत होतोय अॅसिडीटीचा त्रास, करा हे सोपे उपाय

लॉकडाऊनमध्ये सतत होतोय अॅसिडीटीचा त्रास, करा हे सोपे उपाय

लॉकडाऊनमध्ये अगदी सगळ्यांनाच होणारा त्रास म्हणजे ‘अपचन’. पहिले काही दिवस चमचमीत आणि चांगले पदार्थ खाऊन झाल्यानंतर आताच हा अपचनाचा त्रास अनेकांना होऊ लागला आहे. करपट ढेकर,छातीत जळजळणे, काही खावेसे न वाटणे, डोकेदुखी अशा तक्रारी घेऊन अनेक जण डॉक्टरांकडे जात आहेत. घरी राहून तुम्हाला अपचनाचा त्रास सातत्याने होत असेल तर तुम्ही काही गोष्टींची काळजी आतापासूनच घ्यायला हवी. त्यामुळे तुम्हाला होणारा अपचनाचा त्रास कोणतीही काळजी न घेता नियंत्रणात आणता येईल. चला जाणून घेऊया लॉकडाऊनमध्ये होणाऱ्या या अॅसिडीटीवर उपाय.

जागतिक ह्रदय दिनानिमित्त करा या खास रेसिपीज,वाढवा ह्रदयाचे आरोग्य

थंडगार दूध

थंडगार दूध

Instagram

ADVERTISEMENT

 दूध हे अॅसिडीटीवर उत्तम असा उपाय आहे. सध्या वर्क फ्रॉम होममुळे सगळ्यांच्या झोपेचा आणि कामाच्या वेळा बदलल्या आहेत. अनेकांचे जागरण सुरु आहे. त्यामुळे साहजिकच पित्ताचा त्रास हा होऊ शकतो. पण हे जागरण सातत्याने सुरु असेल तर अॅसिडीटीचा त्रास तुम्हाला वरचेवर होण्याची शक्यता असते. अशावेळी थंडगार दूध तुमची अॅसिडीटी शमवू शकतो. झोपायला थोडा उशीर झाला तर तुम्ही रात्री झोपताना अगदी न चुकता थंडगार दूधाचे सेवन करायला विसरु नका. थंडगार दुधामुळे अॅसिडीटीचा त्रास कमी होण्यास मदत होते. तुमच्या पोटात होणारी जळजळ कमी होते. 

कमी आणि मोजका आहार

घरी आहे म्हटल्यावर गेल्या काही महिन्यांपासूनच सगळ्यांचीच चंगळ सुरु आहे. अनेक जण इतर दिवसांच्या तुलनेत या दिवसांमध्ये अधिक खात आहेत. मुळात आपल्या शरीरासाठी किती आहार योग्य आहे हे तुम्हाला कळायला हवे. तुमच्या इतर दिवसांच्या तुलनेत खाण्याची क्षमता उगीचच वाढवून ठेवली असेल तर ही सवय तुम्ही आताच्या आता थांबवा. शक्य असेल तर कमी आणि मोजकाच आहार ठेवा. जर तुम्ही चमचमीत पदार्थांचे सेवन करत असाल तर असे पदार्थ पचनासाठी अधिक वेळ घेतात. त्यामुळे चीझ असलेले, तळलेले पदार्थ सतत खाणे टाळा. रोज जेवणाला आमटी-भात, डाळ-पोळी, काकडी असे पदार्थ अगदी हमखास घ्या तुमचे पोटाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळेल

वर्क फ्रॉम करताना स्वयंपाकघरातील काही ट्रिक्स येतील कामी

घरातल्या घरात चालणे

घरातल्या घरात चालणे

ADVERTISEMENT

Instagram

लॅपटॉप आणि डेस्कटॉप सतत घेऊन बसल्यामुळे उठून काही काम करण्याची फारच कमी वेळ आपल्यावर येते. त्यामुळे होते असे की, जर तुम्ही काम करण्यासाठी खाल्ल्यानंतरही न चालता केवळ बसत असाल तर तुम्हाला चालण्याची फारच गरज आहे. कारण सतत बसूनही तुमची पचनशक्ती मंदावते. त्यामुळे तुमच्या कामातून एक ब्रेक घेऊन तुम्ही किमान 500 पावलं तरी चालायला हवी. त्यामुळे तुमच्या पचनाचा त्रास कमी होईल. अन्यथा तुम्ही काहीही खाल्ले तरी तुम्हाला ते सतत घशाशी आल्यासारखे वाटेल. त्यामुळे चालणं हा यावर उत्तम पर्याय आहे. 

भरपूर पाणी पिणे

अनेक आजार हे  पोटांपासूनच सुरु होतात.  तुमच्या पोटाचे आरोग्य खराब होण्यासाठी तुमचा आहार, दिनचर्या या सगळ्या गोष्टी कारणीभूत असतात. जर तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पित नसाल तर तुम्ही पाण्याचे सेवन अगदी योग्य करायला हवे. घरी आहोत म्हणून तहान लागत नाही असे होत नाही. दर तासाने तुम्ही एक ग्लास पाणी तरी प्या. त्यामुळे तुमच्या पोटाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. 

आता काही गोष्टींची योग्य काळजी घेतली तर तुम्हाला लॉकडाऊनमध्ये अपचनाचा त्रास अजिबात होणार नाही. 

ADVERTISEMENT

रोजच्या स्वयंपाकासाठी अर्ध्या तासात तयार होतील असे झटपट पदार्थ

29 Sep 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT