खूप जणांना तोंडावर बारीक बारीक पुळ्या पुटकुळ्या येण्याचा त्रास असतो. मोठे मोठे पिंपल्स हे दिसतात. पण बारीक बारीक पुळ्यांमुळे चेहरा अधिक काळवंडलेला आणि झाकोळलेला आणि निस्तेज दिसू लागतो. तुमच्या त्वचेवर हात फिरवल्यानंतर जर तुम्हाला बारीक पुळ्या लागत असतील तर अशा पुळ्या घालवण्यासाठी तुम्ही चेहऱ्याची काही खास निगा राखायला हवी. या बारीक पुटकुळ्या नेमक्या कशा येतात ते देखील जाणून घेऊया
त्वचेला सतत येत असेल खाज, तर तुम्हाला असू शकतो मधुमेहाचा धोका
पोअर्सचा त्रास
आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर बारीक बारीक छिद्र असतात. घाम ही सगळ्यांचीच प्रवृत्ती असते. त्वचेवर आलेला घाम हा छिद्रांमध्ये जातो. जर त्या छिद्रात घाम जाताना धूळ आणि माती गेली तर त्याठिकाणी त्वचेवर परिणाम होऊ लागतो. त्वचेवर बारीक बारीक छिद्रांचे रुपांतर बारीक बारीक पुळ्यांमध्ये होऊ लागते. या बारीक पुळ्या मोठ्या पिंपल्सपेक्षा अधिक कडक लागतात. त्यामध्ये दाणे लागू लागतात. अशाप्रकारे चेहऱ्यावर बारीक बारीक पुळ्या यायला सुरुवात होते.
अशी घ्या काळजी
चेहऱ्यावर हनुवटीच्या ठिकाणी किंवा जॉ लाईनवर पुळ्या आल्या असतील तर त्याची योग्य वेळी काळजी घेणे गरजेेचे असते.
स्क्रब : तुम्हाला चेहऱ्यावर असे दाणे आलेले दिसत असतील तर तुम्ही चेहऱ्याला स्क्रब करा. चेहरा स्क्रब केल्यामुळे चेहऱ्यावरील पोअर्सचे दाणे निघण्यास मदत होते. तो भाग नरम पडल्यामुळे ते काढणे देखील सोपे पडते त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी स्क्रब करायला हवे.
वाफ घेणे : तोंडावर आलेल्या बारीक पुळ्या काढून टाकायच्या असतील तर तुम्ही चेहऱ्यावर एकदा तरी वाफ ग्यायला हवी. वाफ घेतल्यामुळे चेहऱ्यावरील पोअर्स ओपन होतात. त्यामुळे तयार झालेल्या बारीक पुळ्या काढून टाकण्यास मदत मिळते. त्यामुळे आठवड्यातून एकदा वाफ घ्या . त्यामुळे नक्कीच फायदा होईल.
मसाज करा: मसाज केल्यामुळे त्वचेवर हिट निर्माण होते. हिटमुळे त्वचेवर आलेल्या पुळ्यांमधून कडक दाणे निघण्यास मदत होते. शिवाय त्वचा एकसारखी होते. त्यामुळे जर तुम्हाला सक्य असेल तर दिवसातून एकदा तरी मसाज करा. त्यामुळे तुम्हाला नक्कीच फरक झालेला दिसेल.
पोअर्स करा बंद : जर तुम्ही गरम पाण्याने आंघोळ करत असाल तर त्यामुळेही चेहऱ्यावरील पोअर्स ओपन होण्यात मदत मिळते. त्यामुळे त्वचेची स्वच्छता तर राखली जाते. पण जर पोअर्स योग्यवेळी बंद झाले नाही तर मात्र त्यामुळे चेहऱ्याच्या पोअर्समध्ये घाण जाण्याची शक्यता असते. त्यामुळेही बारीक पु्ळ्या येतात. जे अजिबात चांगले नाही. त्यामुळे गरम पाण्याचा उपयोग करायचा असेल तर त्यानंतर थंड पाण्याचा वापर करुन तुम्ही पोअर्स बंद करायला हवेत.
कपड्यांच्या रंगानुसार कोणती लिपस्टिक आहे तुमच्यासाठी परफेक्ट
आता चेहऱ्यावर बारीक बारीक पुळ्या आल्या असतील तर तुम्ही हे काही सोपे उपाय करा.