ADVERTISEMENT
home / आरोग्य
Rajma can be beneficial in controlling blood sugar in marathi

मधुमेहींनी नियमित का खावा राजमा, जाणून घ्या फायदे

मधुमेह हा सध्या एक जीवनशैली विकार झाला आहे. त्यामुळे घरातील एका तरी व्यक्तीला आजकाल मधुमेह असतोच. रक्तातील साखर अचानक वाढू नये यासाठी मधुमेहींनी आहाराबाबत विशेष सावध असणं गरजेचं असतं. यासाठी मधुमेहींनी साखरयुक्त आणि गोड पदार्थांचे सेवन तर कमी करायलाच हवं, शिवाय यासोबतच भात, तळलेले पदार्थ, फळंदेखील कमी प्रमाणात खायला हवीत. पण असं असलं तरी राजमा खाणं मधुमेहींसाठी फायदेशीर ठरू शकतं. कारण राजमा खाण्यामुळे तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. राजमा आरोग्यासाठी लाभदायक असतो. कारण त्यात भरपूर प्रमाणात अॅंटि ऑक्सिडंट, फायबर्स, लोह, फॉस्फरस, मॅग्नेशिअम, सोडिअम आणि अनेक पोषक घटक असतात.

चटपटीत आणि स्वादिष्ट राजमा रेसिपीज (Rajma Recipe In Marathi)

राजमा मधुमेहींसाठी का आहे फायदेशीर

राजमा खाण्याचे हे फायदे माहीत असतील तर मधुमेही त्यांच्या आहारात राजम्याचा समावेश नक्कीच करतील.

Rajma can be beneficial in controlling blood sugar in marathi

राजमामध्ये भरपूर कार्बोहायड्रेट असतात

राजमामध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट असतात. हे कार्ब्स स्टार्च स्वरूपात असतात. राजमामधील स्टार्च पचण्यास वेळ लागतो. त्यामुळे इतर प्रकारच्या स्टार्चपेक्षा रक्तातील साखर हळू हळू वाढते. राजमामधील हा घटक मधुमेहींसाठी फायदेशीर ठरतो. 

ADVERTISEMENT

आरोग्यासाठी उत्तम फॉलिक ॲसिड पदार्थ | Folic Acid Foods In Marathi

राजमामध्ये असतात फायबर्सही 

राजमा फायबर्स भरपूर प्रमाणात असतात.राजमामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते. विघटनशील फायबर्स असल्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होतात. शिवाय यामुळे पचन लवकर होते आणि पोटदेखील व्यवस्थित स्वच्छ होते.

राजमामधील प्रोटीन्सचा नक्कीच होतो फायदा

राजमामध्ये भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणावर फायबर्स असतात. ज्यामुळे त्यात फॅट्स कमी असतात. शिवाय राजम्यामध्ये प्रोटीन्स भरपूर असतात जे मधुमेहींच्या आरोग्यासाठी उत्तम असतात. प्रोटीन्स असलेल्या इतर पदार्थ जसे की डेअरी प्रॉडक्ट, अंडी यामध्ये प्रोटीन्ससोबत फॅट्सही असतात. म्हणून मधुमेहींनी राजमा खायला हवा.

मधुमेहींसाठी पोटॅशिअम असतं गरजेचं

राजमामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशिअम असतात. पोटॅशिअमची कमतरता असल्यास उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होऊ शकते. मधुमेहींसाठी ही समस्या गंभीर होऊ शकते. यासाठी मधुमेहींनी राजमा खाणं फायदेशीर ठरते. 

ADVERTISEMENT

Diabetes Diet In Marathi | मधुमेही व्यक्तीचा आहार जाणून घ्या

30 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT