सध्याच्या वातावरणानुसार आणि आरोग्याच्या काळजीसाठी म्हणून अनेकांनी त्याच्या खाण्यापिण्यात अनेक बदल केले आहे. सकाळच्या झोपेतून तुम्हाला फ्रेश करणारा एक कप चहा देखील अनेकांसाठी शाप झाला आहे. कारण चहाच्या सेवनामुळे काहींना आरोग्यासंदर्भातील अनेक तक्रारी जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे चहाची कितीही तल्लफ आली तरी चहा प्यायचा नाही. ही सवय सोडायची असे अनेकांनी ठरवले आहे.तुम्हीही त्यापैकीच एक असाल तर रिफ्रेश होण्यासाठी तुम्ही काही हे हॉट ड्रिंक्स पिऊ शकता. हे पेय तुमच्या आरोग्यासाठी चांगले आहेत शिवाय त्यामुळे तुमची चहा पिण्याची सवय ही हळुहळू कमी होईल.
वजन कमी करण्याबरोबरच इतर गोष्टीतही फायदेशीर आहे हर्बल टी
हर्बल टी
चहाला उत्तम पर्याय म्हणजे हर्बल टीचा.हल्ली अनेक चांगल्या कंपनीच्या हर्बल टी मिळतात. तुमच्या आवडीच्या फ्लेवरनुसार तुम्ही त्यांची निवड करु शकता. साधारणपणे लेमन ग्रास, पीच, लेमन अशा फ्लेवरमध्ये या टी उपलब्ध असतात. अनेकांना फक्त किक मिळावी म्हणून चहा प्यायचा असतो. त्यांना काही स्ट्राँग फ्लेवरच आवडतात. अशांनी आधी काही सँपल पॅक घेऊन त्याचे सेवन करावे म्हणजे तुम्हाला कोणता फ्लेवर अधिक चांगला वाटतो ते कळेल आणि त्याची निवडही करता येईल. हर्बल टीची सवय अंगवळणी पडायला तुम्हाला थोडा वेळ लागेल. पण नंतर तुम्हाला त्याची सवय होईल.
ग्रीन टी
चहाची सर ग्रीन टीला कुठे?असे अनेकांना वाटते. पण तुमच्या आरोग्यासाठी ग्रीन टी खूपच चांगली आहे. ग्रीन टी मध्येही तुम्हाला वेगवेगळे फ्लेवर मिळतात. तुम्ही तेही ट्राय करु शकता. जर तुम्हाला मसाला चहाची सवय असेल तर तसे काही फ्लेवरही तुम्हाला यामध्ये मिळतात. दररोज सकाळी चहाच्या ऐवजी तुम्ही ग्रीन टी प्यायला सुरुवात करा. तुम्हाला चहामुळे होणारा अॅसिडीटीचा त्रास होणार नाही. दिवसातून केवळ दोनवेळा तुम्ही याचे सेवन करा.
तुम्ही जर चहाचे चाहते असाल तर लक्षात ठेवा काही गोष्टी
जिऱ्याचे पाणी
अनेकांसाठी चहाचा एक घोट म्हणजे पोट साफ होण्यासाठी घेतलेला काढा असते पण चहाचा घोट घेता घेता त्यांना चहा पिण्याची अतिरिक्त सवय कशी लागते तेच कळत नाही. तुम्ही पोट साफ होण्यासाठी चहा पित असाल तर आजपासून ही सवय तुम्ही सोडू शकता. कारण पोट साफ होण्यासाठी तुम्ही घरीच उपलब्ध असलेल्या काही साहित्यापासून काही हॉट ड्रिंक्स बनवू शकता. लिंबू- जिरा पाणी पिऊ शकता. लिंबामुळे तुम्हाला फ्रेश वाटते आणि जिऱ्यामुळे तुमच्या पोटातील गॅस आणि मल शरीराबाहेर टाकण्यास मदत होते. चहाला हा देखील एक उत्तम पर्याय आहे.
सौंदर्य वाढवण्यासाठी फायदेशीर आहे कॅमोमाईल टी
गरम किंवा कोमट पाणी
पाणी पिण्यासारखे फायदे कशातही नाही. जर तुम्हाला वरील कोणतेही पर्याय रुचत नसतील तर तुम्ही गरम पाण्याचे सेवन करण्यास काहीच हरकत नाही. सकाळी ब्रश केल्यानंतर तुम्ही एक ग्लासभर गरम किंवा कोमट पाण्याचे सेवन करा. तुम्हाला चहाची सवय गरम पाण्यावर भागवण्यासाठी थोडा वेळ लागेल. पण तुम्ही नक्की ट्राय करा.
आता चहाची सवय सोडण्यासाठी हे काही हॉट ड्रिंग नक्की ट्राय करा.