ADVERTISEMENT
home / मनोरंजन
राकेश बापट

राकेश बापट- शमिताने केली ब्रेकअपची घोषणा, बिग बॉसमध्ये झालं होतं प्रेम

 बिग बॉसमध्ये ज्यांना ज्यांना प्रेम होतं ते प्रेम टिकतंच असं काहीही सांगता येत नाही. त्याचच एक उदाहरण म्हणजे शमिता शेट्टी (Shamita Shetty)आणि राकेश बापट (Raquesh Bapat). त्यांनी एका शो मध्ये एकमेकांसोबत एवढा वेळ घालवला की, ते एकमेकांच्या प्रेमात पडले. अगदी टीव्हीवर त्यांनी त्यांचे प्रेम जाहीर केले आणि प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. या शो मधून बाहेर पडल्यानंतरही त्यांचे व्हिडिओ आणि फोटो सतत पोस्ट होत होते. शमितासाठी राकेशने मुंबईतही घर घेतले. पण आता अचानक त्यांच्यामध्ये असे काही झाले आहे की, त्या दोघांनी एकमेकांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. ते दोघे आता एकत्र नसल्याचे देखील या दोघांनी अधिकृत सांगितले आहे. त्यामुळे आता त्यांचं हे बिग बॉस प्रेम फक्त शोची टीआरपी वाढवण्यासाठीचा दिखावा होता का? अशी चर्चा होऊ लागली आहे.

ब्रेकअपसाठी केली पोस्ट

सतत एकत्र दिसणारे हे दोघे अचानक एकत्र दिसणे बंद झाले होते. पूर्वी पार्टी आणि कौटुंबिक कार्यक्रमांना राकेश शमिताच्या घरी हजेरी लावत होता. पण काही दिवसांपासून असे अजिबात होताना दिसत नव्हते. त्यामुळेच या दोघांमध्ये काही बिनसले आहे का? अशी चर्चा होत होती. या चर्चांना फुलस्टॉप लागावा यासाठीच राकेशने आणि शमिताने ही पोस्ट शेअर करत आपण वेगळे होत असल्याचे सांगितले आहे. राकेशने ही पोस्ट करताना लिहिले आहे की,

‘मी आणि शमिता एकमेकांपासून वेगळे होत आहोत. आमचे नाते अचानक जुळून आले. शारा (शेट्टी आणि कुंद्रा) कुटुंबियांचे आभार त्यांच्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद. मी एक खासगी व्यक्ती आहे. मला या गोष्टी सगळ्यांसमोर अशा पद्धतीने आणायच्या नव्हता. पण  फॅनसाठी मी ही पोस्ट करत आहे. आम्ही वेगळे झालो तरी आमच्यावरील प्रेम करणे अजिबात थांबवू नका’

तर दुसरीकडे शमिताने देखील आपल्या भावना मांडत पोस्ट केली आहे.

ADVERTISEMENT

राकेशचा झालाय घटस्फोट 

राकेश बापट हे मराठीतील नावाजलेलं नाव आहे. त्याने अनेक हिंदी मालिका आणि चित्रपटातून काम केले आहे. अभिनेत्री रिद्धी डोगरासोबत (Riddhi Dogra) त्याने 2011 साली लग्न केले होते. हे दोघे 2019 मध्ये वेगळे झाले. 8 वर्षांचा संसार केल्यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा येऊ लागला होता. त्यामुळे त्यांनी योग्य वेळी घटस्फोट घेण्याचे ठरवले होेते. राकेश बिग बॉसमध्ये आला त्यावेळी त्याचा घटस्फोट हा नुकताच झाला होता. अनेक जण त्याच्या या घटस्फोटातून बाहेर आलेली नव्हती. पण तरीही त्याला झालेले शमितावरील प्रेम हे खूप जणांना तेव्हाच खटकले होते. हा सगळा रिॲलिटी शोचा एक भाग म्हणून सगळे केले जात आहे. असा अनेकांना संशय होता. पण घराबाहेर आल्यानंतरही त्यांच्यात फुलणारे प्रेम हे सगळ्यांनाच दिसत होते. पण ते किती दिवस टिकेल हा संशयच होता. आता हा संशयही स्पष्ट झाला आहे. 

दरम्यान राकेश आणि शमिताच्या भांडणाला किंवा ब्रेकअपला त्यांच्यामधील भांडणं आहेत असे सांगितले जात आहे. 

28 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT