ADVERTISEMENT
home / आरोग्य
Vitamin D Deficiency

शरीरात ‘व्हिटॅमिन डी’ ची कमतरता का होते, वाचा 

शरीर निरोगी ठेवण्यासाठी व्यायामाबरोबरच आपला आहार संतुलित असणे आवश्यक आहे. शरीरात प्रथिने, कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि आवश्यक खनिजांची कमतरता झाल्यास अनेक गंभीर आजारांचा धोका निर्माण होतो. इतर सर्व व्हिटॅमिन्स प्रमाणेच व्हिटॅमिन डी शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. शरीराला लोह, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम शोषून घेण्यासाठी देखील व्हिटॅमिन डी ची आवश्यकता असते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होणे, दातांसंबंधी समस्या आणि अनेक आजार होण्याची शक्यता वाढते. व्हिटॅमिन डी शरीरात हॉर्मोन म्हणून देखील कार्य करते. त्यामुळे आपल्या शरीरात ते योग्य प्रमाणात जाणे आवश्यक आहे. ड जीवनसत्व असणारे पदार्थ आहारात नसणे, असंतुलित आहार आणि व्यस्त जीवनशैलीमुळे बहुतेक लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता दिसून येते. यामुळे, लहान मुलांना मुडदूस होण्याचा धोका असतो, तर वृद्धांना ऑस्टियोपोरोसिस होण्याचा धोका वाढतो. जाणून घेऊया शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता का निर्माण होते आणि हे टाळण्यासाठी काय करावे.  

व्हिटॅमिन डीची कमतरता होण्याचे कारण काय 

Vitamin D Deficiency
Vitamin D Deficiency

शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचे मुख्य कारण पौष्टिक अन्नाची कमतरता आहे असे मानले जाते. परंतु जीवनशैलीशी संबंधित कारणांमुळेही शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता निर्माण होऊ शकते. आजच्या काळात ही समस्या इतकी सामान्य झाली आहे की प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता आहे. खरं तर, दीर्घकाळ बंद खोलीत राहणाऱ्या किंवा उन्हात न जाणाऱ्यांना हा त्रास जास्त होतो. याशिवाय, आहारात पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन डी असलेले पदार्थ नसणे हे देखील व्हिटॅमिन डी च्या कमतरतेचे कारण असू शकते. जे लोक जंक फूड आणि फास्ट फूडचे जास्त प्रमाणात सेवन करतात त्यांच्याही शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता होऊ शकते. शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची काही प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत-

  • सतत बंद खोलीत राहणे किंवा बहुतेक वेळा उन्हात न जाणे.
  • रात्रीची शिफ्ट करणे  
  • फास्ट फूड आणि चायनीज पदार्थांचे अतिसेवन
  • काही कारणांमुळे गर्भवती महिलांमध्ये व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचा धोका.
  • दूध, दही इत्यादी दुग्धजन्य पदार्थांचे सेवन न करणे 

शरीराला व्हिटॅमिन डी मिळणे का आवश्यक आहे 

व्हिटॅमिन डी शरीरासाठी आवश्यक जीवनसत्त्वांपैकी एक आहे. हल्ली लोक वेळेअभावी आणि व्यस्त जीवनशैलीमुळे सकस आहार घेत नाहीत. त्यामुळे अनेक आजार होण्याचा धोका वाढतो. व्हिटॅमिन डी हे शरीरातील एक आवश्यक जीवनसत्वचच नाही तर ते इतर अनेक कार्ये सुरळीतपणे चालण्यासाठी खूप आवश्यक आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत ठेवण्यासाठी व्हिटॅमिन डी खूप महत्वाचे आहे आणि कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी लढण्यासाठी ते खूप उपयुक्त आहे. याशिवाय हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक आहे. 

व्हिटॅमिन डीचे दोन प्रकार आहेत – व्हिटॅमिन डी 2 (एर्गोकॅल्सीफेरॉल) आणि व्हिटॅमिन डी3 (कोलेकॅल्सीफेरॉल). यापैकी व्हिटॅमिन डी 2 हे आपल्या शरीरात तयार होत नाही, ते वनस्पतींमधून मिळते. आपल्या शरीरात व्हिटॅमिन डी3 तयार होत असले तरी ते सूर्याच्या किरणांवर प्रतिक्रिया म्हणून आपल्या शरीरात तयार होते. याशिवाय काही माशांमध्ये व्हिटॅमिन डी3 आढळते.

ADVERTISEMENT

व्हिटॅमिन डी ची कमतरता टाळण्यासाठी उपाय 

Vitamin D Deficiency
Vitamin D Deficiency

शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता टाळण्यासाठी आहार आणि जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. जर तुम्ही रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करत असाल तर तुम्ही दिवसा थोडावेळ उन्हात फिरलात किंवा कोवळ्या उन्हात बसलात तर तुम्ही शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता पूर्ण करू शकता. याशिवाय आहारात सुधारणा करणे देखील गरजेचे आहे. व्हिटॅमिन डी समृध्द पदार्थांचे सेवन केल्याने तुम्ही शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता पूर्ण करू शकता. यासाठी आहारात मासे, अंडी, दुग्धजन्य पदार्थ, मांस, तृणधान्ये आणि संत्री यांचा समावेश करायला हवा. 

तुम्हाला व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची कुठलीही लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरु करा. 

Photo Credit – istock

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
01 Aug 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT