ADVERTISEMENT
home / Fitness
उन्हाळ्यात होतोय का मुळव्याधीचा त्रास, वाचा कारणं आणि उपाय

उन्हाळ्यात होतोय का मुळव्याधीचा त्रास, वाचा कारणं आणि उपाय

उन्हाळा आला की, आरोग्याच्या काही तक्रारी नक्कीच जाणवू लागतात. पोट दुखणे, पोटात जळजळणे, अन्नपचनास अडथळा निर्माण होणे असे काही पोटांचे विकार नक्कीच काही जणांना सतावतात. पण उन्हाळ्यात काही जणांना मुळव्याधीचाही त्रास होऊ लागतो. पोट साफ होत नसल्यामुळे अनेकांना हे त्रास संभावतात. आधी बद्धकोष्ठता होतो आणि त्याचे रुपांतर पुढे मुळव्याधीमध्ये होते. ज्यांना आधीपासूनच मुळव्याधीचा त्रास आहे. त्यांना या दिवसात अनेकदा चुकीच्या पदार्थाच्या सेवनामुळे मुळव्याधीचा अधिक त्रास होऊ लागतो.जर तुम्हालाही असा त्रास या दिवसात जाणवू लागला असेल तर जाणून घ्य उन्हाळ्यात होणाऱ्या मुळव्याधीची कारणं आणि त्यावर सोपे उपाय

मुळव्याध वर घरगुती करा आणि लवकर आराम मिळवा (Piles Treatment At Home In Marathi)

मुळव्याध होण्याची कारणं

 मुळव्याध हा फक्त उन्हाळ्यात होतो असे नाही हा त्रास तुम्हाला इतरवेळीही होऊ शकतो. पण मुळव्याध उन्हाळ्यात अधिक त्रासदायक ठरण्याची कारणं खालीलप्रमाणे 

  •  उन्हाळ्यात वातावरणात वाढलेल्या उष्म्यामुळे शारीरिक हालचाली या मंदावलेल्या असतात. त्यामुळे पचनाचे कार्य हे मंदावते. अशा वेळी अनेकांना पोट साफ होण्याचा त्रास होत नाही. अशामुळेही मुळव्याधीचा त्रास होऊ शकतो. 
  • सतत फ्रिजमधील थंड पाणी, ज्यूस किंवा फ्रुट क्रश असलेली गारेगार सरबते अजिबात पिऊ नका. त्यामुळे पोट थंड पडते. विष्ठा गोठते आणि ती गुदद्वारातून बाहेर पडताना अनेक अडचणी निर्माण करते. 
  • अति चटपटीत आणि तिखट असे पदार्थ खायला तुम्हाला आवडत असतील तरी देखील मुळव्याधीचा त्रास असणाऱ्यांनी असे पदार्थ खाऊ नये. खूप तिखट मसाल्यांचे पदार्थ खाल्ल्यामुळे हा त्रास अगदी स्वाभाविकपणे होऊ शकतो.
  •  जर तुमचा आहार पुरेसा आणि चांगला नसेल तरी देखील अशावेळी तुम्हाला मुळव्याधीचा त्रास होऊ शकतो. 

योनीकडील जागा सतत होते कोरडी,तर काळजी घेण्याची आहे गरज

ADVERTISEMENT

मुळव्याधीवर करा सोपे उपाय

मुळव्याध झाली म्हणून घाबरण्याचे काहीही कारण नाही. थोडीशी काळजी घेतली तरी देखील मुळव्याधीचा त्रास कमी होऊ शकतो. 

  • उन्हाळ्यात शरीरात पाणी जास्तीत जास्त असायला हवे. यासाठी पाणी पिणे हे फारच गरजेचे असते. त्यामुळे या दिवसात तुम्ही जास्तीत जास्त ताक प्यावे. ताक प्यायल्यामुळे पोटात स्निग्ध पदार्थ तयार होतात त्यामुळे तुमचे पोटात एक प्रकारे वंगण तयार होते. त्यामुळे या दिवसात जास्तीत जास्त ताक प्या.
  • थंड पाणी हे शरीराला आराम देणारे असले तरी देखील फ्रिजचे थंड पाणी पिण्यापेक्षा माठातील थंड पाणी प्या त्यामुळे पोटाला आराम मिळतो. 
  • उन्हाळ्यात फळांचे खूप जास्त सेवन करा. फळांचे सेवन केल्यामुळे पोटाला खरा थंडावा मिळतो. त्यामुळे भरपूर फळांचे सेवन करा. त्यामुळे मुळव्याधीवर थोडा थंडावा मिळतो. 
  • जर तुम्हाला शौचाला गेल्यानंतर रक्त पडत असेल किंवा तुम्हाला त्या ठिकाणी सूज आल्यासारखी वाटत असेल तर तुम्ही त्यावर अघोरी असे घरगुती उपाय करु नका त्याऐवजी डॉक्टरांच्या सल्ल्यानिशी तुम्ही योग्य ते औषध लावा. त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. 

    आता उन्हाळ्यात मुळव्याधीचा त्रास होत असेल तर या अशा प्रकारे काळजी घ्या तुम्हाला मुळव्याधीचा त्रास मुळीच होणार नाही. 

 

कमोडवर बसून मोबाईल वापरणाऱ्यांनी वेळीच व्हा सावधान

 

ADVERTISEMENT
03 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT