आकर्षक आणि सुंदर बोटांवर नेलपॉलिशमुळे चारचॉंद लागतात. मात्र यासाठी तुम्हाला तुमच्या पोषाखाप्रमाणे मॅचिंग नेलपॉलिश सतत लावावं लागतं. नेलपॉलिश लावल्यावर ते निघू लागताच बोटं पुन्हा खराब दिसू लागतात. पण म्हणून जर सतत नखांवर नेल रिमूव्हरचा मारा करत असाल तर वेळीच सावध व्हा! कारण वारंवार नेल रिमूव्हर अथवा अॅसिटोनने नेलपेंट काढण्यामुळे नखांचे आरोग्य बिघडू शकते. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत असे काही घरगुती उपाय शेअर करत आहोत. ज्याने तुम्ही तुमची नेलपेंट सहज काढू शकता आणि त्यामुळे नखं अथवा बोटांवर दुष्परिणाम देखील होत नाहीत. घरीच फ्रेंच मेनिक्युअर करण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स
व्हिनेगर आणि लिंबाचा रस
नेल पॉलिश काढण्यासाठी तुम्ही हा एक प्रभावी घरगुती पर्याय निवडू शकता. यासाठी आधी पंधरा मिनीट्स हात कोमट पाण्यात बुडवून ठेवा. त्यानंतर एका छोट्या वाटीत एक चमचा व्हिनेगर आणि थोडा लिंबाचा रस घ्या. त्यात कापूस बुडवून ते मिश्रण नखांवर काही सेंकद ठेवा. त्यानंतर कापसाने नखं स्वच्छ करा.
अल्कोहोल
नखांवर अल्कोहोल लावणं नखांच्या आरोग्यासाठी फार उपयुक्त नसलं तरी जर काहीच पर्याय नसेल तर तुम्ही याचा वापर नेल रिमूव्हरप्रमाणे करू शकता. यासाठी अल्कोहोलमध्ये कापूस बुडवा आणि त्याने तुमच्या नखांवरील अर्धवट राहिलेलेी नेलपेंट काढून टाका. पैसे वाचवायचे असतील तर घरीच करा मेनिक्युअर – Manicure At Home In Marathi
लिंबाचा रस
जर तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर फक्त लिंबाच्या रसानेही तुम्ही तुमच्या नखांवरील नेलपेंट काढू शकता. मात्र त्याआधी कमीत कमी वीस मिनीट्स नखं कोमट पाण्यात बुडवणं गरजेचं आहे. त्यानंतर नखांवर कापसाच्या मदतीने लिंबाचा रस लावा आणि काही सेंकदांनी नखांवरील नेलपेंट स्वच्छ करा. पैसै वाचवा, घरच्या घरी काढता अॅक्रेलिक नखं (How To Remove Acrylic Nails At Home)
टुथपेस्ट
घरात नेल रिमूव्हर नसेल तर तुमच्या टुथपेस्टनेही तुम्ही नेलपेंट काढू शकता. यासाठी कोणताही फ्लेवर नसलेली साधी टुथपेस्ट नखांवर लावा आणि हलक्या हाताने कापसाने रगड़ून नखं स्वच्छ करा. नखांवरील नेलपेंट काढण्याचा हा एक सोपा आणि सुरक्षित उपाय आहे.