एखादे काम जास्त झाल्यानंतर त्या दिवशी संध्याकाळी जो थकवा येतो. त्यानंतर येणारी सुखाची झोप सगळ्यांना हवीहवीशी असते. पण असा थकवा हा क्षणिक आणि त्यामागे काहीतरी कारणं असतात. पण काही जणांना अगदी काहीही न करताही शारीरिक थकवा येतो की, त्यामुळे काहीही करण्याची इच्छा राहात नाही. तुम्हाला येणारा थकवा हा क्षणिक आहे की, काहीही न करता तुम्हाला असा थकवा येत असेल तर त्यामागे काही कारणे असू शकतात. हा थकवा तुम्हाला काही शारीरिक समस्यांमुळे येऊ शकतो. असा थकवा झोपून किंवा आराम करुन कमी होत नाही. याकडे दुर्लक्ष करु नका. कारण असा थकवा तुम्हाला अधिक आजारी करु शकतो. पण थकवा येण्याची कारणे कोणती हे तुम्ही जाणून घेणे फारच गरजेचे असते. जाणून घेऊया थकवा येण्याची कारणे.
थकवा येण्याची कारणे (Causes Of Fatigue In Marathi)
थकवा येण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात. तुम्हाला थकवा नेमका कोणत्या कारणामुळे आला आहे हे जाणून घेणे गरजेचे असते. खाली काही कारणे दिली आहेत. त्यामुळेही तुम्हाला थकवा येऊ शकतो. जाणून घेऊया थकवा येण्याची कारणे
आळशीपणा (Lack Of Physical Activity)
काही जण खूपच आळशी असतात. त्यांना शरीराची अजिबात हालचाल करायला आवडत नाही. अशी लोकं ज्यावेळी व्यायाम करायला जातात किंवा नुसती चालायला जरी गेली तरी देखील त्यांना धाप लागते आणि थकवा येऊ लागते. हा आळशीपणा देखील थकव्याचे कारण बनू शकतो. मोबाईल आणि गेम्समध्ये गुंतलेल्या या पिढीला शारीरिक हालचाली करायला अजिबात आवडत नाही. दोन पावलं चालत जाऊन काही वस्तू आणायची असली तरी देखील ही लोकं नाकं मुरडू लागतात. परिणामी ज्यावेळी त्यांचे वजन वाढते आणि शरीरातील फॅटचे प्रमाण वाढते त्यावेळी त्यांचा शारीरिक थकवा हा अधिक वाढू लागतो. थकवा येण्याची कारणे मधील हे एक कारण आहे.
झोपेची कमतरता (Lack Of Sleep)
हल्ली झोप येत नाही अशी खूप जणांना तक्रार असते. यासाठी कारणीभूत फोन आणि सीरिज असतात. झोपण्यासाठी पाठ टेकवल्यानंतर नेमका वेळ असा घालवायची इच्छा खूप जणांना होते. त्यामुळे होते असे की, झोप पूर्ण होत नाही. झोप पूर्ण झाली नाही तर शरीराला आलेला थकवा भरुन काढला जात नाही. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर तरतरीत अजिबात वाटत नाही. खूप जणांना उठल्यानंतर फ्रेश वाटते पण काही जणांना मात्र अजिबात फ्रेश वाटत नाही. आवश्यक झोप पूर्ण झाल्यानंतरही त्यांना पुन्हा झोपण्याची इच्छा होऊ लागतो. त्यामुळे थकवा येण्यासाठी हे देखील एक कारण असू शकते.
काहीही न करण्याची सवय (Boredom)
काहीही न करण्याची सवय देखील थकव्याला कारणीभूत ठरु शकते. खूप जण इतके आळशी असतात की, त्यांना काहीही करावेसे अजिबात वाटत नाही. ही काहाही न करण्याची सवय देखील अशाप्रकारे ताण निर्माण करुन तुम्हाला थकवा देऊ शकते. आळशीपणाचे पुढचे स्वरुप म्हणजे काहीही न करणे. हीच वृत्ती तुमच्या सगळ्या हालचालींना अधिक मंद करण्याचे काम करते. त्यामुळे तुमची ही सवय तुम्ही योग्यवेळी सोडलेलीच बरी!
ताण-तणाव (Stress)
हल्ली खूप जण तणावाखाली असतात.त्यांच्यावर आलेला ताण त्यांना मुळीच जाणवत नाही. असा ताणही अनेकदा थकव्याचे कारण बनते. जर हा ताण तुम्ही कमी केला नाही तर तुम्हाला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. एखादा ताण हा तुमची झोप घालवतो. त्यामुळे साहजिकच तुमच्या संपूर्ण लाईफस्टाईलवर त्याचा परिणाम होऊ लागतो. असा ताण तुम्हाला जाणवत असेल तर त्या तणावातून मुक्त होणे अधिक गरजेचे आहे. नाहीतर हा थकवा तुमच्या आजाराचे कारण बनू शकेल.
सतत आजारी असण्याचा इतिहास (Long Illness History)
काही जणांचा आजारी असण्याचा इतिहास असतो. म्हणजे ते काही आजाराने त्रस्त असतात. या आजारांची त्यांची काही औषधे असतात. सतत गोळ्या घेऊन अशा लोकांच्या लाईफस्टाईलमध्ये बराच फरक पडतो. जर तुम्हाला सतत आजारी राहण्याची सवय असेल तर असा थकवा तुम्हाला वरच्यावर नक्कीच जाणवू शकतो. त्यासाठी योग्य औषधोपचार घेणेच गरजेचे असते.
मानसिक दु:ख (Emotional Weakness)
ताण-तणावासारखेच जर तुम्हाला एखादे मानसिक दु:ख सतावत असेल तरी देखील तुम्हाला अशा प्रकारचा थकवा येऊ शकतो. थकवा येण्याचे कारण हे देखील असू शकते. खूप वेळा मानसिक दु:खांकडे आपण दुर्लक्षित करतो. असे केल्यामुळे देखील शारीरिक थकवा येऊ शकतो. हे देखील थकवा येण्याचे कारण ठरु शकते. मानसिक ताण कमी करण्याचे उपाय नक्की करा त्यामुळेही तुम्हाला खूप बरे वाटेल.
स्नायूंचे दुखणे (Muscle Pain)
खूप व्यायाम केल्यामुळे देखील स्नायू दुखी होऊ शकते किंवा जर तुम्ही काहीही शारीरिक हालचाल केली नाही तरी देखील थकवा येऊ शकतो. स्नायूंचे दुखणे देखील थकव्याचे कारण ठरु शकते. स्नायू दुखीची योग्य काळजी घेतली नाही तरी देखील थकवा येण्याचा त्रास होऊ शकतो.
थकवा घालवण्याचे सोपे उपाय (Simple Remedies For Fatigue In Marathi)
तुम्हाला असा सतत थकवा येत असेल तर तुम्ही काही सोपे उपाय करुन असा थकवा घालवू शकता.
झोपेचे वेळापत्रक (Sleep Pattern)
शरीराचा थकवा घालवण्यासाठी झोप ही फारच महत्वाची असते. जर तुमची झोप पूर्ण झाली तर तुमच्या शरीराची झालेली झीज भरुन निघण्यास मदत मिळते. त्यामुळे कोणत्याही मानवी शरीरासाठी झोप ही फारच महत्वाची असते. साधारण 7 ते 8 तासांची झोप ही तुम्ही पूर्ण करायला हवी. तरच तुमचा शारीरिक थकवा दूर होण्यास मदत मिळते. तुमच्या झोपेचे वेळापत्रक तुम्ही तपासा जर तुमची झोप पूर्ण होत नसेल तर तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. रात्री शांत झोप येण्यासाठी टिप्स फॉलो केल्या तर तुम्हाला चांगली झोप येईल
ध्यानसाधना (Meditation)
तुमचा मानसिक ताण घालवण्यासाठी ध्यानसाधना फार महत्वाची असते. जर तुम्ही मानसिक ताणाने ग्रासलेले असाल तर तुम्ही ध्यानसाधना अगदी हमखास करायला हवी. ध्यानसाधना केल्यामुळे मनाचा ताण कमी होतो. त्यामुळे नक्कीच तुम्हाला हलके वाटेल. जर तुम्ही दिवसातला थोडासा वेळ काढून अशा प्रकारे ध्यानसाधना केली तर तुम्हाला नक्की फरक पडेल. ध्यानसाधना करण्याचे फायदे जाणून घ्याल तर आजपासून तुम्ही ध्यानसाधना सुरु कराल
चांगला आहार (Healthy Eating Habits)
चांगला आहार हे कोणत्याही सुदृढ आरोग्याचे लक्षण आहे. जर तुम्ही योग्य आहार घेतला तर तुम्हाला तुमची लाईफस्टाईल चांगली ठेवण्यासाठी मदत करतो. चांगला आहार असेल तर झोपही चांगली मिळण्यास मदत मिळते. शारिरीक थकवा चांगल्या आहाराने कमी होण्यास मदत मिळते. त्यामुळे तुम्हाला थकवा जाणवत असेल तर तुम्ही चांगला आहार घ्यायला सुरु करा. म्हणजे तुम्हाला तुमच्यात झालेला बदल लगेच जाणवेल.
व्यायाम (Workout)
व्यायाम हा सुदृढ शरीरासाठी फारच चांगला असतो. जर तुम्ही अगदी कोणताही व्यायाम करत नसाल तर थोडा थोडा व्यायाम करायला घ्या. किमान रोज 30 मिनिंट चालण्यापासून सुरुवात करा. असे केल्यामुळे तुम्हाला तुमचा स्टॅमिना वाढवण्यास मदत मिळेल. तुमचा स्टॅमिना वाढला की, तुमचा थकवा देखील कमी होईल. त्यामुळे शक्य असेल तेवढा रोजच्या रोज व्यायाम करा.
सतत व्यग्र राहणे (Keep Yourself Busy)
आपल्याला काय होते ? याच्या विचारात आपण राहिलो तर नक्कीच आपल्याला उगाचच अधिक थकवा येतो. त्यामुळे तुम्ही मुळीच या गोष्टीचा विचार करण्यात वेळ घालवू नका. त्याऐवजी तुम्ही तुमचा वेळ काही चांगल्या गोष्टीत घालवा. तुम्ही तुमचा वेळ जेवढा चांगल्या कामात घालवाल तेवढे तुम्हाला तुमच्या थकव्यातून बाहेर पडता येईल.
तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)
थकवा बरा होतो का ?
थकवा हा काही आजार नाही. काही शारिरक चुकांमुळे आणि ताणामुळे थकवा येतो. तुम्ही काही गोष्टी योग्यपद्धतीने फॉलो केल्या की, थकवा बरा होऊ शकतो. थकवा घालवण्यासाठी योग्य आहार, योग्य झोप आणि शारीरिक व्यायाम करायला हवा.
तुमचा थकवा हा गंभीर स्वरुपाचा आहे हे कसे कळेल ?
थकवा हा गंभीर स्वरुप घेऊ शकतो. जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केले तर त्याला गंभीर स्वरुप येऊ शकते. जर तुमचे अंग दुखत असेल किंवा तुम्हाला उठण्याची इच्छा होत नसेल असे जर तुम्हाला सतत होत असेल तर तुमचा थकवा हा गंभीर होऊ लागला आहे हे लक्षात घ्यावे.
अचानक थकवा का येतो ?
खूप धावपळ या सारख्या गोष्टी सतत होत असतील तर तुम्हाला अचानक थकवा येऊ शकतो. जर तुम्ही गेल्या काही दिवसात खूप दगदग केली असेल तर तुम्हाला असा अचानक थकवा येऊ शकतो.